रात्री १२ वाजता उज्जैन रोडवर काय घडलं ?

माझे बाबा पेक्षाने वकिल आहेत. त्यामुळे कोर्टच्या केसच्या कामात त्यांना नेहमी बाहेरगावी जावे लागते पण कामामुळे परतायला कितीही उशीर झाला, तरी ते परगावात कधी मुक्काम करत नसत. त्यादिवशी असेच झाले… एका कोर्ट केसच्या बाबतीत माझे बाबा, उज्जैनला गेले होते. उज्जैन ते आमचे शहर साधारण ३ ते ४ तासांचे अतंर; सर्व कामे पार पाडून, घरी परतायला रात्रीचे १० वाजले. काम नीट संपवून बाबा घराकडे निघाले परंतु उज्जैनच्या नाक्याजवळ येताच त्यांच्या गाडीतील पेट्रोल संपले. कामाच्या नादात त्यांच्या लक्षातच आले नाही. अवतीभोवती कुठेही पेट्रोल पंप दिसत नव्हता. आता काय करायचे याच्या विचारात असतानाच त्यांना तेथील पोलीस स्टेशन दिसले. हायकोर्टचे वकिल असल्यामुळे त्यांची पंचक्रोशीतील पोलीस स्टेशनात चांगलीच ओळख होती.

काही मदत होईल, म्हणून बाबा पोलीस स्टेशनात गेले. पण र्दुदैवाने.. आज पेट्रोल पंपवाल्याचा संप असल्याचे कळाले. तरीही तेथील पोलीसानी त्यांच्या गाडीतील पेट्रोल काढून बाबांची घरी जाण्याची सोय करुन दिली. पण या सगळ्यात बराच वेळ गेला. आणि पोलीसांचे आभार मानून बाबा आपल्या मार्गाला लागले. रात्री १२-१ ची वेळ असेल, उज्जैन आता खुप मागे पडले होते. बाबा आता एका र्निमनुष्य रस्त्याला होते. काही अंतर कापल्यानंतर गाडीच्या समोरच्या प्रकाशझोतात त्यांना एक विचित्र दृश्य दिसल. गाडी थांबवून पाहिले तर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या पोटात खोल जखम होती तलवारीने घुपसल्या गत, शरीरावर अनेक वार केले होते संगळ्या शरीरातून रक्ताचा लोंढा वाहत होता. तो एक सारखा “पाणी पाणी” उच्चारात होता, बाबांनी त्याला पाजले.. त्याच्या चेहरावर शिंपडून त्याला नीट शुध्दीवर आणले. त्याला लवकरच हॅास्पीटल मध्ये हलवणे गरजचे आहे हे ओळखून बाबांनी त्याला मोटारसायकल वर मागे बसवले. पडू नये म्हणून माझ्या पोटाला आणि खांद्याला निट पकड असे सांगुन बाबांनी गाडी चालु केली.

पुढच्या गावातच एक हॅास्पीटल होते. बाबा घाईने तिकडे निघाले, तो शुध्दीवर राहावा म्हणून बाबा एकसारखे त्याचाशी बोलत होते. पण तो काहीच बोलत नव्हता. आता ते गाव काहीच अंतरावर असतानाच बोलता बोलता अचानक बाबाना तो गाडीवर नसल्याचे जाणवले. गाडी थांबवून मागे पहिले तर तो मागे नव्हताच. रस्त्यावर दुरवर नजर टाकली तर लांबपर्यत कुणीच नव्हते, बेशुध्द होउन कुठे पडला की काय हे पाहण्यासाठी बाबा मागे फिरले.

गाडीच्या प्रकाशात जिथपर्यंत नजर जात होती. रस्त्यावर कुठेच कुणी दिसत नव्हते. त्याला शोधत ते खुप मागे आले, कुठे गेला,काही कळायला मार्ग नाही. मागे येत असताना अचानक काही अंतरावर मानवाकृती सारखे दिसले. घाई करुन बाबा तेथे गेले आणि पाहिले तर तोच माणूस ! बाबा त्याला उचलुन मोटारगाडी वर बसवणार ईतक्यात. त्यांच्या लक्षात आले, गेल्या वेळेस याला येथुनच उचला होता मी. परत हा येथे कसा काय…नाही भास होत असेल असा विचार करुन त्याला पुन्हा गाडी वर बसवले. पण यावेळेस उज्जैनच्या मोठ्या हॅास्पीटल मध्ये नेवू असा विचार करुन बाबा उज्जैनकडे निघाले, पण यावेळ बाबा त्याचाशी बोलत नव्हते त्याच्या मनात वेगळेच विचार चालु होते. मघाशी हा माणूस कधी पडला झाला आणि परत त्याच जागेवर कसा आला ? त्यांना आता हा काही वेगळा प्रकार असलेल्याचे वाटत होते. तो माणुस अजुनही मागे असल्याचे त्यांना जाणवत होते. त्याचे त्यांचे सगळे कपडे रक्ताने माखलेले होते. बाबांना आता भिती वाटत होती त्यांच्या सर्व अंगाला भितीने घाम फुटला.

आता खुप अंतर कापल्यानंतर ही तो माणुस त्यांच्या बरोबरच होता बाबांच्या मनात विचार आला. हा अजुनही आपल्या सोबत आहे म्हणेज मला मघाशी भासच झाला असणार! सुटकेचा निश्वास टाकुन बाबा काही अंतर पुढे गेले असतील. तोच एका क्षणातच त्यांना मागे कोणी नसल्याचे जाणवले. त्यांनी मागे वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हते आता मात्र बाबांना कळून चुकले की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. ते खुप घाबरले तेथुन बाबांनी त्वरित परत पोलीस स्टेशनच गाठले ते जावून त्यांनी घडलेली संगळी घटना संगितली. आपले रक्ताने माखलेले कपडे दाखवण्यासाठी त्यांच्या कपड्यांकडे पहिले तर त्यावर रक्ताचा एकही डाग नव्हता.

सगळ्यांना कळुन चुकल होतं की काय प्रकार आहे तर. कारण गेल्याच आठवड्यात त्या रोड वर एका माणसाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली होती. बाबांनी त्या दिवशी पोलिस स्टेशनलाच मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी घरी येऊन आम्हाला या घटने विषयी संगितले.

मेघा, उज्जैन 

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.