हॉटेल मध्ये पांढऱ्या बेडशीट्स का असतात ?

why hotel have white bedsheets?

बहुतांश वेळी आपण हॉटेल मध्ये थांबतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की, बेडवर पांढऱ्या रंगाची बेडशीट्स असते. कुठेही गेलो तरी बेडवर पांढऱ्या बेडशीट्स असतात. पांढऱ्या रंगाच्याच बेडशीट्स हॉटेल मध्ये का वापरल्या जात असाव्या जाणून घेऊया ? ह्यामागे देखील काही महत्वाची कारणे असतात.

महत्वाचं कारण म्हणजे पांढरा रंग हा स्वच्छ दिसतो. त्यामुळे ह्या रंगाच्या वस्तू बघताना मनाला समाधान मिळते.तसेच पांढऱ्या रंगावर कुठलाही डाग लवकर दिसतो त्यामुळे हॉटेल स्टाफला रूम स्वच्छ करताना ते लवकर नजरेस पडते आणि बेडशीट्स जास्त मळण्याआधी धुऊन स्वच्छ केल्या जातात. याशिवाय हॉटेलची खोली आणि बेड जेवढे स्वच्छ आणि आरामदायक असतील तर हॉटेलमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होत ज्यामुळे ग्राहक आनंदी राहतात.

आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना तसेच चादरींना धुणे सोप्पे असते. हॉटेल मध्ये जास्त खोल्या आणि तेवढेच किंवा जास्त बेड असतात त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेडशीट्स धुवायच्या असतील पांढऱ्या बेडशीट्स एकत्र धुणे सोपे जाते. रंगीत कपडे असतील तर वेगवेगळे धुवावे लागते. कारण त्या रंगीत कपड्यांचा रंग पांढऱ्या कपड्यांना लागण्याची भीती असते. पण जर तेच पांढरे कपडे असतील तर तर त्यांना एकत्र धुतल्या जाऊ शकते.

शिवाय हॉटेल मध्ये बाहेर कुठेतरी फिरायला गेल्यावरच आपण थांबतो. रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळ मिळावं, शांतता मिळावी, आनंद मिळावा म्हणून बहुतेक लोक हॉटेलमध्ये थांबतात. त्यामुळे शांती आणि प्रसन्न वाटावे म्हणूनही हा रंग आपल्याला ह्या हॉटेल रूम्समध्ये बघायला मिळतो.

हॉटेल म्हणजे एक प्रकारचा ब्रॅण्ड असतो. तेथील ठरवलेली प्रत्येक गोष्ट सुसंगत असते त्यामुळे प्रत्येक हॉटेल मध्ये विशिष्ट रंग, आर्टवर्क किंवा इतर गोष्टीत पाहायला मिळतात. हॉटेल मॅनेजमेंटचा नेहमीच सर्व गोष्टी ह्या मिळत्या जुळत्या रंगाच्या ठेवत असतात. त्यातच प्रत्येक गोष्ट ही एकाच रंगाची मिळणे जरा अवघड असल्याने त्यावर पांढरा रंग हा पर्याय असू शकतो. कारण हा रंग सहज उपलब्ध होतो. त्यामुळेच हॉटेल मध्ये पांढऱ्या बेडशीट्स असतात ?