वॉनाक्राय रॅनसमवेअर (wanna cry ransomware) ह्या व्हायरस ने जगातील १५० पेक्षा अधिक देशांवर सायबर हल्ला केला आहे. सर्वात जास्त याची झळ इंग्लंड ला बसली असून जगभरातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला आहे. हा व्हायरस तुमच्या कम्प्युटर वर आल्यास सर्व फाईल्स ला इन्क्रिप्ट करून टाकतो. ज्यामुळे फाईल्स ला लॉक केलेलं दिसून येतं.
काम्पुटर मध्ये असलेल्या सर्व फाईल्स वॉनाक्राय रॅनसमवेअर (wanna cry ransomware) ह्या व्हायरसच्या शिकार होतात आणि ओपन होत नाहीत. जर त्या ओपन करायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्यासाठी पैसे मोजावे लागतात. ही रक्कम $100-$1000’s पर्यंत असू शकते. त्यासाठी ठराविक मुदत दिलेले असून त्या वेळेत पैसे न दिल्यास रक्कम वाढवली जाते. न दिल्यास फाईल्स आणि डाटा डिलीट करण्याची धमकी दिली जाते. यावेळी मागण्यात आलेली रक्कम बिटकॉईन्स च्या स्वरूपात मागितली जाते. ज्यामुळे ती कुणाला पाठवली आणि कोण पाठवतो आणि कुठे पाठवतो याची माहिती कुणालाच नसते.
सध्या सर्वत्र खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सोशल मीडिया आणि इतर ठिकाणाहून यासंबंधी सर्व त्या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बँकानी काही काळ एटीएम बंद केले आहेत. ऑनलाईन सेवा सुद्धा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहेत. जगभरातून हा हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ब्रिटनच्या मार्कस हचिंस या युवकास हा हल्ला रोखण्यास यश मिळाले आहे. परंतु अजूनही हा हल्ला संपूर्णपणे थांबलेला नाही.
सायबर हल्ल्याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असताना या हल्ल्यामागे उत्तर कोरियामधील हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार पासून ह्या हल्ल्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम ब्रिटनमधील बँका, रुग्णालये, खाजगी आणि सरकारी कार्यालय यामध्ये लक्ष झालं. हल्लेखोरांनी मायक्रोसॉफ्टची जुनी ऑपरेटिंग सिस्टम ओएसच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला. वॉनाक्राय रॅनसमवेअर (wanna cry ransomware) ने ज्या ठिकाणी हल्ले केलेत तिथे पैशाची मागणी केली आहे. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत त्या मधील फाईल्स डिलिट करण्याची धमकी मिळत असून त्या बदल्यात पैशाची मागणी करण्यात आली आहे.
Wanna cry ransomware ह्या व्हायरस पासून बचाव कसा कराल ?
वॉनाक्राय रॅनसमवेअर (wanna cry ransomware) या पासून आपला बचाव करावयाचा असल्यास तुम्हाला एखाद्या अनोळखी, व्यक्तीचा किंवा कंपनीचा ई-मेल आला असेल, तर तो ओपन करु नका. तो मेल कदाचित तुमच्या ओळखीचा पण असू शकेल त्याचा विषय थोडा वेगळा किंवा किंवा तुमच्या कामाशी मिळता जुळता असला तरी तो ओपन करणे टाळा टाळा. ऑनलाईन व्यवहार तात्पुरते बंद ठेवावे. सोशल मीडियाचा वापर कमी करुन अनोळखी जाहिराती किंवा मेसेज ओपन करु नये. शिवाय अशी काही समस्या आढळून आल्यास ताबडतोब आयटी विभागाशी संपर्क साधावा.