चीन चा ऐपल म्हटल्या जाणार्या चायनीज कंपनी शावोमी ने भारतात आपले पाय मागील महिन्याआधीच रोवले. एमआइ ३ हा मोबाइल भारतात सादर करून भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या मनोदायाने उतरलेल्या या कंपनीला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या आपले पुढचे प्रॉडक्ट सुद्धा ऑनलाइन विकण्यासाठी “फ्लिपकार्ट” चा सहारा घेत शावोमी ने आज बजेट फोन रेड एम आइ 1 एस हा सादर केला. अपेक्षेप्रमाणे 8 हजार युनिट ची विक्री काही मिनिटांमध्ये संपली आणि हा फोन सुद्धा आउट ऑफ स्टॉक झाला आहे.
हा फोन घेण्यासाठी आता ९ तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्याची बुकिंग आज संध्याकाळी ‘फ्लिपकार्ट’ वर सुरू झाली. ‘रेड एम आइ 1 एस ’मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 1.6 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.र्टेक्स –ए7 सहीत 1.6 गिगाहर्टझ क्वॉड कोअर क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसर आणि अँन्ड्रेनो 305 इमेज प्रोसेसर उपलब्ध आहे. तसंच या फोनमध्ये 8 जीबी फ्लॅश मेमरी दिली गेलीय. 4.7 इंचाचा डिस्प्ले (1280 जे 720 रिझॉल्युशनसहीत) यात उपलब्ध आहे. या फोनची ऑनलाईन किंमत 5,999 आहे.