“सख्या रुसलास का ?”
खिन्न असा होऊनी,
एकांती असा बसलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?
काय हवे आहे तुला,
ओवाळू का मी पंचप्राण.
तुझ्या अश्या वागण्याने,
हरपले माझे देहभान.
बोल ना जरा माझ्याशी,
शांत असा निजलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?
समोर आहे मी तुझ्या,
आणि तु माझ्या. हसत नाही बोलत नाही,
हात सोडुनी माझा.
क्षणातच असा हरवलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?
क्षमा मागते हात जोडुनी,
विनती करते पाया पडुनी.
तरीही निष्ठुर असा,
पाषाणासारखा वागलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ? रुसलास का ?
- सौ. अनिता भागवत येवले