रात्री १२ वाजता उज्जैन रोडवर काय घडलं ?

माझे बाबा पेक्षाने वकिल आहेत. त्यामुळे कोर्टच्या केसच्या कामात त्यांना नेहमी बाहेरगावी जावे लागते पण कामामुळे परतायला कितीही उशीर झाला, तरी ते परगावात कधी मुक्काम करत नसत. त्यादिवशी असेच झाले… एका कोर्ट केसच्या बाबतीत माझे बाबा, उज्जैनला गेले होते. उज्जैन ते आमचे शहर साधारण ३ ते ४ तासांचे अतंर; सर्व कामे पार पाडून, घरी परतायला रात्रीचे १० वाजले. काम नीट संपवून बाबा घराकडे निघाले परंतु उज्जैनच्या नाक्याजवळ येताच त्यांच्या गाडीतील पेट्रोल संपले. कामाच्या नादात त्यांच्या लक्षातच आले नाही. अवतीभोवती कुठेही पेट्रोल पंप दिसत नव्हता. आता काय करायचे याच्या विचारात असतानाच त्यांना तेथील पोलीस स्टेशन दिसले. हायकोर्टचे वकिल असल्यामुळे त्यांची पंचक्रोशीतील पोलीस स्टेशनात चांगलीच ओळख होती.

काही मदत होईल, म्हणून बाबा पोलीस स्टेशनात गेले. पण र्दुदैवाने.. आज पेट्रोल पंपवाल्याचा संप असल्याचे कळाले. तरीही तेथील पोलीसानी त्यांच्या गाडीतील पेट्रोल काढून बाबांची घरी जाण्याची सोय करुन दिली. पण या सगळ्यात बराच वेळ गेला. आणि पोलीसांचे आभार मानून बाबा आपल्या मार्गाला लागले. रात्री १२-१ ची वेळ असेल, उज्जैन आता खुप मागे पडले होते. बाबा आता एका र्निमनुष्य रस्त्याला होते. काही अंतर कापल्यानंतर गाडीच्या समोरच्या प्रकाशझोतात त्यांना एक विचित्र दृश्य दिसल. गाडी थांबवून पाहिले तर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या पोटात खोल जखम होती तलवारीने घुपसल्या गत, शरीरावर अनेक वार केले होते संगळ्या शरीरातून रक्ताचा लोंढा वाहत होता. तो एक सारखा “पाणी पाणी” उच्चारात होता, बाबांनी त्याला पाजले.. त्याच्या चेहरावर शिंपडून त्याला नीट शुध्दीवर आणले. त्याला लवकरच हॅास्पीटल मध्ये हलवणे गरजचे आहे हे ओळखून बाबांनी त्याला मोटारसायकल वर मागे बसवले. पडू नये म्हणून माझ्या पोटाला आणि खांद्याला निट पकड असे सांगुन बाबांनी गाडी चालु केली.

पुढच्या गावातच एक हॅास्पीटल होते. बाबा घाईने तिकडे निघाले, तो शुध्दीवर राहावा म्हणून बाबा एकसारखे त्याचाशी बोलत होते. पण तो काहीच बोलत नव्हता. आता ते गाव काहीच अंतरावर असतानाच बोलता बोलता अचानक बाबाना तो गाडीवर नसल्याचे जाणवले. गाडी थांबवून मागे पहिले तर तो मागे नव्हताच. रस्त्यावर दुरवर नजर टाकली तर लांबपर्यत कुणीच नव्हते, बेशुध्द होउन कुठे पडला की काय हे पाहण्यासाठी बाबा मागे फिरले.

गाडीच्या प्रकाशात जिथपर्यंत नजर जात होती. रस्त्यावर कुठेच कुणी दिसत नव्हते. त्याला शोधत ते खुप मागे आले, कुठे गेला,काही कळायला मार्ग नाही. मागे येत असताना अचानक काही अंतरावर मानवाकृती सारखे दिसले. घाई करुन बाबा तेथे गेले आणि पाहिले तर तोच माणूस ! बाबा त्याला उचलुन मोटारगाडी वर बसवणार ईतक्यात. त्यांच्या लक्षात आले, गेल्या वेळेस याला येथुनच उचला होता मी. परत हा येथे कसा काय…नाही भास होत असेल असा विचार करुन त्याला पुन्हा गाडी वर बसवले. पण यावेळेस उज्जैनच्या मोठ्या हॅास्पीटल मध्ये नेवू असा विचार करुन बाबा उज्जैनकडे निघाले, पण यावेळ बाबा त्याचाशी बोलत नव्हते त्याच्या मनात वेगळेच विचार चालु होते. मघाशी हा माणूस कधी पडला झाला आणि परत त्याच जागेवर कसा आला ? त्यांना आता हा काही वेगळा प्रकार असलेल्याचे वाटत होते. तो माणुस अजुनही मागे असल्याचे त्यांना जाणवत होते. त्याचे त्यांचे सगळे कपडे रक्ताने माखलेले होते. बाबांना आता भिती वाटत होती त्यांच्या सर्व अंगाला भितीने घाम फुटला.

आता खुप अंतर कापल्यानंतर ही तो माणुस त्यांच्या बरोबरच होता बाबांच्या मनात विचार आला. हा अजुनही आपल्या सोबत आहे म्हणेज मला मघाशी भासच झाला असणार! सुटकेचा निश्वास टाकुन बाबा काही अंतर पुढे गेले असतील. तोच एका क्षणातच त्यांना मागे कोणी नसल्याचे जाणवले. त्यांनी मागे वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हते आता मात्र बाबांना कळून चुकले की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. ते खुप घाबरले तेथुन बाबांनी त्वरित परत पोलीस स्टेशनच गाठले ते जावून त्यांनी घडलेली संगळी घटना संगितली. आपले रक्ताने माखलेले कपडे दाखवण्यासाठी त्यांच्या कपड्यांकडे पहिले तर त्यावर रक्ताचा एकही डाग नव्हता.

सगळ्यांना कळुन चुकल होतं की काय प्रकार आहे तर. कारण गेल्याच आठवड्यात त्या रोड वर एका माणसाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली होती. बाबांनी त्या दिवशी पोलिस स्टेशनलाच मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी घरी येऊन आम्हाला या घटने विषयी संगितले.

मेघा, उज्जैन 

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

नागपुर विद्यापीठात विविध पदांसाठी भरती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ येथे विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी खालील ०५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांकडून आवेदनपत्र मागविण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून उमेदवारांनी आपला अर्ज ५ प्रतीत भरून कार्यालयीन पत्त्यावर सादर करावा.

वास्तुशास्त्रज्ञ : 01 जागा, वेतनश्रेणी : २४०००/-
कनिस्ठ अभियंता (स्थापत्य) : 03 जागा, वेतनश्रेणी : १८०००/-
कनिस्ठ अभियंता (विद्युत) : 01 जागा, वेतनश्रेणी : १८०००/-

वरील पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय, पात्रता इ. साठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज हे फ़क्त जाहिरातीत किंवा अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दि. ०९ ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन पत्त्यावर सादर करावेत.

अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट ला भेट द्यावी.
http://www.nagpuruniversity.org/rtmnu/home/

असं वाटते मला

असं वाटते मला,
वारा बनून गावी तुझ्या यावं.
जेथे असेल तु तेथे जावून,
अंगी तुझ्या घुटमळावं.

असं वाटते मला,
फुलपाखरं मी व्हावं.
येवून जवळ तुझ्या,
अवती – भवती फिरावं.

असं वाटते मला,
सावली तुझी व्हावं.
जेथे जेथे जाशिल तु,
तेथे मागे तुझ्या यावं.

असं वाटते मला,
गाणं मी व्हावं.
कधीतरी नकळत,
ओठी तुझ्या यावं.

असं वाटते मला,
अश्रू मी व्हावं.
आठवण येता माझी कधी,
डोळ्यातून तुझ्या वाहावं.

असं वाटते मला,
हसू मी व्हावं.
नाराज असतांना तु,
खुदकन गाली तुझ्या यावं.

असं वाटते मला,
स्वप्न मी व्हावं.
रोज रात्री तु मला,
उघडया डोळ्यांनी बघावं.

असं वाटते मला,
उंबरठा मी व्हावं.
घरातील चौकटीत तुझ्या,
कायमस्वरूपी असावं.
सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

दिग्याचं युद्ध आणि लाल पिवळा शर्ट

दिग्या आपल्या जहाजावर फेर्‍या मारत होता.
एक कामगार धावत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,
“भाई…….शत्रुचे एक जहाज आपल्या दिशेने येत आहे.”
दिग्या शांतपणे म्हणाला “जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये ”
नंतर शत्रुच्या जहाजा बरोबर जोरदार युद्ध झालं.
बंदुकीच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या आणि अखेरीस दिग्या चे जहाज जिंकले.
कामगार दिग्या जवळ आला आणि म्हणाला ,
” अभिनंदन भाई …..पण लाल शर्ट कशासाठी ? ”
” जर मी जखमी झालो तर, माझ्या शरीरावर रक्ताचे डाग बघुन माझ्या माणसाचा धीर खचेल आणि ते जिंकण्याची आशा सोडून देतील. रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून लाल शर्ट !
त्यानंतर थोड्याच वेळात तोच कामगार धावत आला आणि म्हणाला,
” भाई….शत्रुची वीस जहाजे आपल्या जहाजाच्या दिशेने येत आहेत !”
दिग्या थोडावेळ शांत उभा राहीला आणि म्हणाला,
” जा…….. आणि माझी पिवळी पॅंट घेऊन ये “

आधार

संसारमयी जिवनात माझ्या,
तुझाच एक आधार होता.
तन मन हृदयातही,
तुझाच फक्त विचार होता.

कंटाळा आला माझा,
हे मला सांगायचं होतं.
आवडत नव्हते तुला मी,
हे मला जाणवलं होतं.

अंधारून आल्या दाही दिशा,
हे मला उमगलं होतं.
बनून वादळ वारा होवून,
जिवनच उध्वस्त माझं करायचं होतं.

सोडुन जायचे होतं,
तर तसं बोलायचं होतं.
असं चटकन नातं,
तोडायचं नव्हतं.

काय मिळाले तुला,
भावना माझ्या दुखवून.
प्रेम केले तुझ्यावर,
देह माझा झिजवून.

माझ्यावर जी वेळ आणली,
ती आणखी कोणावर आणू नकोस.
अर्ध्यावरती सोडून असा,
कोणालाही जावू नकोस.

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदाकरिता भरती

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आणि इतर स्पेशालिस्ट अधिकारी पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ आक्टोम्बर २०१७ आहे.

जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://www.bankofmaharashtra.in/downdocs/RECRUITMENT_CIVIL_ELECTRCIAL_FIRE_ENGINEERS.pdf

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://www.bankofmaharashtra.in/Current-Openings.asp

जिओ फ्री आणि स्वस्त का आहे?

आज अनेक लोक मोबाईल वापरत आहेत आणि तो सुद्धा स्मार्टफोन. साधा फोन वापरणारेही आता इंटरनेट शिवाय मोबाईल वापरु शकत नाहीत. म्हणजेच अन्न -वस्र -निवारा याप्रमाणेच आता मोबाईल आणि इंटरनेट महत्वाचं झालं आहे. मागील वर्षी जिओने फ्री नेट आणि कॉलिंग सेवा सुरु करून खळबळ उडवून दिली. त्या नंतर प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाच आणि जो तो इंटरनेट चा वापर करतांना दिसून येत आहे. जिओ मुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले तो भाग वेगळा. त्यामुळे जो तो आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विविध प्लॅन्स घेऊन येत आहे.

असो, एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की , फ्री HD कॉलिंग आणि इंटरनेट सेवा जिओ सारखी कंपनी का आणि कशी देत असेल ? तर ते निरासरण आज आपण करूया.
जिओ ही VoLTE चा उपयोग करीत असल्याने कमी पैशात जास्तीत जास्त सेवा देत आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की , VoLTE काय आहे HD कॉलिंग काय आहे आणि जिओ चे प्लॅन्स एवढे स्वस्त का आहेत ? त्याआधी जाणून घेऊया की, 2G, 3G आणि 4G काय आहे ?

मोबाइल टेलिकम्यूनिकेशंस टेक्नॉलजी च्या जेनरेशनला G हे नाव दिले आहे. पहिली वायरलेस टेलिफोन टेक्नॉलजीला 1G म्हटल्या जाते. ही टेक्नॉलजी १९७० ते १९९१ या काळात वापरल्या जायची. ही टेक्नॉलजी ऐनलॉग नेटवर्क चा वापर करायची. या नंतर १९९१ मध्ये GSM लॉन्च झालं. ह्याला 2G म्हटल्या जायचं. ज्या मध्ये ऐनलॉग ऐवजी डिजिटल नेटवर्क चा वापर केल्या जायचा. 2G मुळे मोबाइल वर डेटा सर्व्हिसेस, SMS आणि MMS ची देवाण घेवाण सुरु झाली.

2G नंतर मोबाइल टेलिकम्यूनिकेशंस ची तीसरी जेनरेशन आली. ज्याला आपण 3G म्हणून ओळखतो. 3G मध्ये W-CDMA, TD-SCDMA, HSPA+ आणि CDMA2000 स्टैंडर्ड्स होते . प्रथम 1998 मध्ये 3G नेटवर्क सादर करण्यात आले. या नंतर बऱ्याच काळाने २००८ मध्ये 4G नेटवर्क आले. 4G मध्ये
मोबाइल WiMAX आणि LTE हे स्टॅंडर्ड वापरल्या जातात. LTE (लॉन्ग टर्म एव्यूलेशन), VoLTE (वॉयस ओवर लॉन्ग टर्म एव्यूलेशन).

4G LTE म्हणजे काय ?
LTE सपोर्ट फोनला 100 से 150 मेगाबिट्स प्रति सेकंद डेटा स्पीड मिळते आणि स्थिर झाल्यावर ती 1जीबी प्रति सेकंद पर्यंत असू शकते. याशिवाय इंटरनेट प्रोटोकॉल (IP) वर आधारित LTE नेटवर्कलाच VoLTE (वॉयस ओवर लॉन्ग टर्म एव्यूलेशन) म्हटल्या जाते. LTE द्वारे सुद्धा व्हॉइस कॉलिंग केल्या जाते. त्यासाठी करियर्स ला वॉइस कॉल नेटवर्क मध्ये बदल करावे लागतात. LTE मध्ये ऑपरेटर ला डेटा आणि व्हॉइस कॉलसाठी भिन्न बँड वापराव्या लागतात.

हे 4G VoLTE म्हणजे काय ?
4G VoLTE चं महत्वाचं काम म्हणजे कॉल ची गुणवत्ता सुधारणे. यामध्ये तुम्ही फोनवर बोलत असताना चांगली कनेक्टिव्हिटी मिळते. जी LTE मध्ये मिळत नाही. VoLTE मुळे होणारी कॉलिंग क्वॉलिटी ही सेल्युलर नेटवर्क च्या कॉलिंग क्वॉलिटी पेक्षा उत्तम असते . त्यामुळे VoLTE द्वारे होणाऱ्या वॉइस कॉलिंग ला HD वॉइस कॉलिंग असे सुद्धा म्हटल्या जाते. त्यासोबतच VoLTE असल्याने ऑपरेटर ला वॉइस आणि डेटा साठी वेगेवेगळी बँड वापरावी लागत नाही. जिओ शिवाय इतर कंपन्या ह्या फक्त डेटा साठी 4G LTE चा वापर करतात परंतु वॉइस कॉलिंग साठी त्या 3G आणि 2G नेटवर्क चा उपयोग करतात. त्यामुळे VoLTE हे सुविधाजनक असतांनाच स्वस्त सुद्धा आहे म्हणून जिओ सारख्या कंपन्या ह्या फ्री कॉलिंग सुविधा देतांना दिसत आहेत.

मेघलक्ष्मी सोबत काय झालं असेल ?

कोल्हापुरातील एक छोटेसे गाव ‘भिरवडी’. डोंगराळ भागात असलेले हे छोटेसे पण अतिशय सुंदर असे गाव. गावाजवळच एक छोटासा डोंगर होता. तेथून पुढे छोटेसे जंगल चालू होत होते. हे जंगल पार करून गेल्यास थेट दुसऱ्या गावाची वेस लागत होती. जंगल फार मोठे नसले तरी घनदाट होते. ‘मोघरान’ असे या जंगलाचे नाव होते. हे नाव का आणि कसे पडले हे माहित नाही पण गावातील लोक मोघ्याचे जंगल म्हणूनही संबोधित असत. गावातील लोक हे जंगल पार करायचे असल्यास मोठा चमू तयार करूनच येथून जात असत आणि ते हि दिवसा. रात्री कोणी येथून जाण्याची हिम्मत करीत नव्हते. आणि या गोष्टीला कारणही तसेच होते…

फार वर्षापूर्वी गावावर एका रात्री दरोडा पडला होता. तेव्हा गावातील लोकसंख्या फार कमी होती. दरोडेखोरांनी गावातील घर लुटली. सोने-नाणे, पैसा तसेच जो दिसेल तो मौल्यवान ऐवज त्यांनी लुटला. काही निर्भीड तरुणांनी खूप प्रतिकार केला पण त्यात त्यांना प्राण गमवावा लागला. त्या निर्दयी दरोडेखोरांच्या सरदाराच्या नजरेत एक स्त्री भरली. मेघलक्ष्मी असे तिचे नाव होते. त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला उचलले आणि आपल्या सोबत घेऊन गेला. भयभीत झालेल्या तिच्या नवऱ्यानेही काहीच प्रतिकार केला नाही. मेघलक्ष्मी रडत किंचाळत होती. दरोडेखोराच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती पण सारे निष्फळ ठरले.

दुसऱ्या दिवशी भयभीत झालेल्या मेघलक्ष्मी च्या नवऱ्याने काही गावकऱ्यांना सोबत घेऊन मेघलक्ष्मी चा शोध सुरु केला तेव्हा गावाजवळच्या जंगलात त्यांना मेघलक्ष्मी चा मृतदेह झाडाला लटकताना दिसला. अतिशय भयंकर असे दृश्य होते ते. मेघलक्ष्मीचे डोळे खोबणीतून बाहेर पडून लटकत होते. खोबणीच्या खालून सुकलेल्या रक्ताची काळी धार दिसत होती. विचकलेले दात एकमेकांवर दाबून ठेवले होते, आणि त्यावर सुकलेल्या काळ्या रक्ताची किनार. हाताचे दोन्ही पंजे दुमडलेल्या अवस्तेत आणि शरीर ताठ झाले होते. मृत अवस्थेतही मेघलक्ष्मीच्या चेहऱ्यावर जळजळीत क्रोध दिसत होता. सुंदर रूपवान मेघलक्ष्मी चा इतका करुण आणि निर्दयी अन्त पाहून लोक हळहळले. ते भयानक दृश्य बघून घाबरलेला तिचा नवरा ओरडत किंचाळत पळत सुटला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो सैरावरा पळत तेथून निसटला.

पोलिसांनी मेघलक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तिच्या नवऱ्याचा शोध सुरु केला. दोन दिवसांनी तिचा नवरा जंगलातील विहिरीजवळ मृत अवस्थेत सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते जणू मरताना समोर त्याने अति भयंकर असे काही पहिले असावे. तोंड सताड उघडे होते जणू मरताना त्याने मोठी भीतीदायक किंकाळी फोडली असावी.

काही लोकांच्या म्हणण्यानुसार मेघलक्ष्मीने आत्महत्या केली होती तर काही म्हणत दरोडेखोरांनी तिला मारले. मेघलक्ष्मी आणि तिच्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल गावात मोठा शोक पसरला. बरेच दिवस चर्चा चालू राहिली. पोलिसांचे तपास सत्र चालू होते पण ठोस असे पुरावे काहीच मिळाले नाहीत. दिवस निघून गेले तशा चर्चा कमी होत गेल्या. गावातील जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ लागले. आणि पुन्हा एकदा अघटित घडले.

भिरवडी गावाच्या शेजारच्या गावात मोठा उरूस होता. दर वर्षीप्रमाणे भिरवडी गावातील लोक या यात्रेच्या निमंत्रणाला मान देऊन जात होती. बैलगाड्या, मोटार गाड्या भरून लोक यात्रा करून आले. यात्रा सुरळीत पार पडल्यानंतर जत्रेला उधान आले. तमाशाचे फड उतरू लागले तशे गावातील तरुणांची चलबिचल वाढू लागली. भिरवडी गावातील तरुण सुद्धा तमाशा बघायचा म्हणून घरातून रात्रीची निघत ते थेट सकाळी परत येत.

जत्रेचा तिसरा दिवस होता. रंगा रात्री तमाशाला जायचे म्हणून तयार होऊन बसला होता. भैरव त्याचा मित्र मोटार सायकल घेऊन येणार होता पण तो पायीच चालत त्याच्या घरी आला. मोटार सायकल बद्दल विचारल्यावर भैरवने मोटार सायकल बंद पडल्याचे सांगितले. रात्रीची वेळ होती. जायचे कसे हा विचार पडला होता. मुख्य रस्त्याने चालत गेलो तर खूप उशीर होणार, तमाशा पण बघायला मिळणार नाही आणि दमछाक होईल ती वेगळीच.

“रंग्या आजचा शेवटचा तमाशा हाय, बघितलाच पायजे गड्या”, भैरव.

“आर हो पर जायचं कस आता, समदी टाळकी पण गेल्याती आदीच, कोण म्हणून नाय आपल्यासोबत”, रंग्या.

मान गरागरा फिरवत भैरव उठला आणि म्हणाला, “ते काय न्हाय, उठ जंगलाच्या वाटेने जाऊ चल, पाटकन पोचतुय बघ”.

जंगलातून जायचे म्हटल्यावर रंग्या थोडा बावरला पण तमाशाचे खूळ डोक्यावर नाचत होते. दोघेही उठले आणि चालत माळावर येऊन पोचले. समोर घनदाट जंगल होते. आकाशात अर्धचंद्र आणि चांदण्या टीमटीमत होत्या. त्यांचा निळसर प्रकाश पडला होता. हातात छोटा दिवा घेऊन दोघेही जंगलात शिरले. पायाखालचा सुकलेला पाला पाचोळा कर्र्र्रर्र क्र्रर्र्र वाजवीत दोघेऊ घाई घाईत चढ उतर करीत निघाले होते. भयाण अशा रानात रंगा आणि भैरव दोघेच चालत होते. कधी कुत्र्याचे रडणे ऐकू येई तर कधी घुबडाचे घुत्कार. दोघेही आता जंगलाच्या मध्यावर येऊन पोचले होते. समोर मोठ मोठी झाड होती. हवेतला गारवा कमालीचा वाढला होता. आणि अचानक रंग्या चालता चालता थांबला…

“का रे काय झाल”, भैरव.

“भैरू हे…हे म्होरच झाड बघ”, रंग्या चाचरत बोलला.

“का रे काय झालंय झाडाला?”, भैरव.

“हे… तेच झाड हाय. त्या मेघलक्ष्मीन हिथं….”, रंगा.

“आर..गप… कशाला न्हाय त्यो विषय… गप बस”, भैरव.

समोरचे ते मोठे झाड स्तब्ध उभे होते. गार वारा अंगाला झोंबू लागला होता. रंगा आणि भैरव दोघेही आता झपझप चालू लागले. थोडे अंतर चालून गेल्यावर एक छोटा ओढा लागला. रंगा आणि भैरव ओढा पार करण्यासाठी खाली उतरले. आणि अचानक सर्रर्रर्र सर्रर्रर्र करीत काहीतरी भैरवाच्या मागच्या बाजूने निघून गेले. दोघेही दचकले, गर्भगळीत झाले. घाबरून दोघेही इकडे तिकडे बघू लागले पण काहीच दिसले नाही. दोघांच्याही अंगातली थरथर आता वाढू लागली होती. पोटात गोळा आला होता. झपझप पाय टाकीत दोघेही ओढ्याच्या वर आले. एकमेकांचा हात पकडून दोघेही चालत होते आणि पुन्हा…

छम… छम…छम… छम…छम… छम…

पैंजणाचा आवाज कानावर आला तसे दोघेही घाबरले. अंगावर सरसरून काटा आला आणि मानेवरचे केस ताठ झाले. मागे वळून पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. पण दोघेही आता चांगलेच गांगरून गेले होते. एकमेकांना घट्ट चिकटून दोघेही लटपटत चालू लागले. दहा बारा पावलं चालून जाताच एक भेदक किंकाळी दोघांच्याही कानावर आली दोघांनीही मागे वळून पहिले आणि त्याचक्षणी एक मुंडके सरपटत त्यांच्या दिशेने येताना दिसले. दात विचकलेले, डोळे बाहेर आलेले आणि पूर्ण चेहरा काळ्या रक्ताने माखलेले ते मुंडके त्यांच्याकडे बघून किंचाळत होते. मुंडक्याच्या मागे लांबलचक मान वळवळत होती आणि त्यामागे लिबलिबीत अशे शरीर सरपटत होते.

दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. पळून जाण्या इतकेही त्राण उरले नाही. पाय लटपटत होते थर थर कापत होते. एखाद्या अमानवी शक्तीने शरीर जखडून ठेवावे तशी अवस्था दोघांची झाली. एकमेकांचे घट्ट पकडलेले हात गळून पडले होते. ते मुंडके दोघांच्या दिशेने भर भर सरपटत येत होते काही क्षणातच त्या मुंडक्याने भैरवच्या दिशेने झेप घेतली ते सरळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळले. तत्क्षणी रंगाचे जखडलेले शरीर अचानक हलके झाले, विजेच्या चपळाईने तो तेथून पळत सुटला. धावता धावता एक भयंकर किंकाळी रंग्याच्या कानावर पडली.

दुसऱ्या दिवशी रंगा गावाबाहेर सापडला. त्याच्या अंगावरचे कपडे मातीने माखलेले होते. केस पिंजारले होते. खाली बसून तो वेड्यासारखे काहीतरी बडबडत होता. ‘भैरूचा तमाशा झाला…मी वाचलो…मेघलक्ष्मी आली परत…’ अशी असंबंध आणि अखंड बडबड तो करीत होता. रंग्याला इस्पितळात दाखल केले गेले आणि भैरव चा शोध सुरु केला. जंगलाच्या मध्यभागी भैरवचा मृतदेह सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते… तोंडाचा जबडा उघडा होता. शरीर रक्ताने माखलेले होते…

या घटनेला आता बरीच वर्ष उलटली. पण आजही या गावातल्या लोकांना जंगलातून चित्र विचित्र आवाज ऐकू येतात. जंगलाजवळील माळावर शेतात काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना येथून भर दुपारी किवां रात्री किंचाळण्याचे ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. कधी पैंजणाचा आवाज, कधी मधुर आवाज देऊन बोलावणे तर कधी गुरगुर ऐकू येते.

दिपक कदम

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

 

आरोग्यदायी आवळा

सध्या बाजारात आवळे उपलब्द्ध आहेत. तसे हिवाळ्यात येणारे हे फळ आहे. हिरव्या रंगाचे, औषध गुणांनीयुक्त असे हे फळ तुरट व आंबट चवीचे असते. आवळा हे फळ डोळ्यांसाठी खूपच हितकर असते, तिन्ही दोषांना संतुलित करून, शुक्रधातूचे पोषण करते. हे फळ आंबट असल्याने वात शांत करते, गोड व थंड असल्याने पित्त शांत करते, तुरट असल्याने कफ शांत करते. आवळ्यापासून विविध पदार्थ बनवली जातात. आवळा सुपारी, आवळा लोणचे, आवळा चूर्ण, आवळा मुरब्बा.
असे ऐकण्यात आहे रोज एक चमचा आवळा रस किंवा चूर्ण घेतल्याने मनुष्य जन्मभर निरोगी राहतो.त्याला लवकर आजार होत नाहीत. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाही. यात पांच रस आहेत. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षडरस) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. म्हातारपण येऊ न देणे हा आवळ्याचा एक प्रमुख गुणधर्म आहे. आयुर्वेदातही आवळ्यापासून निरनिराळी औषधे तयार करतात.
धार्मिक दृष्ट्या याला फार महत्व आहे. आवळ्याच्या झाडत निरनिराळ्या देव देवता वास्तव करतात अशी मान्यता आहे. या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रम्हदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे असा समज आहे. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे. कार्तिक महिन्यात केल्या जाणार्‍या तुळशीच्या लग्नात आवळा, उस, बोरे यांना महत्व आहे. आवळा हे एक पवित्र फळ असून ते अलक्ष्मीचा नाश करते अशी समजूत आहे. ज्याच्या घरी आवळ्याचा वृक्ष असतो त्या घरात भूतबाधा होत नाही असा समज आहे.
अशा या विविध गुणांनीयुक्त आवळा फळाची माहिती व उपयोग आपण आज बघणार आहोत.

आवळ्याचे उपयोग

आवळ्याच्या रसाने ज्ञानतंतू सशक्त होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
पोटात जंत झाल्यास आवळा उपयोगी ठरतो.
चीरयौवन प्राप्तीसाठी आवळा उपयोगी ठरतो.
सांधेदुखी मध्ये आवळा उपयोगी आहे.
केसांच्या समस्या यांवर सुद्धा आवळा वापरल्या जातो.
केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा खूपच उपयोग होतो.
इतर फळांपेक्षा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असल्याने रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
विकारग्रस्ताला विकारमुक्त करण्यासाठी विकारमुक्ताला जास्त सशक्त करण्यासाठी आणि वृद्धांना स्फूर्ती आणण्यासाठी आवळा गुणकारी आहे.
खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेतल्याने चांगला फायदा होतो.
आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी आहे. याच्या सेवनामुळे आम्ल्पित्ताचा त्रास बरा होतो.
उष्णता कमी करण्यासाठी आवळा उत्तम असतो. अशा प्रकारे आवळा विविध विकारांवर उपयोगाचा आहे.

औषध म्हणून आवळ्याचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये कनिष्ठ लेखाधिकारी पदाची भरती

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये ‘कनिष्ठ लेखाधिकारी’ (DR-JAO) पदांच्या एकूण ९९६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Direct Junior Accounts Officers या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ आक्टोबर २०१७ आहे.

जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://www.externalbsnlexam.com/advertisement/INDCATIVE_ADVT_DRJAO_BSNL_CO.pdf

संपूर्ण जाहिरात व अभ्यासक्रम बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://www.externalbsnlexam.com/advertisement/NOTIFICATION_DRJAO_2017.pdf

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://externalbsnlexam.com/drjaoaug17/

गण्या आणि अम्या

(गण्या पहिल्यांदा शहरात जातो तिथे त्याला त्याचा मित्र अम्याने त्याला भेटायला बोलावले असते. गण्या सांगितलेल्या जागेवर पोहचतो व एका बाजूने आपली कार पार्किंग मध्ये लावतो)

गण्या : रस्त्याने एका बाजूला कार लावून तिचे चाक काढत असतो. (अम्या तिथे येतो व विचारतो.)

अम्या : गण्या कायले गाडीचे चाक काढतूस लेका?

गण्या : येड्या, फालतू प्रश्न कायले करतूस त्यापेक्षा मले मदत करकी अजूक एक चाक काढायचं बाकी आहे बे. तुले बोर्ड नाही दिसत का बे फुटक्या?

अम्या : (बोर्ड वाचतो) पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता. चार चाकी वाहने येथे उभे करू नये.

पावसाळ्यात मेकअप कसा असावा ?

आपण मेकअप करीत असतांना काय काळजी घ्यावी, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरावी, मेकअप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं असे अनेक प्रश्न मनात येतात याचे उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत.

पावसाळ्यातील वातावरण हे उष्ण आणि दमट असते. म्हणूनच मेकअपही त्यानुसारच करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही सौंदर्यप्रसाधने आणण्यासाठी पावसाळ्याची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जाणार तेव्हा वॉटरप्रूफ किंवा वॉटररेसिस्टंट मेकअप कॉस्मेटिक्स आणायला विसरू नका. पावसाळ्यात तुम्ही कमी मेकअप करून कसे सुंदर दिसणार यासाठी प्रयत्न करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

निरोगी त्वचेसाठी- पावसाळ्यातील उष्ण आणि दमट वातावरणामुळे त्वचेवर मुरूम येण्याची शक्यता असते. त्यासाठी स्नानापूर्वी चेहरा, मान, हात यांना दुधाने मालिश करावे. याने त्वचा चांगली राहते. तसेच दिवसातून तीन-चार वेळा चेहरा थंड पाण्याने धुऊन वॉटर बेस्ड मॉइश्चराइजरचा वापर तुम्ही करू शकता. ज्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होते. या करीता तुम्ही बर्फाने चेहऱ्याला ५ ते १० मिनिटे मसाज केल्यास अतिरिक्त लाभ आपणास मिळेल. असे केल्यास त्वचा ताजी, फ्रेश व चांगली राहते यामुळे मेकअप जास्त काळ टिकून राहतो. जर आपली स्किन तेलकट असेल तर अस्ट्रेन्जंट व कोरडय़ा स्किनकरता टोनर चा वापर करू शकता.

डोळ्यांचा मेकअप- पावसाळ्यात डोळ्यांचा मेकअप करतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण जास्त वेळ खर्च करून जर तुम्ही आयशॅडो, मस्करा, लाइनर लावत असाल तर ते पावसाचे काही थेंब पडताच पूर्ण मेकअप खराब होईल याचा आपणास अनुभव देखील असेल. मेकअप खराब होण्याचे आणखी एक कारण असु शकते ते म्हणजे दमट हवा. आय लाइनरपेक्षा कोहल वापरू शकता. कारण आय लाइनरच्या तुलनेत कोहलची पाण्याला प्रतिकार करण्याची क्षमता जास्त काळ असते. पावडर आय शॅडोमध्ये तुम्ही टरक्वाइस, ब्राउन, ब्ल्यू, ग्रीन आणी पिंक शेड्सची निवड देखील करू शकता. वॉटरप्रूफ मस्काऱ्याचा अथवा लाईट ब्रो पेन्सिलचा देखील वापर करू शकता.

फाउंडेशन- पावसाळ्यात फाउंडेशन करणे टाळनेच योग्य आहे. पाण्याने किंवा घामाने चेहरा ओला झाल्यास चेहऱ्यावर फाउंडेशन निघून जातो त्यामुळे त्याच्या ऐवजी लूज पावडर चा वापर करू शकता.

लिपस्टिक- पावसाळ्यात झोपताना ओठांना हलकीशी कोल्ड क्रीम लावावी. त्याने ओठ मुलायम राहतील. पावसाळ्या मध्ये ओठांचा मेकअप थोडासा लाईट पण मोहक वाटणारा असणे आवश्यक आहे. भडकपणा येणार नाही याकडे लक्ष असू द्यावे. त्यासाठी पारदर्शक लिप ग्लॉस वापरावा. चांगला लूक टिकवून ठेवण्यासाठी तो दिवसातून अनेक वेळा लावता येऊ शकतो. ग्लॉसी लिपस्टिकपेक्षा मॅटला प्राधान्य द्यावे. पिंक व ब्राउनची विविध शेड्सची निवड तुम्ही करू शकतात. तुम्ही लिप लायनरचा वापर करतांना फक्त ते वॉटरप्रूफ आहे याची खात्री करून घ्यावी. नाहीतर पावसाचे थेंब पडताच ते निघून जाऊ शकतो.

भुवया- पावसाळ्यात भुवया नेहमी व्यवस्थित कोरलेल्या असाव्यात. तसेच त्या क्लियर किंवा टिन्टेड जेलनी सेट करा.

ब्लशर- पावसाळ्यात कोऱ्या चेहऱ्याला ब्लशरने नक्कीच गेटअप येतो. ब्लशरची शेड सिलेक्ट करतांना तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित ब्लेंड होईल असाच निवडावा. पावसाळ्यात क्रीमी व स्पार्कल असलेले ब्लशर सहसा वापरू नये.

अशा प्रकारे पावसाळ्यात मेकअप करीता या टिप्स वापरून तुम्ही आणखी सुंदर व पावसापासुन आपल्या मेकअपची काळजी घेऊ शकता.

पुणे जिल्हा सहकारी बँकेत पदांची भरती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्या आस्थापनेवरील ‘शिपाई’ व ‘ड्राइव्हर’ पदांच्या एकूण १५२ / १५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धीतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे सहकारी बँकेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ संप्टेंबर २०१७ आहे.

क्र.  पदाचे नाव    वयोमर्यादा      शैक्षणिक पात्रता             वेतन
१)     शिपाई        १८ ते ३८      किमान १० वी पास         १३,०००/-
२)    ड्राइव्हर        १८ ते ३८     परवाना धारक व्यक्ती     १४,५००/-
शिपाई पदाची अधिक माहितीसाठी जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://pdccbank.com/pdf/Peon_Final.pdf

ड्राइव्हर पदाची अधिक माहितीसाठी जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://pdccbank.com/pdf/Driver_Final.pdf

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.
http://pdccbank.com/career.aspx

माझी व्यथा

घडी दोन घडीचा प्रश्न नाही,
आयुष्य भराची साथ होती.
ज्यावर विश्वास टाकला मी,
ती एका माणसाची जात होती…

पती त्याचे नाव,
देव त्याला मानत होती.
गणागोताचा त्याग करून,
सोबत त्याच्या राहत होती…

जिवापाड जपले त्याला,
दूर जाऊ नये म्हणून.
त्रास त्याचा सहन केला,
नाराज होवू नये म्हणून…

त्याच्यासाठी मरमर,
कष्ट करत होती.
ओझं माझे होईल तुला,
म्हणून संसार सारा पेलत होती…

सोन्यासारखे दिवस,
चांदीसारखी रात्र होती.
द्रुष्ट कुणाची लागु नये,
म्हणून वारंवार जपत होती…

माझ्यासाठी नाही स्वतः साठी जग,
हेच तुला सांगत होती.
व्यसन तुझे सुटून जावे,
यासाठीच धडपडत होती…

ही अट तुला मान्य नव्हती,
म्हणून सोडून तु गेलास.
भरला पुरला संसार माझा,
मोडुन तु गेलास…

काय मिळाले असे वागुन तुला,
भावना माझी दुखावली होती.
विसरून जाशिल मला तु,
नियती हेच सांगत होती…

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

ब्रा खरेदी करताय मग ह्या टिप्स अवश्य वाचा

bra tips

स्त्रियांच्या रोजच्या वापरात आणि गरजेची वस्तू म्हणजे “ब्रा”. ह्या विषयावर तसं उघड चर्चा होत नाही. एक स्त्री सुद्धा लवकर इतरांसोबत ह्या विषयावर बोलणे टाळतेच. परंतु आजकाल च्या कॉलेज मधील मुली किंवा स्त्रिया यावर चर्चा करताना आढळून येतात. असे असले तरीही ‘ब्रा’ खरेदी करताना लवकर घेऊन तो लपवल्या जातो. कुणी बघितलं नाही पाहिजे असा त्यामागे दृष्टिकोन ! अनेक स्त्रियांना आपल्या साईज पेक्षा लहान मोठ्या ‘ब्रा’ वापरतात. कोणत्या प्रकाराची ब्रा निवडावी हे ब्रा खरेदी करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे.

स्तन मोठे दिसण्यासाठी पॅडेड ब्रा निवडणे योग्य ठरेल. एक्स्ट्रा सपोर्ट साठी ब्रा निवडायची असल्यास अंडरवायर ब्रा निवडणे योग्य ठरेल. स्पोर्ट्स, जिम आणि इतर अॅथलिट उद्देशून ब्रा खरेदी करायची असल्यास स्पोर्ट्स ब्रा निवडा.

ब्रा ऑनलाईन खरेदी करावी का?
आपल्याला जर घरी बसूनच वेगवेगळ्या आणि नवीन डिझाईन व पॅटर्नच्या ब्रा बघायच्या असतील. ऑफर हवी असेल तर ऑनलाईन खरेदी करणे परवडेल. तुम्हाला यासाठी दुकानात जायची गरज नाही . परंतु जर तुम्ही साईज अथवा कलर किंवा तुमचं बजेट कमी असेल तर यासाठी विशेष दुकानांतूनच खरेदी करायला हवी. खरेदी करण्यापूर्वी फिटिंग आणि कंफर्टसाठी ट्रायल घ्यायला हरकत नाही. जर आपण ब्रँड, साइज आणि प्रकाराबद्दल ठाम असाल तरच ऑनलाईन खरेदीचा विचार करा.

कम्फर्ट फील
ब्रा अशी निवडा ज्यात आपण मोकळा श्वास घेऊ शकाल. तुम्हाला कम्फर्ट फील होत असेल अशीच ब्रा घ्या. अतिटाइट ब्रा घातल्याने श्वास घ्यायला तर त्रास होतोच स्कीनवर त्याचा परिणाम होतो. तसेच आपण ब्रा ही शरीर झाकण्यासाठी वापरत असल्याने ज्या ब्रातून आपले स्तन बाहेर निघत असतील अशी ब्रा खरेदी करणे टाळा.

स्ट्रीप लूज
ब्रा ची स्ट्रीप लूज असल्याने खांद्यावरून सरकत राहते. अशात स्ट्रीप टाइट करून साइज नीट करा.

वाकून बघा
ब्रा घातल्यावर पुढील बाजूला वाकून बघा की आपले स्तन बाहेरच्या बाजूला निघत तर नाहीये. असे असल्यास ती ब्रा आपल्यासाठी फीट नाही.

दोन्ही बाजू चेक करा
डाव्या आणि उजव्या बाजूला वळून बघा. साइडहून स्किन बाहेर निघत असल्यास त्याची फिटिंग योग्य नाही.

आईचा लाडका गण्या

बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ….??
गण्या :- दोघे पण .
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
गण्या:- तरीपण दोघेच आवडतात
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार?
गण्या:- पॅरीस
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार …??
गण्या:- लंडनला
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
गण्या:- नाय , तस काय नाही ?
बाबा:- तर मग काय ?
गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार

पिंपळावरच भूत

शाळेला सुटी लागली की गावाकडं जायचो. तिथे अमोल,सुरज,विक्या आणि मी अशी आमची चांडाळ चौकडी होती .दिवस उजाडला की, सगळे आमच्या अंगणात हजर व्हायचे. गावी गेल की, दरवेळी मला सगळे भूताखेताच्या गोष्टी सांगायचे. मला जाम इंटरेस्ट होता यात. “एके दिवशी मी सगळ्यांना जमवल आणि मला भुत बघायचं आहे असं सांगितलं. यावर सगळ्यांनी माझ्याकडे करंट लागल्यासारख बघितलं, “वैभ्या खुळा झालायस का लेका,म्हणे भुत बगायचं आहे,” अमोल म्हणाला.

“अरे खरच मला बघायचं आहे काय आहे ते” यावर विक्या म्हणाला, “शाळेजवळच्या पिंपळाखाली अमावस्येच्या राती बारानंतर भुत येतंय असं सगळी म्हणत्यात जा आणि बग जा” यावर सुरज्यान त्याला एक बुक्की घातल. ,“लेका का मारतोस का काय त्याला?” “

ठरलं तर येत्या अमावसेला मी त्या पिंपळाखाली भुत बघायला जाणार” मी म्हणालो. नाही होय करत अखेर सगळे जण त्या पिंपळाखाली जायला तयार झालो. चार दिवसानंतर अमावस्या होती. घरातून सोडणार नाहीत म्हणून आम्ही चार दिवस रोज शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या गावदेवीच्या देवळात झोपायला जाऊ लागलो. देवळात आमच्या शिवाय गुरवाच कुटुंब झोपायला होत. गुरव रोज रात्री आम्हाला भूताखेतांच्या गोष्टी सांगायचा. शेजारच्या गावची पुजा करून परतताना त्याला रात्र झाली आणि चकव्याने त्याला कस चकवल,असे एक ना अनेक किस्से तो अगदी रंगवून सांगायचा. रात्रीची वेळ असल्याने आम्हालाही भीती वाटायची.एकमेकाला चिटकून आम्ही झोपी जायचो.

रोज किस्से ऐकल्यामुळे आता मला भूत या गोष्टीवर विश्वास बसायला लागला होता.दुसऱ्याच दिवशी अमावस्या होती.रात्री पिंपळाच्या झाडाखाली जायचे होते.जावं की नाही याबाबत आता माझे दुमत होत होते मोठ्या फुशारकीने सगळ्यांना मला भुत बगायचे आहे सांगितले होते. आता माघार घेतली तर सगळे माझ्यावर हसतील म्हणून मी शेवटी,काय होतंय बघू जायचेच भुत बघायला असे ठरवले. देवळाकडे गेलो,अजून विक्या,अमोल,सुरज्या आले नव्हते. येतील की नाही….मला टांग देतील का. बर होईल नाही आले तर आपण उद्या त्यांच्यावरच ढकलू, तुम्हीच आला नाही नाहीतर मी जाणार होतो पिंपळाखाली. पण एक एक करून सगळे हजर झाले.

साडेअकरा झाले तसे सगळ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली.देवळापासून काही अंतरावर शाळा होती.शाळेच्या जवळच ते पिंपळाच झाड होत. झाडाकडे जाणाऱ्या वाटेवर सगळीकडे अंधार पसरला होता. कुठेही नावाला सुद्धा प्रकाश नव्हता. नुसती अंधुकशी पायवाट दिसत होती. त्यात रातकिडे किरकीर करत होते. मधेच एखादे कुत्रे भुंकत होत. भयाण असं ते वातवरण होत.आम्ही पिंपळाकडे चालू लागलो. येताना खिश्यातून छोटा टॅार्च आणला होता त्याच्या उजेडात आम्ही चालत होतो. मधेच एखादे कुत्रे केकाटायचे. आम्ही दचकत होतो.सगळे एकामागे एक चालत होतो.एकमेकांचे श्वासोच्छवास स्पष्ट ऐकू येतील एवढी शांतता होती, झाड जवळ येईल तस माझे मन घाबरू लागले. झाडाचा पार जवळ आला तस मी आणि अमोल पारावर चढलो मागे बघतोय तर सुरज आणि विक्या गायब!अमोल घाबरला, “आरं, ती दोघ कुठ गेली? कुठ गायब झाली एकाएकी,वैभ्या लेका पळ”.

त्याने पारावरून उडी मारली आणि तो पळाला. मी सुद्धा त्याच्या मागून उडी मारण्यासाठी पुढे झुकलो तर माझ्या शर्टला मागून कुणीतरी जोरात ओढून धरले. माझे अवसान गळले.भीतीने घाबरगुंडी उडली. माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती.परत एकदा पुढे झुकलो तर परत तेच मागून ओढून धरले. मी पुरता घाबरलो. मोठ्याने रामरक्षा म्हणू लागलो. थंड वारा असून मला घामाच्या धारा सुटल्या. कुठून बुद्धी सुचली आणि मी भुत बघायला आलो असं वाटलं. आता आपलं काही खरं नाही. मी मनातल्या मनात त्या भूताची माफी मागितली आणि मला जिवंत घरी जाऊदे म्हणून विनवणी करू लागलो. एवढ्यात मागे काहीतरी टपकन पडल्याचा आवाज आला. मी घाबरून जोरात पारावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. टर्र्कन आवाज आला आणि मी पारा खाली पडलो. मी मागे न बघत पळत सुटलो. घशाला प्रचंड कोरड पडली होती. कसाबसा देवळापर्यंत पळत आलो तिथे अमोल सुरज विक्या कुणी नव्हते. देवळाचा दरवाजा बंद होता तसाच घरी पळत सुटलो आणि एकदाचा धडपडत घरी पोहचलो. धडाधडा दार वाजवले. गड्याने दार उघडले त्याला ढकलून मी आजीच्या अंथरुणात घुसलो.सकाळी उठलो तेव्हा मला थंडी वाजून ताप आलेला.

रात्रीचा सगळा प्रकार आज्जीच्या कानावर घातला. सुरज,अमोल,विक्या सगळे मला बघायला सकाळी घरी आले. त्यांना पाहिल्या बरोबर मी कचकचीत चार शिव्या दिल्या. अमोल म्हणाला, “अरे मी तुला पळ म्हणून सांगितल की, तू आलाच नाहीस. विक्या आणि सुरज्या आधीच मागे फिरले होते. आम्ही देवळाजवळ तुझी वाट पाहिली. तू काय आला नाहीस म्हणून घाबरलो आणि घरी गेलो”. मी माझ्यासोबत काय झाल ते सांगितल.

एवढ्यात गुरव एका फडक्यात गुंडाळलेले घड्याळ घेऊन आला.तो म्हणाला पिंपळाजवळ पडले होते.सकाळी पुजेला गेलेलो तेव्हा सापडलं. तुझ्या हातात बघितल होत, “घड्याळ तर माझेच आहे आणि हा माझ्या शर्टचा तुकडा आहे,” मी म्हणालो. आम्ही सगळे पिंपळा जवळ पोहचलो.तिथले दृश्य पाहून मला सगळा प्रकार लक्षात आला आणि मी हसू लागलो. त्या झाडाला कुणीतरी खिळा मारला होता.त्या खिळ्याला रात्री माझा शर्ट अडकून फाटला होता. त्या झाडाची वाळलेली फांदी पडल्याने टपकन असा आवाज आला होता. सगळ्या प्रकाराचा उलगडा झाल्याने बाकीचे पण हसू लागले.

“भूतबित काही नसत रे आपल्या मनाची भीती आपल्याला अधिक घाबरवते” मी त्यांना समजावत होतो. पण काल रात्री माझी किती टरकलेली ते मलाच माहिती.

– निशा सावरतकर

पिंपळावरच भूत

शाळेला सुटी लागली की गावाकडं जायचो. तिथे अमोल,सुरज,विक्या आणि मी अशी आमची चांडाळ चौकडी होती .दिवस उजाडला की, सगळे आमच्या अंगणात हजर व्हायचे. गावी गेल की, दरवेळी मला सगळे भूताखेताच्या गोष्टी सांगायचे. मला जाम इंटरेस्ट होता यात. “एके दिवशी मी सगळ्यांना जमवल आणि मला भुत बघायचं आहे असं सांगितलं. यावर सगळ्यांनी माझ्याकडे करंट लागल्यासारख बघितलं, “वैभ्या खुळा झालायस का लेका,म्हणे भुत बगायचं आहे,” अमोल म्हणाला.

“अरे खरच मला बघायचं आहे काय आहे ते” यावर विक्या म्हणाला, “शाळेजवळच्या पिंपळाखाली अमावस्येच्या राती बारानंतर भुत येतंय असं सगळी म्हणत्यात जा आणि बग जा” यावर सुरज्यान त्याला एक बुक्की घातल. ,“लेका का मारतोस का काय त्याला?” “

ठरलं तर येत्या अमावसेला मी त्या पिंपळाखाली भुत बघायला जाणार” मी म्हणालो. नाही होय करत अखेर सगळे जण त्या पिंपळाखाली जायला तयार झालो. चार दिवसानंतर अमावस्या होती. घरातून सोडणार नाहीत म्हणून आम्ही चार दिवस रोज शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या गावदेवीच्या देवळात झोपायला जाऊ लागलो. देवळात आमच्या शिवाय गुरवाच कुटुंब झोपायला होत. गुरव रोज रात्री आम्हाला भूताखेतांच्या गोष्टी सांगायचा. शेजारच्या गावची पुजा करून परतताना त्याला रात्र झाली आणि चकव्याने त्याला कस चकवल,असे एक ना अनेक किस्से तो अगदी रंगवून सांगायचा. रात्रीची वेळ असल्याने आम्हालाही भीती वाटायची.एकमेकाला चिटकून आम्ही झोपी जायचो.

रोज किस्से ऐकल्यामुळे आता मला भूत या गोष्टीवर विश्वास बसायला लागला होता.दुसऱ्याच दिवशी अमावस्या होती.रात्री पिंपळाच्या झाडाखाली जायचे होते.जावं की नाही याबाबत आता माझे दुमत होत होते मोठ्या फुशारकीने सगळ्यांना मला भुत बगायचे आहे सांगितले होते. आता माघार घेतली तर सगळे माझ्यावर हसतील म्हणून मी शेवटी,काय होतंय बघू जायचेच भुत बघायला असे ठरवले. देवळाकडे गेलो,अजून विक्या,अमोल,सुरज्या आले नव्हते. येतील की नाही….मला टांग देतील का. बर होईल नाही आले तर आपण उद्या त्यांच्यावरच ढकलू, तुम्हीच आला नाही नाहीतर मी जाणार होतो पिंपळाखाली. पण एक एक करून सगळे हजर झाले.

साडेअकरा झाले तसे सगळ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली.देवळापासून काही अंतरावर शाळा होती.शाळेच्या जवळच ते पिंपळाच झाड होत. झाडाकडे जाणाऱ्या वाटेवर सगळीकडे अंधार पसरला होता. कुठेही नावाला सुद्धा प्रकाश नव्हता. नुसती अंधुकशी पायवाट दिसत होती. त्यात रातकिडे किरकीर करत होते. मधेच एखादे कुत्रे भुंकत होत. भयाण असं ते वातवरण होत.आम्ही पिंपळाकडे चालू लागलो. येताना खिश्यातून छोटा टॅार्च आणला होता त्याच्या उजेडात आम्ही चालत होतो. मधेच एखादे कुत्रे केकाटायचे. आम्ही दचकत होतो.सगळे एकामागे एक चालत होतो.एकमेकांचे श्वासोच्छवास स्पष्ट ऐकू येतील एवढी शांतता होती, झाड जवळ येईल तस माझे मन घाबरू लागले. झाडाचा पार जवळ आला तस मी आणि अमोल पारावर चढलो मागे बघतोय तर सुरज आणि विक्या गायब!अमोल घाबरला, “आरं, ती दोघ कुठ गेली? कुठ गायब झाली एकाएकी,वैभ्या लेका पळ”.

त्याने पारावरून उडी मारली आणि तो पळाला. मी सुद्धा त्याच्या मागून उडी मारण्यासाठी पुढे झुकलो तर माझ्या शर्टला मागून कुणीतरी जोरात ओढून धरले. माझे अवसान गळले.भीतीने घाबरगुंडी उडली. माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती.परत एकदा पुढे झुकलो तर परत तेच मागून ओढून धरले. मी पुरता घाबरलो. मोठ्याने रामरक्षा म्हणू लागलो. थंड वारा असून मला घामाच्या धारा सुटल्या. कुठून बुद्धी सुचली आणि मी भुत बघायला आलो असं वाटलं. आता आपलं काही खरं नाही. मी मनातल्या मनात त्या भूताची माफी मागितली आणि मला जिवंत घरी जाऊदे म्हणून विनवणी करू लागलो. एवढ्यात मागे काहीतरी टपकन पडल्याचा आवाज आला. मी घाबरून जोरात पारावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. टर्र्कन आवाज आला आणि मी पारा खाली पडलो. मी मागे न बघत पळत सुटलो. घशाला प्रचंड कोरड पडली होती. कसाबसा देवळापर्यंत पळत आलो तिथे अमोल सुरज विक्या कुणी नव्हते. देवळाचा दरवाजा बंद होता तसाच घरी पळत सुटलो आणि एकदाचा धडपडत घरी पोहचलो. धडाधडा दार वाजवले. गड्याने दार उघडले त्याला ढकलून मी आजीच्या अंथरुणात घुसलो.सकाळी उठलो तेव्हा मला थंडी वाजून ताप आलेला.

रात्रीचा सगळा प्रकार आज्जीच्या कानावर घातला. सुरज,अमोल,विक्या सगळे मला बघायला सकाळी घरी आले. त्यांना पाहिल्या बरोबर मी कचकचीत चार शिव्या दिल्या. अमोल म्हणाला, “अरे मी तुला पळ म्हणून सांगितल की, तू आलाच नाहीस. विक्या आणि सुरज्या आधीच मागे फिरले होते. आम्ही देवळाजवळ तुझी वाट पाहिली. तू काय आला नाहीस म्हणून घाबरलो आणि घरी गेलो”. मी माझ्यासोबत काय झाल ते सांगितल.

एवढ्यात गुरव एका फडक्यात गुंडाळलेले घड्याळ घेऊन आला.तो म्हणाला पिंपळाजवळ पडले होते.सकाळी पुजेला गेलेलो तेव्हा सापडलं. तुझ्या हातात बघितल होत, “घड्याळ तर माझेच आहे आणि हा माझ्या शर्टचा तुकडा आहे,” मी म्हणालो. आम्ही सगळे पिंपळा जवळ पोहचलो.तिथले दृश्य पाहून मला सगळा प्रकार लक्षात आला आणि मी हसू लागलो. त्या झाडाला कुणीतरी खिळा मारला होता.त्या खिळ्याला रात्री माझा शर्ट अडकून फाटला होता. त्या झाडाची वाळलेली फांदी पडल्याने टपकन असा आवाज आला होता. सगळ्या प्रकाराचा उलगडा झाल्याने बाकीचे पण हसू लागले.

“भूतबित काही नसत रे आपल्या मनाची भीती आपल्याला अधिक घाबरवते” मी त्यांना समजावत होतो. पण काल रात्री माझी किती टरकलेली ते मलाच माहिती.

– निशा सावरतकर

 

ही एक काल्पनिक कथा असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे.  एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.  अशा कथा तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी एम एच २८.इन चे ऍप आजच खालील लिंकवर जाऊन प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करा.   तुमच्या जवळ सुद्धा अशा कथा असतील आणि त्या प्रकाशित करायच्या असतील तर आम्हाला इमेल करा पुढील पत्त्यावर : mh28.in@gmail.com

 

प्ले स्टोअर लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=in.mh28

MAHAGENCO मध्ये लिपीक पदाच्या १०७ जागा.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय, मुंबई, येथील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. (MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत निम्नस्तर लिपीक पदाच्या १०७ जागा असून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी अंतिम तारीख २२ संप्टेंबर २०१७ आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://recruitment.mahagenco.in/Adv_11Sept2017/PdfDocuments/LDC%20ADVT%2001.09.2017.pdf

 

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

http://recruitment.mahagenco.in/Adv_11Sept2017/Home/ListOfExam.aspx

तो गाडीवाला नक्की कोण होता ?

घरी संध्याकाळचा दिवा लागला आणि इतक्यात फोन खणाणला. तिन्ही सांजेला घरात आली एक मरणाची बातमी… ह्या बातमीने घरी सर्वांच्याच काळजाचा ठोका घेतला. घरातले वातावरण अचानक शांत झाले. नातेवाईकांमधील अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मरणाची बातमी होती ही !! त्यामुळे त्या सोयऱ्याच्या गावाला जायची गडबड सुरु झाली. रात्रीच्या गाडीने निघायचे होते. त्यामध्ये आम्ही फार लहान होतो. आम्हांला घरी सोडूनही कसे जावे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत घेऊनही कसे जावे ? हाच प्रश्न बाबांना पडला होता. एकवेळ बाबा म्हणालेही, तुम्ही भावंडे घरीच राहा, आम्ही जाऊन उद्या परत येतो. पण आपल्या वासरांना एकटे सोडून निघेल ती माय कसली. तिने हट्टच धरला ! त्यांना एकटे सोडून जायचे नाही, आपल्या सोबतच घ्यायचे. मग अशा वेळेला नाही म्हणणे तरी कुठे जमणार होते. म्हणून त्यांनाही लगेच होकार दिला आणि आवरून निघालोच आम्ही गावी जायला.

रात्रीची एकच ट्रेन होती आम्हांला त्या गावी जाण्यासाठी, तिनेच लवकर पोहोचू या विचाराने ती ट्रेन पकडली. कारण मरते वेळी आपण तिथं नव्हतो निदान मयतीला (मयत विधीला) तरी हजर पाहिजेच, ह्याच विचाराने बाबांची घाई सुरू होती. रात्रीचा प्रवास, कडाक्याची थंडी आणि झोपेची घाई, सर्व काही एकदमच. पण प्रसंग आणि ओढच अशी होती की, काही केल्या पोहोचायचेच होते लवकर. ते गावही तसे फार दूरच होते आणि ट्रेनने जायचे तर एका दुसऱ्या स्टेशनला उतरून पुढे मिळेल त्या गाडीने प्रवास करायचा होता.

रात्री अंदाजे २ वाजता आम्ही त्या स्टेशनवर उतरलो . सर्वत्र अंधार पसरलेला. स्टेशनही असे सामसूम होते. बराच वेळ स्टेशनच्या बाहेर थांबलो, पण चिटपाखरूही दिसत नव्हते. पुढे जाण्यासाठी एखादी गाडी येते का ? याची आम्ही वाट पाहत होतो. तितक्यात एक ट्रक समोरून आला. थोडं बरं वाटलं, चला जास्त वाट पहावी लागली नाही. पण जसं ठरवलं तसं न होणेच, असेच काही आज नशिबी होते. बाबांनी ट्रक वाल्याला थांबवले, त्याला सांगितले की आम्हांला अमुक-तमुक गावी जायचे आहे, पण तो म्हणाला, “”म्या तर दुसरीकडं चाललोया बघा, पण तुम्हांसनी त्या फाट्यावर सोडितो. बघा जमतंय का. तिथून गाव फार लांब नाय. तिथून कोणचंही वाहन (गाडी) भेटलं तुमासनी”

एवढ्या रात्री दुसरी गाडी मिळणेही अशक्य होते म्हणून त्या ट्रकने जायचे बाबांनी ठरवले आणि आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. काही अंतर कापताच त्या ड्रायवर ने सांगितल्या फाट्यावर येऊन पोहोचलो. आम्हांला तिथे उतरवून तो ट्रक त्याच्या मार्गी लागला. फाट्यावर सर्वदूर अंधार पसरलेला. ज्या दिशेला जायचे होते, त्या दिशेच्या रस्त्याच्या कडेला आम्ही थांबलो होतो. पुढे जाण्यासाठी काही गाडी येते का याची वाट पाहत. पण दूर दूरवर कुठलीही गाडी येताना दिसत नव्हती. फार अंधार होता म्हणून साहजिकच आईला अगदी खेटून आम्ही उभे होतो आणि ह्या अंधारात आम्ही घाबरू नये ह्याची ती देखील काळजी घेत होती. तितक्यात जणू दोन काळ्या सावल्या आमच्या पुढ्यातून समोरच्या झाडीत शिरल्याचे जाणवले. आई-बाबा, आम्ही सर्वांनी ते दृश्य पाहिले, अगदी छातीत धडकीच भरली. काय होते ते ? कोण गेले तिकडे ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात. पण आईचा माझ्या हातावरच्या घट्ट झालेला हात पाहून, नक्कीच ते काहीतरी विचित्र होते हे मला कळून चुकले. त्यात तीही पूर्ण घाबरली होती हे ही मला समजले.

त्यावेळेस माझे वय इतके होते की, भुतं तर दूरच पण नुसता अंधार जरी म्हंटला तरी चड्डी ओली व्हायची. त्यातच पहिल्यांदा असे काही पाहिले, जे खरोखर भयानक होते. कारण आम्ही सोडून तिथे कोणीही दुसरे नव्हते आणि अचानक त्या दोन सावल्या आमच्या समोरून त्या गर्द झाडीत शिरल्या.बाबांनी देखील सावध पवित्र घेतला होता. हे होत नाही तर तर लगेच आमच्या मागे कुणीतरी दोनदा टाळ्या वाजवल्याचा आवाज आम्हांला आला आणि हा नक्कीच भास नव्हता. आता तर आमची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. कारण घडलेल्या घटना नक्कीच साधारण नव्हत्या, पण एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत… पुन्हा आमच्या समोरच्या झाडीत, पण थोड्या दूरवर आम्हाला त्या दोन काळ्या सावल्या धावताना दिसल्या. मी तर एवढा घाबरलो की तिथेच आई-आई ओरडत तिला घट्ट पकडू लागलो. आम्हांला सावरण्यासाठी लगेच बाबा म्हणाले, ” एखादं कुत्रं बित्रं असलं तिकडं दुसरं कुणी नाहीये तिकडं”.

बाबा आमचे लक्ष्य वळवीत होते, हे आम्हांला कळून चुकले होते. तितक्यात पुन्हा तोच टाळ्यांचा आवाज आणि ह्यावेळेस आमच्या कानाच्या फारच जवळ. आम्ही सारेच दचकलो. आईने लगेच देवाचा धावा केला आणि जोरजोरात मोठ्या आवाजात देवांचे नाव घेऊ लागली. कारण आमच्या बरोबर जे घडत होते, ते नक्कीच काहीतरी विपरीत होते. पुढ्याच क्षणाला त्या दोन काळ्या आकृत्या दूरवरून कसले तरी हातवारे करत आमच्या दिशेने चालत यायला लागल्या. आतातर बाबांचेही भान हरपले होते. तेही अगदी आम्हांला येऊन खेटून उभे राहिले. कर्रर्रर्रर्रर्रर्रर…. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र….. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. आवाज कानी ऐकू येऊ लागला आणि मधेच पुन्हा तो टाळ्यांचा आवाज. आवाज, टाळ्या, सावल्या…. आवाज, टाळ्या, सावल्या… आवाज, टाळ्या, सावल्या…. त्या सामसूम ठिकाणी, अंधाऱ्या रात्री कुठला खेळला जात होता हेच कळत नव्हते आणि ह्यावर करायचे तरी काय ? हाच प्रश्न आम्हां सर्वांना पडला होता. त्या काळ्या आकृत्या आमच्याच दिशेने येत होत्या. इकडे आईचे देवाचे नामस्मरण चालूच होते. ती जोरजोरात देवाचा धावा करू लागली.

तितक्यात जोरजोरात हॉर्न वाजवत एक अँबेसिडर आम्हांला आमच्या दिशेला येताना दिसली. दूरवरून तिची दिसणारी हेड लाईट हा आशेचा किरण म्हणावा की निराशेचा, हे काहीच कळत नव्हते. कारण रात्रीच्या वेळेस जिथे अगदी सुमसाम मोकळा रस्ता आहे, त्या ठिकाणी ही व्यक्ती जोर जोरात हॉर्न वाजवत का येत होती ? आम्ही लगेच रस्त्याच्या कडेने त्या गाडीला हात करू लागलो. ती गाडी आली आणि नेमकी आमच्या समोर येऊन थांबली. एक पांढरी शुभ्र कार, त्या अंधाऱ्या रात्रीत मस्त चमकत होती. बाबा लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला ला अमुक-तमुक गावी जायचे आहे असे सांगितले. पण तेही काही विचित्रच होते. एक पांढरी शुभ्र कार, जोरजोरात हॉर्न वाजवत अचानक आमच्या पुढ्यात येऊन थांबते. त्या गाडीच्या वाहन चालकाचा पेहराव म्हणावा तर, अगदी पांढरे कपडे घातलेली जणू काही मोठी आसामीच होती. अगदी गोरापान, सरळ उभं नाक असलेला असं त्याचं वर्णन होतं. साधारणतः गावी सगळेच पांढरा पोशाख घालतात, पण ह्या महाशयांचा पेहराव काही वेगळाच होता. त्याने जरूर आमच्या समोर गाडी थांबवली, पण त्याने मान वळवून आमच्याकडे एकदाही पाहिले नाही. तो एकटक सरळच पाहत होता, त्याच दिशेला ज्या दिशेने त्या काळ्या सावल्या आमच्याकडे येत होत्या. बाबा पुढे सरसावले त्यांनी त्याला सांगितले की, आम्हांला त्या-त्या गावी जायचे आहे, त्यावर तो लगेच म्हणाला, “”मला माहित आहे तुम्हांला कुठे जायचंय ते, बसा लवकर गाडीत”.

पण एवढेही बोलताना देखील त्याने बाबांकडे काही पाहिले नाही. आम्ही लगेच गाडीत शिरलो. पण बसता – बसता आईने आणि मी मागे वळून पाहिले, तर चमत्कार असा की त्या दिसणाऱ्या सावल्या, आकृत्या जणू कुठेतरी नाहीशा झाल्या होत्या. बाबा बऱ्याच गोष्टी काढत त्या व्यक्ती सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती व्यक्ती काही केल्या बोलायचं नावं घेत नव्हती. एकदाही मान वळवून बाबांकडे अथवा आमच्याकडे पाहत नव्हती. माघे बसलेली आई आणि मी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही आवभाव नव्हते. तो फक्त पुढे बघत गाडी चालवत होता. बराच बोलायचा एकांगी प्रयत्न केल्यानंतर, आता बाबा शांत झाले होते. पण त्या गोष्टीने आमची धाकधूक फारच वाढली होती. पुढे आमचे काय होणार, हे त्या ईश्वरालाच ठाऊक होते आणि त्याचाच धावा आई सतत करत होती. ह्या सर्व घटनेत सकाळचे ५ केव्हा वाजले कळले नाही. काळरात्र बाजूला सारत पहाटेचा प्रकाश तिची जागा घेऊ लागला आणि आम्ही शेवटी त्या गावी पोहोचलो. जसे पोहोचलो तसे पटकन आम्ही सारे गाडीच्या खाली उतरलो. बाबांनी त्या व्यक्तीला पैसे देऊ केले, पण ते न स्वीकारता आणि बाबांकडे न बघता, फक्त हात नकारार्थी हात हलवत तो व्यक्ती गाडी पुढे घेऊन निघून गेला.आम्ही सुखावलो होतो, कारण सरतेशेवटी सुखरूप आम्ही त्या गावाच्या स्टँडवर पोहोचलो होतो. पण एक प्रश्न मात्र, आमच्या सर्वांच्या मनात तसाच अनुत्तरित राहिला… हा गाडीवाला नक्की होता कोण ?

videos

Gallery