ब्रा खरेदी करताय मग ह्या टिप्स अवश्य वाचा

bra tips

स्त्रियांच्या रोजच्या वापरात आणि गरजेची वस्तू म्हणजे “ब्रा”. ह्या विषयावर तसं उघड चर्चा होत नाही. एक स्त्री सुद्धा लवकर इतरांसोबत ह्या विषयावर बोलणे टाळतेच. परंतु आजकाल च्या कॉलेज मधील मुली किंवा स्त्रिया यावर चर्चा करताना आढळून येतात. असे असले तरीही ‘ब्रा’ खरेदी करताना लवकर घेऊन तो लपवल्या जातो. कुणी बघितलं नाही पाहिजे असा त्यामागे दृष्टिकोन ! अनेक स्त्रियांना आपल्या साईज पेक्षा लहान मोठ्या ‘ब्रा’ वापरतात. कोणत्या प्रकाराची ब्रा निवडावी हे ब्रा खरेदी करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे.

स्तन मोठे दिसण्यासाठी पॅडेड ब्रा निवडणे योग्य ठरेल. एक्स्ट्रा सपोर्ट साठी ब्रा निवडायची असल्यास अंडरवायर ब्रा निवडणे योग्य ठरेल. स्पोर्ट्स, जिम आणि इतर अॅथलिट उद्देशून ब्रा खरेदी करायची असल्यास स्पोर्ट्स ब्रा निवडा.

ब्रा ऑनलाईन खरेदी करावी का?
आपल्याला जर घरी बसूनच वेगवेगळ्या आणि नवीन डिझाईन व पॅटर्नच्या ब्रा बघायच्या असतील. ऑफर हवी असेल तर ऑनलाईन खरेदी करणे परवडेल. तुम्हाला यासाठी दुकानात जायची गरज नाही . परंतु जर तुम्ही साईज अथवा कलर किंवा तुमचं बजेट कमी असेल तर यासाठी विशेष दुकानांतूनच खरेदी करायला हवी. खरेदी करण्यापूर्वी फिटिंग आणि कंफर्टसाठी ट्रायल घ्यायला हरकत नाही. जर आपण ब्रँड, साइज आणि प्रकाराबद्दल ठाम असाल तरच ऑनलाईन खरेदीचा विचार करा.

कम्फर्ट फील
ब्रा अशी निवडा ज्यात आपण मोकळा श्वास घेऊ शकाल. तुम्हाला कम्फर्ट फील होत असेल अशीच ब्रा घ्या. अतिटाइट ब्रा घातल्याने श्वास घ्यायला तर त्रास होतोच स्कीनवर त्याचा परिणाम होतो. तसेच आपण ब्रा ही शरीर झाकण्यासाठी वापरत असल्याने ज्या ब्रातून आपले स्तन बाहेर निघत असतील अशी ब्रा खरेदी करणे टाळा.

स्ट्रीप लूज
ब्रा ची स्ट्रीप लूज असल्याने खांद्यावरून सरकत राहते. अशात स्ट्रीप टाइट करून साइज नीट करा.

वाकून बघा
ब्रा घातल्यावर पुढील बाजूला वाकून बघा की आपले स्तन बाहेरच्या बाजूला निघत तर नाहीये. असे असल्यास ती ब्रा आपल्यासाठी फीट नाही.

दोन्ही बाजू चेक करा
डाव्या आणि उजव्या बाजूला वळून बघा. साइडहून स्किन बाहेर निघत असल्यास त्याची फिटिंग योग्य नाही.