उपवासासाठी स्पेशल डिश

उद्या विजया एकादशी नंतर महाशिवरात्री म्हणजे उपवास आलाच.. मग उपवास म्हटले कि प्रत्येकाला प्रश्न पडतो कि करावे तरी काय कारण नेहमी नेहमी साबुदाणा उसळ, भगर, नायलॉन साबुदाणा चिवडा, आलू चिप्स, किंवा रताळे उकळून खायचे हे सगळं खाऊन खाऊन कंटाळा येतो ना. मग असे नवीन काय खाऊ शकतो आपण कि जे बनवण्यास पण सोपे असेल व उपवासालाही चालेल तर चला आज जाणून घेऊयात उपवास स्पेशल.

रताळ्यांचा शिरा

साहित्य
१) अर्धा किलो रताळी
२) गूळ एक वाटी
३) ओला नारळ दीड वाटी किसलेला
४) चार/पाच दोंडे वेलची पूड
५) तूप
६) आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता.

कृती
रताळ्याच्या साली काढा.
त्याचे पातळसर गोल चकत्या करा व बाजूला ठेवा.
कमी गॅस करून जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात रताळ्यांच्या चकत्या टाका.
झाकण ठेवून शिजत ठेवा.रताळी मऊसर होऊ द्या.
रताळी शिजली की त्यावर नारळ किस, गूळ आणि वेलची पूड टाका.
थोडा वेळ कमी गॅस वर शिजवा. व मिक्स करून घ्या. थोड्या वेळाने भांडे उतरवून ठेवा.
झाला तयार रताळ्याचा शिरा सर्वांनाच आवडेल असा. करून बघा.