उन्हाच्या झळा घोटती पक्ष्यांचा गळा

Sparrow drink water in Buldhana

वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे जिथे मनुष्यप्राण्याला पिण्याचे पाणी मिळत नाही, तिथे वन्यजीवांचे व पक्ष्यांचे काय? सततच्या दुष्काळामुळे व कमी पर्जन्यमानामुळे सार्वजनिक पाणवठे, तलाव, विहिरी तसेच एकूणच शहर व परिसरातील भूजलाची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. वाढते शहरीकरण व जंगलतोड व पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव व पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. उन्हाचा मोठा फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते व ते उडताना खाली पडतात,विद्युत तारांमध्ये अडकतात जखमी होऊन मृत्यु पावतात व अशा परिस्थितीत त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या घर अथवा इमारतीवर,झाडांवर पिण्याचे पाणी भांड्यामध्ये ठेवावीत. यामुळे पक्ष्यांना आधार मिळेल. ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे. तसेच या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात लावा. वास्तविक पाहता हीच खरी माणूसकी आहे.