शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिवाळी बोनस

buldana farmer sucide

शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आज बोलतांना म्हणाले, आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्वाचा क्षण आहे. पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफीसाठी राज्यभरातील 77 ते 80 लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून आजपासून प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात होणार आहे.

पहिल्या दिवशी 10 लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांना लाभ मिळेल. दररोज 2 ते 5 लाख खात्यावर पैसे जमा केले जातील. 25 ते 30 दिवसांत 80 टक्के प्रक्रिया पूर्ण होईल. उर्वरित 20 टक्के शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यावर लवकरच कार्यवाही होईल. सर्व लाभार्थ्यांची यादी ‘आपले सरकार’ या वेबसाईट वर असून ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे बँक किंवा पतसंस्था शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पैसे लाटू शकणार नाहीत.

आपलं नाव ‘आपले सरकार’ वेबसाईट वर कसं शोधाल ?
aaplesarkar.maharashtra.gov.in‘ या वेबसाईटवर लॉग ऑन करा. तिथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – वर्ष 2017 हे दिसेल.
उजव्या कोपऱ्यात लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यावर क्लिक करा. – तिथे तुम्हाला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, बँक, ब्रँच हे सर्व निवडता येईल.