मोबाईल पाण्यात पडलाय ?

drop mobile in water

मोबाईल म्हणजे सर्वांचा जीव की प्राण. आपल्या जीवापेक्षाही त्याला जपल्या जाते. जर आपल्या चुकीमुळे किंवा अनावधानाने जर आपला महागडा फोन पाण्यात पडला तर ? एकूणच काळजात धस्स होतं ना ! जर असं काही झालं तर काय करायचं हे आज तुम्हाला बघता येईल.

मोबाईल पाण्यात पडला की त्याला काढून पुसून वगैरे पुन्हा सुरु करण्याची आपली तयारी सुरु होते. बहुतांश लोक हेच करतात आणि आपला फोन गमावून बसतात. नशिबात असेल तर मोबाईल सुरु होतो नाही तर संपलंच ! त्यामुळे मोबाईल पाण्यात पडला की, त्याला सुरु करण्याचे टाळावे. मोबाईलच्या आत जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. स्विच ऑफ असेल तर सुरु करण्याचा धोका पत्करू नका.

फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो. त्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी कसे काढावे याच्या अनेक पद्धती आहेत. या पद्धतीने मोबाईल मधील पाणी बाहेर काढण्यास मदत होते आणि मोबाईल व्यवस्थित राहतो.
१. एक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवस ठेवावा. मोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे बोलले जाते.
२. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.
३. सिलिका जेल तुम्हाला माहिती असेलच मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

अजून एक पद्धत म्हणजे मोबाईल वाळवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो. हे लक्षात असू द्या म्हणजे कधी तुमच्या मोबाईल सोबत हा प्रसंग घडलाच तर तुम्ही तुमचा मोबाईल वाचवू शकाल.