एअर एशियाचा विमान प्रवास फक्त ९९० मध्ये

विमान प्रवास तिकिटात 35 टक्के कपात करण्‍यात येणार असल्याचे एअर एशियाने आधी सांगितले होते. अखेर डीजीसीएतर्फे एअर एशियाला बंगळुरु- गोवा- बंगळुरु आणि बंगळुरु-चेन्‍नई-बंगळुरु मार्गाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता प्रवासी वाहतुक करणार्‍या स्पाइस जेट व इंडिगो सारख्या कंपण्यापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. विशेष म्हणजे सर्व करांसह फक्त रु. ९९० मध्ये ही सेवा सुरू करण्यात येत आहे.

एअर एशियाचे पहिले विमान १२ जूनला ए320 बंगळुरुहून गोवाला दुपारी रवाना होईल. त्यासाठी आजपासून एअर एशियाच्या तिकिट विक्रीस सुरूवात झाली आहे. मात्र यांचा परिणाम नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करणार्‍या विमान कंपन्यामध्ये पाहायला मिळून आला आहे. स्पाइस जेटने आपल्या तिकिट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बंगळुरु-गोवा-बंगळुरु आणि बंगळुरु-चेन्‍नई-बंगळुरु मार्गावर 1,499 रुपये तिकिट दराची घोषणा केली आहे. 12 जूनपासून स्पाइस जेटची सेवा सुरु होणार आहे. येत्या काही दिवसात इतर कंपन्याही आपले तिकिट दर कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.