सावधान व्हॉट्सअॅप वरील डीमार्ट चा मेसेज उघडू नका

D Mart Message

गेल्या काही दिवसांपासून व्हाट्सऍप वर डीमार्ट कुपन चा एक मेसेज फिरत आहे. अनेक जण तो कुठलीही शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड करीत आहे तर काही जण व्हाऊचर च्या मोहापायी लिंकवर क्लिक करत आहे. तुम्ही सुद्धा ह्या मेसेजवर जर क्लिक करायचं ठरवलं असेल तर सावधान !!! तुम्हाला कुठलंही गिफ्ट अथवा व्हाऊचर मिळणार नाही. ते गिफ्ट व्हाउचर नसून, ‘स्पायवेअर’ आहे. याद्वारे तुमची अर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मोबाइलवर असा मेसेज आला, तर त्वरीत डिलिट करा.

दोन दिवसांपासून डीमार्ट चा हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला असून, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील ग्रुपवरून तो सतत फॉरवर्ड होत आहे. ह्या लिंक ला ओपन केल्यास डीमार्टची मोफत व्हाउचर्स मिळतील, असे सांगण्यात आले आहे. ही लिंक उघडली, की तीन प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ‘डी मार्ट’कडून शॉपिंग कार्ड मिळणार असल्याचे सांगण्यात येते. यावेळी तुम्हास बँक खात्याची माहिती विचारली जात असून, आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

dmartindia.com या नावेबसाईट वरून हा मेसेज येत आहे.सदर डोमेन दोन दिवसांपूर्वी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हा मेसेज डीमार्टच्या अधिकृत वेबसाइटवरून येत नसून, फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. डीमार्टच्या खऱ्या वेबसाइटचे डोमेन dmart.in असे आहे. त्यामुळे हा मेसेज आला असल्यास त्वरित डिलिट करावा. डुप्लिकेट डोमेन तयार करून करून नागरिकांना आमिष दाखवून भुरळ पाडली जात आहे. मेसेजमध्ये असलेली लिंक उघडली, की प्रश्न विचारले जातात. ते फसवे असून, त्याद्वारे अर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. कम्प्युटरवरून ही लिंक उघडल्यास कम्प्युटरची माहितीही त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे असे मेसेज त्वरित डिलीट करावे आणि सतर्कता बाळगावी शिवाय इतरांना सुद्धा हा या मेसेज मागील सत्य सांगावे जेणेकरुन कुणाचीही फसवणूक होणार नाही .