गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन

आज सकाळी दिल्ली येथून बीडला जाण्यासाठी विमानतळावर जात असताना भारतीय जनता पक्षाचे(भाजप) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन झाले आहे. मुंडे यांच्या निधनाची अधिकृत माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
सकाळी सहा वाजता बीडकडे रवाना होण्यासाठी नवी दिल्ली विमानतळाच्या दिशेने जात असताना मोती बाग परिसरात मुंडे यांच्या गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर मुंडे यांना त्वरित नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बेशुद्ध अवस्थेत होते. उपचारादरम्यान, मुंडे यांना हृद्यविकाराचा झटका आल्याचेही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. भाजप ला मुंडेच्या निधनाने जबरदस्त झटका बसला आहे. गोपीनाथ मुंडे मुंडे हे खरे लोकनेते होते. लोकांसाठी न थकता सातत्याने काम केलं अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी दिली असून त्यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यानी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या गावी बीड येथे आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकूल वातावरण आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आला आहे.