रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे पट्टे का असतात?

Malkapur khamgaon highway

भारतातील रस्ते बहुतांश भागात चांगले नाहीत. परंतु अनेक महामार्ग प्रवासासाठी लाभदायक सुद्धा आहेत. मित्रांसोबत, सहल किंवा कुटुंबासोबत आपण बाहेरगावी जातो त्यावेळी काळ्याशार रस्त्यावर असलेले पांढरे आणि पिवळ्या रंगाचे पट्टे मन मोहून घेतात. रात्रीचा प्रवास असला तर मग रास्ता दाखवण्याचे काम आपसूकच होते. परंतु रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे पट्टे का असतात? काही ठिकाणी तुटक तर काही ठिकाणी हे पट्टे एकसारखे दिसून येतात. यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया.

एकसारखी पांढरी रेषा :
रस्त्यावर जर सरळ अखंड पांढरी रेषा म्हणजे Solid White Lines असेल म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही तुमची लेन बदलायची नाही. तुम्हाला एकाच लेनमधून प्रवास करायचा आहे.

तुटक पांढरी रेषा :
रस्त्यावर तुटक पांढऱ्या रेषा सामान्य बाब आहे. अनेक ठिकाणी ह्या दिसूनच येतात. या छोट्या सरळ सफेद रेषा म्हणजे Broken White Line चा अर्थ तुम्हाला तुमच्या प्रवासाची म्हणजेच वाहनाची लेन बदलण्यास परवानगी आहे. मात्र त्यासाठी तुम्ही तेथील रस्ता पाहून लेन बदलू शकता.

एका बाजूस पिवळी रेषा :
रस्त्याच्या एका बाजूस पिवळी रेषा (One Side Yellow Line-) असेल म्हणजे दुसऱ्या वाहनांना पासिंग द्यायला आणि ओव्हरटेकिंग करायला परवानगी आहे. मात्र तुम्ही यासाठी ती पिवळी रेषा पार करू शकत नाही.

रस्त्यामध्ये दोन सरळ पिवळ्या रेषा :
रस्त्याच्या मध्ये जर दोन पिवळ्या रेषा असतील तर त्या Double solid Yellow Lines चा अर्थ की पासिंग येथे करायला मनाई आहे.

रस्त्याच्या कडेला तुटक पिवळ्या रेषा:
रस्त्याच्या कडेला ज छोट्या पिवळ्या रेषा असतील तर त्याचा अर्थ असा की ओव्हरटेक किंवा पासिंगला परवानगी आहे. पण तेथील परिस्थिती पाहून करावे.

पिवळी सरळ रेषा आणि पिवळी छोटी रेष एकत्र :
रस्त्यावरील पिवळी सरळ आणि त्यालाच लागून छोटी पिवळी रेष असेल तर त्याचा अर्थ असा की, जर तुम्ही पिवळ्या ब्रोकन लाईनच्या बाजूने गाडी चालवत असाल तर तुम्हाला ओव्हरटेक करायला परवानगी आहे. मात्र त्याच रस्त्यावर जर तुम्ही सरळ पिवळ्या रंगाच्या रेषेच्या बाजूने प्रवास करत असाल तर मात्र तुम्हाला ओव्हरटेक करायला परवानगी नाही.

आता तुम्हाला कळलं असेल की, महामार्गावर असलेल्या पांढऱ्या आणि पिवळ्या पट्ट्यांचा अर्थ काय. मग यापुढे जेव्हा पण प्रवास कराल हे लक्षात ठेवा.