१० रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद झाल्याची अफवा

10 Rs coins banned

सध्या सर्वत्र १० रुपयाच्या नाण्याबद्दल अफवा पसरल्या असून चलनातून बाद झाले असल्याने ते कुणी स्वीकारत नाही आहे. १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे. बाजार, मार्केट, हॉटेल, कुठेही सामान खरेदी करतांना असो वा तुम्ही पाणीपुरी वाल्याजवळ पाणीपुरी खात असले तरी तो १० रुपयांचे नाणे स्वीकारत नाही. सध्या सर्वत्र ही परिस्थिती दिसून येत आहे.

याबाबत अनेक दुकानदार, व्यावसायिकांना विचारले असता कुणीच आमच्याकडून हे नाणे घेत नाहीत त्यामुळे आम्ही पण स्वीकारत नाही असे समजले. मात्र खरी बाब ही की, १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे. ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे हे बाद झालेले नसून एसटी, बँक तसेच अनेक ठिकाणी स्वीकारल्या जात आहेत. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया ने जाहीर आवाहन केले आहे की, ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे चलनातून बाद केली नाहीत. आणि त्यामुळे ती न स्वीकारणे हे कायद्याने कलम १२४ (अ) भादंवि नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे व्यवहारात स्वीकारावेत. तसेच यासंबंधी इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.