उतारवयातील विकार संधिवात

प्राकृतिक आहे बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धवस्था. आज जो तरुण आहे तो उद्या वृद्ध होणारच आणि याच पन्नाशी ओलांडलेल्यांना हा सांधेवात विकार त्रास देतो. आयुष्यभर अपार मेहनत घेतलेली असते, कधीकाळी लहान मोठा अपघात झालेला असतो. आणि त्यामुळे हाडांची झीज झालेली असते. उतरते वय त्यात चालणे फिरणे सुद्धा त्रासदायक होते. गुडघ्यांना सूज येते तर सकाळी सकाळी असह्य वेदना होतात. थंडीच्या दिवसात तर आणखीच जपावे लागते. नाहीतर कळा निघतात. मनुष्याचे जसे जसे वय वाढते तसे तसे त्याला विविध विकार जडतात. यामुळे व्यक्ती त्रस्त होऊन जातो. यातीलच एक विकार म्हणजे संधिवात होय. हा जो विकार आहे हा सहसा पन्नाशी ओलांडल्यावरच म्हातारपणातच होतो. आपणास संधिवाताने त्रस्त असे बरेच व्यक्ती दिसतील. या संधिवातामध्ये पाय फार दुखतात, सकाळी चालणे तर फारच कष्टदायक होते. गुडघ्यांना सूज येते. संधिवात हा विकार वात प्रवृत्ती मुळे होणारा विकार आहे. या संधिवाता बद्दल काही माहिती व काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेऊया.

संधिवाताचे कारणे
१) आनुवांशिक कारण.
२) व्यक्तीचे खान-पान ठीक नसणे.
३) पायांवर शरीराचा जास्त भार पडणे.
४) मोठ्या प्रमाणात चालणे.
५) आपल्या हाडांमध्ये कुठला विकार असणे.
६) थंड वातावरणा मुळे.
७) म्हातारपण व हार्मोन्स मधील बदला मुळे.
८) अधिक लठ्ठपणा

संधिवात रुग्णांनी काय करावे व काय करू नये
१) नियमित व्यायाम करा.
२) आपल्या आहारात पालेभाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.
३) रोज ऋतू नुसार उपलब्ध असणारे फळांचे सेवन करा.
४) नियमित विविध फळांचा ज्यूस प्या.
५) गाजर व लिंबू चा रस यांचा ज्यूस हा लाभदायक आहे.
६) काकडी चा ज्यूस संधिवातात चांगला फरक देतो.
७) संधिवाताच्या रोग्यांनी हिवाळ्यात उन्हात बसा.
८) हिवाळ्यात स्वतःला जास्तीत जास्त गरम ठेवण्याचा प्रयत्न करा .
९) साखर हि संधिवाताच्या रुग्णांना फार हानिकारक आहे.
१०) चहा, कॉफी व मांसाहार मुळे संधिवाताचा त्रास जास्त वाढतो त्यामुळे ह्या गोष्टी आहारातून काढून टाका.
११) मसाले, दारू, तळलेले पदार्थ, मीठ तसेच तिखट ह्या गोष्टी सोडल्यास आपणास व लवकर फायदा मिळेल.
१२) आपण एका आठवड्यात १ किंवा २ वेळा तरी उपवास करा.
१३) ज्या पदार्था मध्ये व्हिट्यामिनचे प्रमाण जास्त आहे (दूध, दही) असे पदार्थ आपल्या आहारात घ्या हा एक चांगला उपाय आहे.
१४) आलूचा रस पण फायदेशीर आहे.
१५) जास्त पायऱ्या चढणे व उतरणे शक्यतो टाळा. त्यामुळे आपला त्रास वाढू शकतो.
१६) होत असेल तेवढा जास्त आराम करा.
१७) अद्रक चा रस हा फार फायदेशीर उपाय आहे.
१८) जवस हे देखील सकाळ व संध्याकाळी जेवणा नंतर घेणे फार चांगले आहे.
१९) गायीचे दूध हे अत्यन्त उपयोगी आहे.
२०) संधिवातावर लसूण हा फार उपयोगी उपाय आहे.
२१) तेलाची मालिश करणे हा एक योग्य, आयुर्वेदिक व प्राचीन असा उपाय आहे.
२२) सरसोच्या तेलात लसूण टाकून ते तेल गरम करून लावल्यास आराम मिळतो.
२३) सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसातून ५ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार केल्यास आपणास संधिवातात नकीच फायदा मिळेल.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.