ऑनलाईन शिक्षण (Online Education) कसं असतं ?

what is online education

आपण उच्च शिक्षणासाठी अनेकदा बाहेरगावी जातो. आपल्या घरातील किंवा जवळचे अथवा मित्र-मैत्रिणी बाहेरगावी शिक्षण घेत असतात. जे शिक्षण आपल्याकडे उपलब्ध नाही ते घेण्यासाठी बाहेरगावचा रस्ता पकडावा लागतो. उदा. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी अनेक कोर्सेस, शाळा-कॉलेज आहेत ज्यासाठी आपल्याला तिथे जाऊन शिकावे लागतं. यासाठी पैसा, वेळ आणि राहण्याची सोय अशा प्रत्येक गोष्टींचा विचार करावा लागतो. अनेक जण तर परदेशी जाऊन शिक्षण घेतात. परंतु सर्वाना हे परवडत नाही. त्यामुळे शिक्षण तर घ्यायचं आहे परंतु ते शक्य पण होत नाही अशा परिस्थितीत काय करता येईल ? यासाठी ऑनलाईन शिक्षण (online education) हा पर्याय आहे.

सध्या इंटरनेटचं युग आहे. ऑनलाईन शिक्षण (online education) हे नवीन पिढीचे साधन आहे. यामध्ये आपण कुठे ही असलात तरी आपल्या वेळेनुसार, घरबसल्या आणि कमी खर्चात हवं ते शिक्षण घेता येते. कोर्सेस करता येतात. याच सर्टिफिकेट पण मिळते आणि विशेष म्हणजे एखादी गोष्ट समजली नसेल तर ती पुन्हा बघण्यासाठी उपलब्ध साहित्य मिळते त्यामधून आपण व्यवस्थित शिकू शकतो. या शिक्षणात अभ्यासक्रम हे अंशतः अगर पूर्णतः इंटरनेट, इंट्रानेट अथवा एक्स्ट्रानेट मार्फत शिकवले जातात. देशातील अगर जगातील विद्यार्थ्यांशी देवाणघेवाणीच्या आणि संभाषणाच्या एकमेव क्षमतांचा फायदा विद्यार्थ्यांना पुरवला जातो. व्हिडिओ, थेट ऑनलाईन संभाषण, चर्चा, प्रश्न उत्तरे यांसारख्या गोष्टी घरबसल्या आपल्या कम्प्युटर अथवा आता मोबाईल वरून सुद्धा करता येतात.

परदेशात ऑनलाईन शिक्षण घेण्याकडे जास्त कल आहे. भारतात सुद्धा अनेक जण ऑनलाईन शिक्षण (online education) घेत आहेत. भारतात ऑनलाईन शिक्षण (online education) हे आज प्राथमिक अवस्थेत आहे. जरी अधिकाधिक शैक्षणिक संस्थांनी प्रवेश प्रक्रिया आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याची पद्धत आत्मसात केली असली तरी ऑनलाईन शिकवण्याची पद्धत खूप संथ आहे. अनेक संस्था, कॉलेज त्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेत आहेत.

ऑनलाईन शिक्षण घेण्याचे फायदे:
ऑनलाईन शिक्षणामध्ये जास्त पारदर्शकता, कागदपत्रे, उतारा, जिवंत चर्चा (live discussion), प्रशिक्षण साहित्य सहज उपलब्ध होते.
ऑनलाईन शिक्षणास कमी खर्च येतो.
ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या सोयीनुसार वेळ निवडू शकतो.
यामध्ये तांत्रिक क्षमता विकसित करण्याच्या संधी असतात.
जागतिक साधन आणि ग्रंथालय मिळण्याची शक्यता असते.

आज ऑनलाईन शिक्षण हे सर्वांसाठी सोयीचे आहे. सामान्य विद्यार्थी, उच्च व्यावसायिक, शहरी लोक तसेच आता ग्रामीण लोक किंवा ज्यांच्या हाती मोबाईल आणि इंटरनेट आहे त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे.

ऑनलाईन शिक्षण, इंटरनेट, वेबसाईट, मोबाईल यांसारख्या इतर माहितीसाठी नेहमी भेट देत रहा. एमएच २८.इन ला.