युट्यूबवर पहिला व्हिडिओ कुठला अपलोड करण्यात आला ?

fact about you tube

नेटकऱ्यांची आवडती वेबसाईट आणि दररोज आणि प्रत्येक सेकंदाला पहिली जाणारी वेबसाईट म्हणजे ‘युट्यूब’. युट्यूब ची सुरुवात १७ सर्वापेक्षा जास्त काळ लोटला आहे.  आता गुगलच्या अधिपत्त्यात असलेली आणि सर्वाधिक बघितली जाणारी जाणारी व्हिडिओ स्ट्रीमिंग वेबसाईट म्हणजे युट्यूब ! एमएच २८.इन कडून आज आम्ही तुम्हास युट्यूब बद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

१. आजवर युट्यूब वर सर्वात जास्त  ‘How to kiss’  सर्च केले गेले आहे.

२. युट्यूब वर रोजच काहीना काही अपलोड होत असतं. त्यामध्ये अनेक व्हिडिओ ताबडतोब हिट होतात तर काहींना दर्शक नापसंती दर्शवितात.  तुम्हास माहिती आहे. सर्वात जास्त डिसलाईक कुठल्या व्हिडिओ ला मिळाले आहेत ? अमेरिकन गायक ‘जस्टिन बायबर’ चा गाजलेला अल्बम ‘बेबी’ ह्या व्हिडिओस सर्वात जास्त डिसलाईक मिळाले आहेत.  तब्ब्ल ८ दशलक्ष डिसलाईक या व्हिडिओस मिळाले आहेत.

३. युट्यूब वर सर्वात आधी म्हणजे २३ एप्रिल २००५ रोजी पहिला व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. युट्यूब चे सह संस्थापक जावेद करीम यांनी सॅन डिएगो येथील प्राणिसंग्रहालायचा व्हिडिओ अपलोड केला होता.

४.  युट्यूब इतिहासात आजवर सर्वात बघितल्या गेलेला व्हिडिओ म्हणजे ‘गंगनम स्टाईल’. या व्हिडिओने युट्यूब च ‘व्हयू काउंटर’ ब्रेक केलं होत. ते नंतर पुन्हा सुधारण्यात आलं.

५. युट्यूब चा वापर करणाऱ्यांची संख्या अब्जावधी आहे.  सरासरी इंटरनेट वापरणारा प्रत्येक तिसरा जण युट्यूब ला युजर आहे.

६.  एवढं सगळं युट्यूब बद्दल समजलं. मग युट्यूब चे निर्माते कोण असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का ? नसेल पडला तरी त्याचं उत्तर म्हणजे, जगात लोकप्रिय असलेली, पैशाची देवाणघेवाण करण्यास सहाय्य्क आणि सर्वांच्या विश्वासाची असलेली साईट ‘पेपाल’ च्या तीन माजी कर्मचाऱ्यांनी युट्यूब ची निर्मिती केली.  जावेद करीम, चाड हर्ली आणि स्टीव्ह चेन अशी त्यांची नावे.

७.  युट्यूब ची निर्मिती झाल्यानंतर केवळ १८ महिन्याच्या आत ‘गुगल’ ने युट्यूब ला १. ६५ अब्ज अमेरिकन डॉलर मध्ये विकत घेतले.  हे युट्यूब निर्मात्यांचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.  त्या नंतर आजपर्यंत अनेक बदल युट्यूब मध्ये झालेत आणि आज ते लोकप्रिय झाले. किंबहुना त्याचा फायदा गुगल सारख्या कंपनीस झालाच.

८.   इंटरनेटचा वापर करणाऱ्या ९५ टक्के लोकांसाठी युट्यूब ७५ भाषामध्ये बनलेलं आहे.  तुम्ही ७५ पैकी कुठलीही भाषा निवडू शकता.

९.  युट्यूबचं ‘लॉस अँजेलिस’ मध्ये प्रोडक्शन हाऊस असून एकावेळी १०००० सभासद ते वापरू शकतात.

१०. सर्च इंजिन मध्ये युट्यूब हे गुगल नंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं.  इतर ‘बिंग’, ‘आस्क’ आणि याहू सारखे सर्च इंजिन एकत्र केल्यावरही युट्यूब ची बरोबरी करू शकत नाही.

११. युट्यूब वर प्रसिद्ध असलेल्या ‘ग्रांपी कॅट’  ने २०१४ साली केलेली कमाई ही त्यावेळेसची ऑस्कर विजेती अभिनेत्री ग्वेनेथ पॅल्ट्रो हीच्या कमाईपेक्षा अधिक होती.

१२. युट्यूब लोकप्रिय व्हिडिओचा व्हयु काउंट ३०१ असतांना थांबवून ठेवत. त्यावेळी युट्यूब व्हिडिओचे  व्हयु काउंट वैध आहे की नाही हे तपासतो.

१३. युट्यूब ची निर्मिती ही व्हिडिओ डेटिंग साईट साठी करण्यात आली होती.  तिचं आधी नाव ‘Tune in Hook Up’ असं होत.

१४. मोजायचे झाल्यास महिन्यात ६ अब्ज तास इंटरनेट वापरकर्ते फक्त युट्यूब वर घालवतात.  म्हणजे सरासरी प्रत्येक मनुष्य आपला १ तास युट्यूब ला देतो.

ही आहे काही  रंजक माहिती आपल्या आवडत्या युट्यूब बद्दल.