राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विपक्ष उमेदवार पूर्व लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्या विरुद्ध एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे उभे होते. राष्ट्रपती निवडणुकी मध्ये एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीमध्ये रामनाथ कोविंद यांना ७,०२,६४४ तर मीरा कुमार यांना ३,६७,३१४ मत मिळाली. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये रामनाथ कोविंद हे ३,३५,३३० मतांनी विजयी झाले. एनडीए चे उमेदवार रामनाथ कोविंद विजयी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये याचा जल्लोष हा एनडीए तर्फे जागो जागी आतिषबाजी व नारे लावून जल्लोष करीत आहेत. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदा करीता २५ जुलै रोजी शपथ घेणार आहेत.
रामनाथ कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती.आहेत. रामनाथजी यांचे गाव कानपुर उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. रामनाथ यांचा जन्म १ ऑक्टोम्बर १९४५ ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मैकूलाल, आईचे नाव कलावती व त्यांच्या पत्नीचे नाव सविता कोविंद रिटायर्ड सरकारी कर्मचारी आहेत. रामनाथजी यांनी बिहार येथे राज्यपाल या पदावर कार्य केले आहे. १९ जून २०१७ ला एनडीए सर्वसहमत राष्ट्रपति उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित केले होते.