नुकताच १२ वीचा निकाल लागलाय आणि आता प्रश्न पडला असेल की १२ वी नंतरच करियर काय ? एक चिंता मिटली तर दुसरी तयार झाली कारण आता घेतलेला निर्णय आयुष्य घडवत असतो. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना आता पुढे काय करू? कोणता कोर्स घेऊ? करियर नीट झालं पाहिजे, नाहीतर खरं नाही….वगैरे विचार स्वस्थ बसू देत नाहीत.
पालकांना चिंता असते की आपल्या मुलाने योग्य तो कोर्स निवडावा नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. अनेक जण चुकीचे निर्णय घेतात आणि मग पश्चाताप करताना दिसत असतात. यामध्ये पैसा आणि वेळ दोन्ही ही निघून जाते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आम्ही आपणांस काही कोर्सबद्दल माहिती देणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपणांस कशात आवड आहे? आपण काय करू शकतो ? ह्या गोष्टी विचारात घ्याव्यात उगाच आपला मित्र जातोय म्हणून त्या शाखेकडे जाणे किंवा तो कोर्स करणे टाळावे. म्हणजे आपला वेळ आणि पैशाचा अपव्यय होणार नाही. adshere
१. डिप्लोमा इन काम्पुटर एप्लिकेशन (Diploma in Computer Application:)
जर तुम्हाला कम्प्युटर ची आवड असेल. मोबाईल आणि इंटरनेट कसं असतं आणि काय कार्य करत ? कम्प्युटर ची भाषा किंवा सॉफ्टवेयर बद्दल आवड असेल त्यामध्ये काम करावं वाटत असेल तर हा कोर्स तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही प्रोग्राम कसे तयार करायचे (Programme language & Software ) शिकू शकाल आणि याला खूप डिमांड आहे.
२. डिप्लोमा इन फॅशन डिझाईनिंग (Diploma in Fashion Designing:)
तुम्हाला फॅशन बद्दल आवड असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजाईन आणि स्टाइल च ज्ञान संपादन करावं लागेल. या दोन गोष्टींवरच तुमचं करियर अवलंबून असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्केच करणं देखील शिकावं लागेल. हा सुद्धा उत्तम कोर्स आहे.
३. डिप्लोमा इन योग (diploma in Yoga )
योग आणि व्यायाम करण्याची तुम्हास आवड असेल तर तुम्ही या कोर्स कडे वळू शकता. सध्या सर्वत्र योगा चा बोलबाला आहे. सर्वच जण योग शिकण्याचे प्रयत्न करताना दिसत असतात. इतरांना सुद्धा योग वगैरे शिकवण्याची इच्छा असेल तर तुम्ही यामध्ये करियर करू शकता.
४. डिप्लोमा इन बँकिंग (Diploma in Banking:)
अनेक जण कॉमर्स वगैरे घेतात. आकडेमोड, गणित अशा विषयात रुची असणाऱ्या आणि विज्ञान विषापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स चांगला आहे. ते ह्या कोर्स वळू शकतात. अनेक जण ह्या क्षेत्राकडे वळतात परंतु संयम आणि मेहनत न घेतल्याने अनेकांना या क्षेत्रात तग धरता येत नाही. जर तुम्हाला बँकिंग वगैरे कामात आवड असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स उत्तम!
५. डिप्लोमा इन फायनान्शिअल अकौंटिंग (Diploma in Financial Accounting:)
हे क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र एकच आहे असं तुम्हाला वाटत असेल पण तसे बिलकुल नाही. दोन्ही क्षेत्र वेगवेगळे आहेत. जर तुम्हाला आकडे आणि हिशोब यांच्या संगतीत राहायला आवडत असेल तर हा कोर्स तुम्ही करू शकता. या क्षेत्रात अनेक संधी आहेत.
६. डिप्लोमा इन फिजिओथेरपी (Diploma in Physiotherapy:)
तुम्ही क्रिकेट मॅच बघितली असेल. एखाद्या खेळाडूस काही दुखापत झाली तर लगेच एक डॉक्टर हातात एक बॉक्स घेऊन येताना दिसतो. तो येतो आणि लागलीच खेळाडूस काही औषध वगैरे देतो, खेळाडूचे हात पाय हलवतो आणि त्यास तात्काळ बरं करतो. आपणांस रुग्णांची काळजी घेण्याची आवड असेल तर तेच काम हटक्या पद्धतीने करून तुम्ही त्यांना बरे कसे करू शकता ते ह्या कोर्स मध्ये शिकवल्या जाते. यामध्ये सुद्धा अनेक संधी आहेत. तुम्ही या कोर्सची सुद्धा निवड करू शकता.
७. डिप्लोमा इन अनिमेशन (Diploma in 3D Animation:)
आपण आजकाल अनेक चित्रपट बघतो ज्यामध्ये ऍनिमेशनचा वापर केलेला असतो. हे ऍनिमेशन कसे बनते आणि ते कसे शिकता येईल. हे या कोर्समध्ये शिकता येते. यामध्ये खुप मेहनत घ्यावी लागते आणि तुम्हांस कम्प्युटरची आवड असणे तसेच तुमची कल्पनाशक्ती चांगली असणे आवश्यक आहे.. अनेक मोठमोठ्या कंपन्या, संस्थामध्ये नोकरीच्या संधी आहेत. या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.
८. डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन (Diploma in Interior Designing:)
घर कसं असावं ? कुठला रंग वापरावा ? याचं ज्ञान आणि घर सजवायची आवड तुम्हास आहे का ? घरात नवनवीन प्रयोग करून घर सुंदर कसं ठेवता येईल याचे फंडे तुम्हास माहिती असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला यामध्ये रस असेल तर तुमचा हाथ कुणीच पकडू शकत नाही.
९. डिप्लोमा इन मार्केटिंग अँड ऍडव्हर्टइझिंग (Diploma in Advertising and Marketing:)
सध्या ह्या क्षेत्रास सुगीचे दिवस आहेत. फक्त मार्केटिंग किंवा जाहिरात यापुरता मर्यादित न राहता हे क्षेत्र फारच पुढे गेलं आहे. लोकांशी संवाद साधणे आणि त्यांना पटवण्याची कला जर तुमच्या मध्ये असेल तर ह्या क्षेत्रात तुम्ही करियर करू शकता.
१०. डिप्लोमा इन व्हेरिअस लँगवेजेस (Diploma in Various Languages:)
हे क्षेत्र नावाप्रमाणेच वेगळं आहे. यामध्ये तुम्हास वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात. यामध्ये स्पर्धा नाहीत आणि विशेष म्हणजे जर तुम्हास दुसऱ्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा येत असेल तर तुम्हांस थेट बाहेरदेशात नोकरी करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. परंतु मेहनत मात्र प्रचंड घ्यावी लागेल हे पण तेवढंच खरं !
फक्त इंजिनिअरिंग अथवा मेडिकलच नाहीत तर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आपण आपलं करियर करू शकता. त्यामुळे कुठलंही क्षेत्र निवडत असतांना त्यामध्ये तुम्हास आवड आहे का ? हे बघून आणि विचार करूनच निर्णय घ्या. आपला निर्णयच आपलं आयुष्य आणि करियर घडवत असतो. त्यामुळे आपला मित्र/मैत्रीण काय घेते ते बघून तसंच काही कारण्यापॆक्षा आपल्या आवडीनुसारच क्षेत्र निवडा आणि आपलं करियर घडवा!