आज अनेक लोक मोबाईल वापरत आहेत आणि तो सुद्धा स्मार्टफोन. साधा फोन वापरणारेही आता इंटरनेट शिवाय मोबाईल वापरु शकत नाहीत. म्हणजेच अन्न -वस्र -निवारा याप्रमाणेच आता मोबाईल आणि इंटरनेट महत्वाचं झालं आहे. मागील वर्षी जिओने फ्री नेट आणि कॉलिंग सेवा सुरु करून खळबळ उडवून दिली. त्या नंतर प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाच आणि जो तो इंटरनेट चा वापर करतांना दिसून येत आहे. जिओ मुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले तो भाग वेगळा. त्यामुळे जो तो आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विविध प्लॅन्स घेऊन येत आहे.
असो, एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की , फ्री HD कॉलिंग आणि इंटरनेट सेवा जिओ सारखी कंपनी का आणि कशी देत असेल ? तर ते निरासरण आज आपण करूया.
जिओ ही VoLTE चा उपयोग करीत असल्याने कमी पैशात जास्तीत जास्त सेवा देत आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की , VoLTE काय आहे HD कॉलिंग काय आहे आणि जिओ चे प्लॅन्स एवढे स्वस्त का आहेत ? त्याआधी जाणून घेऊया की, 2G, 3G आणि 4G काय आहे ?
मोबाइल टेलिकम्यूनिकेशंस टेक्नॉलजी च्या जेनरेशनला G हे नाव दिले आहे. पहिली वायरलेस टेलिफोन टेक्नॉलजीला 1G म्हटल्या जाते. ही टेक्नॉलजी १९७० ते १९९१ या काळात वापरल्या जायची. ही टेक्नॉलजी ऐनलॉग नेटवर्क चा वापर करायची. या नंतर १९९१ मध्ये GSM लॉन्च झालं. ह्याला 2G म्हटल्या जायचं. ज्या मध्ये ऐनलॉग ऐवजी डिजिटल नेटवर्क चा वापर केल्या जायचा. 2G मुळे मोबाइल वर डेटा सर्व्हिसेस, SMS आणि MMS ची देवाण घेवाण सुरु झाली.
2G नंतर मोबाइल टेलिकम्यूनिकेशंस ची तीसरी जेनरेशन आली. ज्याला आपण 3G म्हणून ओळखतो. 3G मध्ये W-CDMA, TD-SCDMA, HSPA+ आणि CDMA2000 स्टैंडर्ड्स होते . प्रथम 1998 मध्ये 3G नेटवर्क सादर करण्यात आले. या नंतर बऱ्याच काळाने २००८ मध्ये 4G नेटवर्क आले. 4G मध्ये
मोबाइल WiMAX आणि LTE हे स्टॅंडर्ड वापरल्या जातात. LTE (लॉन्ग टर्म एव्यूलेशन), VoLTE (वॉयस ओवर लॉन्ग टर्म एव्यूलेशन).
4G LTE म्हणजे काय ?
LTE सपोर्ट फोनला 100 से 150 मेगाबिट्स प्रति सेकंद डेटा स्पीड मिळते आणि स्थिर झाल्यावर ती 1जीबी प्रति सेकंद पर्यंत असू शकते. याशिवाय इंटरनेट प्रोटोकॉल (IP) वर आधारित LTE नेटवर्कलाच VoLTE (वॉयस ओवर लॉन्ग टर्म एव्यूलेशन) म्हटल्या जाते. LTE द्वारे सुद्धा व्हॉइस कॉलिंग केल्या जाते. त्यासाठी करियर्स ला वॉइस कॉल नेटवर्क मध्ये बदल करावे लागतात. LTE मध्ये ऑपरेटर ला डेटा आणि व्हॉइस कॉलसाठी भिन्न बँड वापराव्या लागतात.
हे 4G VoLTE म्हणजे काय ?
4G VoLTE चं महत्वाचं काम म्हणजे कॉल ची गुणवत्ता सुधारणे. यामध्ये तुम्ही फोनवर बोलत असताना चांगली कनेक्टिव्हिटी मिळते. जी LTE मध्ये मिळत नाही. VoLTE मुळे होणारी कॉलिंग क्वॉलिटी ही सेल्युलर नेटवर्क च्या कॉलिंग क्वॉलिटी पेक्षा उत्तम असते . त्यामुळे VoLTE द्वारे होणाऱ्या वॉइस कॉलिंग ला HD वॉइस कॉलिंग असे सुद्धा म्हटल्या जाते. त्यासोबतच VoLTE असल्याने ऑपरेटर ला वॉइस आणि डेटा साठी वेगेवेगळी बँड वापरावी लागत नाही. जिओ शिवाय इतर कंपन्या ह्या फक्त डेटा साठी 4G LTE चा वापर करतात परंतु वॉइस कॉलिंग साठी त्या 3G आणि 2G नेटवर्क चा उपयोग करतात. त्यामुळे VoLTE हे सुविधाजनक असतांनाच स्वस्त सुद्धा आहे म्हणून जिओ सारख्या कंपन्या ह्या फ्री कॉलिंग सुविधा देतांना दिसत आहेत.