मलेशिया एअरलाइन्सच्या त्या विमानाचा शोध लागला ?

एमएच 370

मलक्काच्या खाडीत मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट एमएच 370 चे अवशेष सापडले आहेत, असे मलेशियाच्या लष्कराने सांगितले आहे.  यापूर्वी ज्या ठिकाणी विमान कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यापासून बऱ्याच दूर अंतरावर अवशेष सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोटा भारू येथून विमानाने आपला मार्ग बदलला होता. त्यानंतर विमान बऱ्याच कमी उंचीवरून उड्डाण करीत होते. त्यानंतर विमान मलक्काच्या खाडीत कोसळले असावे,   असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट एमएच 370 चे कोणतेही अवशेष गेल्या काही दिवसांमध्ये न सापडल्याने मोठी शोध मोहिम उघडण्यात आली होती. दहा देशांच्या विमानवाहू नौका, लढाऊ विमाने, अत्याधुनिक शोध सुविधा असलेली जहाजे गेल्या अवशेष शोधण्याच्या मोहिमेवर आहेत. गेल्या शनिवारी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून बिजिंगला जाण्यासाठी विमानाने उड्डाण केले होते.