बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित, अत्याधुनिक सुविधायुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्याती प्राप्त THE JAWED HABIB Unisex Salon रिया वेलनेस द्वारा संचालित प्रशस्त फॅमिली सलूनचे शुभारंभ.
रिया वेलनेस अंतर्गत सौ. स्मिता चेकटकर व श्री. महेश चेकटकर बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित, अत्याधुनिक सुविधायुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्याती प्राप्त THE JAWED HABIB Unisex Salon सेवा देणार आहे. शुभारंभ दिनांक २९ जुन २०१८ ला सकाळी ११ वाजता असून स्थळ रिया वेलनेस डिएसडी मॉल, इलाहाबाद बँकेच्या बाजूला, चैतन्यवाडी, बुलडाणा येथे उदघाटन मा. जावेद हबीब सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. राधेश्यामजी चांडक संस्थापक, अध्यक्ष बुलडाणा अर्बन परिवार तसेच मा. श्री. सुकेशजी झंवर सिएमडी, बुलडाणा अर्बन यांची उपस्थिती राहणार आहे. या शुभारंभामध्ये मा. आ. श्री. हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा, मा. आ. श्री. चैनसुखजी संचेती – मलकापूर, मा. आ. डॉ. संजयजी कुटे – जळगांव जामोद, मा. आ. श्री. आकाशजी फुंडकर – खामगांव, मा. श्री. धृपतरावजी सावळे – माजी आमदार, मा. सौ. उमाताई तायडे – अध्यक्ष जिल्हा परिषद, मा. श्री. विजयराजजी शिंदे – माजी आमदार, मा. नजमुन्नीसा सज्जाद – अध्यक्ष नगर परिषद बुलडाणा, मा. सौ. श्वेताताई महाले – सभापती विशेष उपस्थिती राहणार आहे.
बुलडाण्यात प्लास्टिक बंदीमुळे नागरिकांची तारांबळ
राज्य शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी चा मोठा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी पण होतांना दिसून येत आहे. प्लास्टिक बंदी नंतर सोलापूर, पुणे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई झाली तर मुंबई मध्ये सुद्धा अनेक जण प्लास्टिक बंदी झाल्यानंतर कारवाईचे बळी पडले. संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी सुरु झालेली असून बुलडाणा शहरात सुद्धा याची सुरुवात झालेली दिसून आली.
प्लास्टिक बंदी झाल्यांनतर अनेक दुकान किंवा भाजी विक्रेत्यांचा खोळंबा झालेला दिसून आला. त्यापॆक्षा जास्त ग्राहकांची गैरसोय झालेली दिसून आली. नेहमीप्रमाणे फक्त नावापुरती बंदी असून छुप्या पद्धतीने का होईना प्लास्टिक बॅग मिळेल या आशेवर अनेक जण तर काही जण माहिती नसल्याने व नेहमीच्या सवयीनुसार बाजारात, दुकानात गेले परंतु घेऊन जायला कुठलंच साधन नसल्याने खाली हाताने परत जावे लागले तर काही ग्राहकांना इतर सोय करावी लागली. सुट्ट्या दुधाची विक्री करणाऱ्या अनेक दुकानांवर प्लास्टिक कॅरीबॅग मिळत नसल्याने ग्राहक पुन्हा घरी जावून भांडे घेऊन येत होते तर अनेक जण वेळेअभावी कंपनीचे पिशवीबंद दूध घेऊन जाणे पसंद करीत होते. प्लास्टिक चा वापर करतांना दिसून आल्यास दंडही तेवढाच प्रचंड प्रमाणात आकारण्यात येत असल्याने कुणीही हा धोका पत्करायला तयार नाही. शहरातील अनेक मटण विक्रेत्यांची आणि ग्राहकांची यावेळी मोठी गोची विशेष करून होतांना दिसून येत होती. अनेक जण दुकानावर जावून हात हलवत परत येत होते आणि घरून स्टीलचा डबा आणि पिशवी घेऊन येतानाचे दृश्य प्रत्येक ठिकाणीच पाहायला मिळत होते.
प्लास्टिक बंदीनंतर सोशल मीडियावर अनेक जोक्स चा पाऊस पडत आहेत आणि जनजागृती सुद्धा आपसूकच होतांना दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेल्या पर्यावरणप्रेमींनी मात्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्लास्टिक बंदी पहिल्यांदा झालेली नाही या आधी सिक्कीम राज्यात 1998 साली प्लास्टिकबंदी करण्यात आली. त्या नंतर सिक्कीम सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकत सरकारी कार्यक्रम आणि कार्यालयांमध्ये पाण्याच्या बाटल्यांवरही बंदी घातली. प्लास्टिक बंदी नंतर सिक्कीम मधील जनतेस अनेक अडचणी आल्या परंतू त्यासुद्धा निकाली निघाल्यात आणि सिक्कीम प्लास्टिक बंदी करणार पहिलं राज्य ठरलं. आता महाराष्ट्र सुद्धा त्या पाठोपाठ अग्रेसर आहे.
पोट साफ होत नाही ?
आज आपण पाहणार आहोत पोट साफ होत नाही ?
या मागचे कारणे, लक्षणे ज्यामुळे तुम्ही या होणाऱ्या त्रासापासून स्वताला रक्षित करू शकाल.आज आपण पाहणार आहोत पोट साफ होत नाही ? या मागचे कारणे, लक्षणे ज्यामुळे तुम्ही या होणाऱ्या त्रासापासून स्वताला रक्षित करू शकाल.बऱ्याच व्यक्तींना होणारा त्रास, पोट साफ न होणे म्हणजे शौचास साफ न होणे अथवा बिलकूल न होणे होय. अथवा पोट अर्धवट साफ झाल्या सारखे वाटणे. ज्यांना शौचास साफ होत नाही अशा लोकांमध्ये मलाशयात जमा झालेला मल योग्यवेळी बाहेर पडला नाही. तर त्यातील पाण्याचा अंश जो मलाला मऊ ठेवत असतो, तो रक्ताच्या प्रवाहात शोषला जातो, त्यमुळे मलाला कठीणपणा येतो. म्हणून मलाला पूढे सरकण्यास त्रास होतो. ज्यावेळी असा कठीण मल पूढे सरकतो, त्यावेळी गुद व गुदनलीकेतील पेशी दुखावल्या जातात. यापासूनच पूढे कालातंराने मुळव्याध व फिशर या आजाराची सुरुवात होते. मलाला शरीरामध्ये केवळ टाकाऊ पदार्थ समजला जातो व त्याचे वेळेवर विसर्जन करणे अत्यावश्यक समजले जात नाही. लोक इतर कामात व्यस्त असतात मल विसर्जनाच्या नैसर्गिक प्रक्रियेला दाबून ठेवतात. त्यामुळे हळूहळू पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता व्हायला या गोष्टी कारणीभूत ठरतात.
काही लोक पोट साफ न होत असल्यामुळे औषधी घेतात त्यांना त्याचा परिणाम लगेच मिळतो म्हणजेच दुसऱ्या दिवशी पोट साफ होते. परंतु असे केल्याने आपणास असणारा हा त्रास नेहमी करता थांबत नसून तो पुनःपुन्हा उद्भवतो.
पोट साफ न होण्याची म्हणजेच बद्धकोष्ठतेची मुख्य कारणे –
१) मलविसर्जनाची नैसर्गिक वेळ टळणे अथवा टाळणे.
२) खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी.
३) एकदा घेतलेला आहार पचण्यापुर्वीच पुन्हा आहार घेणे.
४) नेहमी कोरडे पदार्थ व शिळे पदार्थ आहारात घेणे.
५) नेहमीच फ्रीजचे अथवा थंड पाणी पिणे.
६) फ्रीज मध्ये असलेले थंड पदार्थांचे सेवन करणे.
७) जेवण वेळेवर न करणे.
८) हॉटेल अथवा बाहेर बनणारी तेलकट पदार्थ खाणे.
९) मैद्याच्या पदार्थांचे सेवन करणे.
१०) चहा, कॉफीच्या सेवनामुळे
११) दारूच्या अतिसेवनामुळे
१२) रात्री जागरण करणे, मानसिक तणाव असणे.
१२) गरोदरपणा मुळे
१३) व्यायामाचा अभाव असणे.
१४) काही औषधीच्या दुष्परिणामामुळे देखील हे होऊ शकते.
पोट साफ न होण्याची म्हणजेच बद्धकोष्ठतेची मुख्य लक्षणे –
१) पोट जड वाटणे.
२) मलविसर्जनाच्या वेळी जोर लावावा लागणे.
३) मलविसर्जनास वेळ लागणे.
४) मलविसर्जन व्हावे तशी न होणे.
५) भूक मंद अथवा न लागणे.
६) शांत झोप न लागणे, डोके दुखणे.
७) दुर्गंधी ग्यासेस पास होणे.
८) कामात उत्साह न वाटणे.
९) स्वभाव चिडचिडा होणे.
बँक ऑफ बडोदा मधे प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती
बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. बँक ऑफ बडोद्यात प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकंदरीत ६०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २ जुलै २०१८ आहे.
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :
https://www.bankofbaroda.co.in/writereaddata/Images/pdf/Final-Advertisement-2018-19.pdf
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :
एसटी प्रवासभाड्यात १८ टक्के वाढ होणार !
सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे अखेर एसटी महामंडळाने सुद्धा आपल्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत ३० वाढ होणार हे अपेक्षित होते परंतु प्रवाशांना लक्षात घेता फक्त १८ टक्के होणार आहे. यापुढे पाच रुपये पटीने ही दरवाढ होणार आहे.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत सातत्याने दरवाढ होत आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने ही दरवाढ होत आहे. त्यातच ह्या दरवाढीने नागरीक सुद्धा त्रस्त झाला आहे. अशातच अखेर एसटी महामंडळाने इंधन दरवाढ आणि एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे प्रवास भाड्यात दरवाढ केली आहे. ही भाडेवाढ ३० टक्के होणार होती परंतु प्रवाशांचा विचार करता १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे पाच रुपये पटीने प्रवास भाडे वाढणार आहे. उदा . -म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असे एसटी महामंडळाने कळविले आहे. एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले. यावेळी राज्य शासनाने डिझेलवरील विविध कर माफ करावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांसह वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल, असे संकेत दिवाकर रावते यांनी दिले आहेत.