नगरपरिषद अमरावती येथे विविध पदांच्या जागेसाठी भरती

jobs in buldana

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दि. १६ मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.  एकूण २५ विविध जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंकवर जाहिरात बघावी. अर्ज करण्यासाठी सविस्तर सूचना www.collnrs.in आणि www.amravati.nic.in या वेबसाईट वर दिलेल्या आहेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्याने अर्ज करताना शैक्षणिक व अन्य कागदपत्रे जोडणे आवश्यक नाही. परंतु सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती खाली दिलेल्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
संवर्ग : महाराष्ट्र न. प. अभियांत्रिकी सेवा (विदयुत) २ पदे, महाराष्ट्र न. प. लेख परीक्षण व लेख सेवा सहाय्य्क मध्ये लेखा परीक्षक ३ पदे आणि सहाय्य्क लेखापाल २ पदे, नगर पंचायत लेखापाल ४ पदे, लेखा परीक्षक ४ पदे, संवर्ग : महाराष्ट्र न.प. अग्निशमन सेवा : सहा. अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक श्रेणी क-२- १ पद.

शैक्षणिक पात्रता : B.E.(इलेक्ट्रिकल) किंवा पदविका D.E. (इलेक्ट्रिकल)+MSCIT,
M.Com किंवा B.Com.+MSCIT,
कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक+अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपुर येथून उपस्थानक अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक+MSCIT.
10+2 उत्तीर्ण आवश्यक+ राष्ट्रिय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपुर येथून उपस्थानक अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक.

शैक्षणिक पात्रता ही विविध पदानुसार आहे. आधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

उपरोक्त पदांकरिता ३१/१२/२०१६ ची वयोमर्यादा गणली जाईल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय ३१/१२/२०१६ रोजी १८ पेक्षा कमी आणि ३८ पेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवाराचे १८ पेक्षा कमी आणि ४३ पेक्षा जास्त नसावे. माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अपंग उमेदवारांना ४५ वर्ष राहील. खेळाडू उमेदवारांना वयोमर्यादा अट ५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
अर्ज हे फ़क्त (Online) ऑनलाईन पद्धतीनेच करावेत. त्यासाठी www.Collnrs.in या वेबसाईट ला भेट द्यावी. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०१७ असून २६ मार्च रोजी लेखी परीक्षा असणार आहे.

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज करण्यासाठी लिंक:
http://www.collnrs.in/

जाहिरात Download लिंक:
http://www.collnrs.in/rec2017.pdf

कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात

bahiram baba from Buldhana

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध असलेली हि यात्रा एक दोन नव्हे तर चक्क दीड महिना भरते. कडाक्‍याच्‍या थंडीत दरवर्षी दिड महिना ही यात्रा भरते. महाराष्‍ट्रासह परप्रांतातील भाविक या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या यात्रेत पूर्वी लोककला होत असे. इंग्रज राजवटीत इंग्रजांनीही या यात्रेची दखल घेतली होती. त्यावेळी तहसीलदारही येथे मुक्‍कामी असत व महिनाभर कोर्ट इथेच भरत असे.

बहिरम यात्रेत पूर्वी विविध स्‍पर्धा होत असत. परिसरातील लोक राहुट्या, तंबू टाकून पहाडात मोहल्ले उभारत. रात्री उशिरापर्यंत बहिरम यात्रेत विविध कार्यक्रम होत असत. तंबूंमध्‍ये एकमेकांना मेजवान्‍या दिल्‍या जात होत्‍या. दोन्‍ही वेळी मटणाची पंगत असल्‍याने कोणीही कोणाच्‍या पंगतीत जायचे. मातीच्‍या मडक्‍यात चुलीवर शिजलेले मटण व खमंग भाकरी हे बहिरम यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

बहिरम बुवाच्या मंदिरा बाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे म्हणतात की, येथील भांडी तलावातून पूर्वी भांडी निघायची पुर्वी मोठ्या प्रमाणात येथे यात्रेकरू जमत. त्‍यांना पुरेल एवढी भांडी या तलावातून निघत असत. मात्र लोकांनी ही भांडी चोरून नेल्यामुळे तलावातून भांडी निघणे बंद झाले. सुमारे ३५० वर्षापासून येथे यात्रा भारत असते

अमरावती ते पुणे नवीन रेल्वे १ जुलै पासून ?

Buldhana District official website

अनेक प्रस्ताव आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर अमरावतीकरांच्या सेवेत १ जुलै पासून पुण्यास जाण्यासाठी एक नवीन रेल्वेगाडी सुरु होणार आहे. तसे दाट संकेत मिळाले असून प्रस्तावित नव्या गाडीचे वेळापत्रक देखील इंटरनेटवर झळकू लागले आहे. ही गाडी सुरु झाल्यास अमरावती ते पुणे रेल्वे हे अंतर ७ तासांनी कमी होणार आहे.

सध्या अमरावतीहून पुण्यास जाण्यासाठी एकच गाडी असून लातूर मार्गे जाणारी ही गाडी १८ तास घेते. परंतु नवी गाडी सुरू झाल्यास अमरावतीहून पुण्याचा प्रवास सुमारे साडेअकरा तासात पूर्ण करता येणार आहे. या आधी अमरावतीहून मनमाडमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे त्यात लक्ष घालून होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यास आले असून अलीकडेच या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार आनंदराव अडसूळ, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनिल देशमुख व रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर अमरावतीहून पुण्यासाठी पनवेलमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यावर सकारात्मक विचार सुरू झाला.ही नवी रेल्वेगाडी पनवेलमार्गे सोडण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. लवकरच या नव्या गाडीचा मुहूर्त ठरेल असे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेत. मात्र ह्या गाडीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही त्यामुळे रुळावरून ही गाडी केव्हा धावेल ह्याची सर्व जन आतुरतेने वाट बघत आहेत.

विदर्भाचे खणखणीत नाणे – भारत गणेशपुरे

Buldhana District official website

झी मराठीच्या रंगमंचावर आपल्या विदर्भाचे खणखणीत नाणे सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भाची मान उंचावली आहे. मराठी सिनेजगतात आजवर कोल्हापूर, पुणे, मुंबई, सातारा फार तर औरंगाबाद येथील कलाकारांचे प्रमाण दिसून येत होते. शिवाय जर तुम्ही ‘जोशी’, ‘दामले ‘, ‘नाईक ‘, ‘बापट’, ‘कुलकर्णी’, असाल अथवा तुमच्या नावापुढे ‘कर’ आले तर तुमच्यात अभिनय आहे आणि तुम्ही ह्या दुनियेत काम करू शकता ही जणू पावतीच झाली होती. परंतु ह्या सर्वांना छेद ‘भारत गणेशपुरे’ ह्या वैदर्भीय कलाकाराने ही रंगभूमी गाजवली आहे आणि गाजवत आहे. भाऊ कदम सारख्या मातब्बर कलाकारासोबत स्टेज शेअर करीत एकापेक्षा एक विनोद करीत आपला वेगळा ठसा उमटवणारा हा ‘भारत’ विदर्भातील कलावंतासाठी हा नक्कीच आदर्श ठरू शकतो.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वऱ्हाडी बोलीने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारा आणि विनोदाचा बादशहा असलेला ‘भारत’ हा मूळ अमरावतीचा आहे. भारत हा २००६ पासून चित्रपट सृष्टीत आहे. त्याने ‘फू बाई फू’ या हास्य कार्यक्रमातून आपली अप्रतिम कला सादर केली आहे. तर ‘फु बाई फु’ सारख्या मालीकामधून २ वेळा तो विजेता ठरला आहे. निशाणी डावा अंगठा’ ‘धोबी पछाड’ ‘पोस्टर बॉईज’ आदी चित्रपटात त्याने कसदार भूमिका वठविल्या आहे.