आज खामगाव येथे मराठा पाटील युवक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते.या वेळी मराठा पाटील युवक समितीचे असंख्य कार्यकरते सहभागी झाले होते.
दरवर्षी प्रमाणे मराठा पाटील युवक समितीच्या मोटार सायकल रॅलीस आज शिवाजी नगर येथून सुरुवात झाली. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या वेळी रॅली मध्ये शिवाजी महाराजांच्या वेषभूषेमध्ये निलेश पाटील तर संभाजी राजांच्या वेशभूषेत अभिजित लहाने होते. या वेळी खामगाव शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. मराठा समाजाच्या सर्व राजकीय आणि सामाजिक लोकांचे या वेळी उपास्थिती होती. सदर मोटार सायकल रॅलीचा समारोप ऋषी संकुल सजनपुरी खामगाव येथे करण्यात आला.
मराठा पाटील युवक समितीच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिका, रक्तदान शिबीर, गरजूना आर्थिक मदत तसेच वधू वर पुस्तिका आणि दर वर्षी मोटार सायकल रॅली असे उपक्रम राबवण्यात येतात.