तरुणींनी इंटरनेट वापरतांना काय काळजी घ्यावी

इंटरनेट, मोबाइलचा वापर अधिक वाढला आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट आहे. मुलांसोबत मुलीही इंटरनेट व संगणकाच्या वापरात कुठेच मागे नाहीत. पण त्या सायबर गुन्ह्यांना बळी पडून शकतात. विशेष म्हणजे सायबर गुन्ह्यांना महिलाच अधिक बळी पडतात. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सुशिक्षित समजले जाणारे व्यक्ती जेव्हा अशा घटनेस बळी पडतात त्यावेळी मात्र संशय निर्माण होतो. त्या व्यक्तीवर आणि इंटरनेट जगतावर.

सोशल मीडिया, व्हाटसअँप यांच्या माध्यमातून कुणीही कुणाला मित्र बनवू शकतो. अनेक वेळा काही फेक अकाउंट बनवून सुद्धा गंडविण्याचे प्रकार होताना दिसून येतात. प्रेमप्रकरण मग बदनामी इ. प्रकार कित्येक महिलांसोबत घडलेले आहेत. संपूर्णतः हे थांबवणे शक्य नसले तरी महिलांनी जागरूक असले तर असे प्रकार नक्कीच बंद होऊ शकतात.
महिलांना फसविण्याचा प्रकार प्रामुख्याने ज्या माध्यमातून घडते ते म्हणजे बनावट ई-मेल : एकतर्फी प्रेम, राग, व्यावसायिक मतभेद, जळवणूक यातून महिलेचे नाव बदनाम करण्यासाठी तिच्या नावे बोगस ई-मेल आयडी तयार करून तिच्या ओळखीच्या अथवा कुटुंबीयांना बदनामीकारक ई-मेल पाठवला जातो.
हॅरॅसमेट व्हाया ई-मेल : सारखे सारखे ई-मेल पाठवून ई-मेल क्रश करायचा. ई-मेल पाठवून महिलेला भेटायला बोलवायचे. ई-मेल पाठवणे, हे या प्रकारात मोडते. सायबर स्टॉकिंग : फेसबुक सारख्या सोशल नेटवìकग साइट्सवर महिलेचा माग काढणे, तिच्या प्रोफाइलवर ईल कमेंट करून त्रास दिला जातो. पोर्नोग्राफी : ईल चित्र, व्हीडिओ एमएमएस पाठवून त्रास देणे, अल्पवयीन मुलींना व्हीडिओ दाखवणे. मॉर्फिंग : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नग्न छायाचित्रावर महिलेचा चेहरा लावला जातो. त्यानंतर हे छायाचित्र मोबाईल फोन, सोशल नेटवìकग साईट, पोर्नसाईट्सवर अपलोड केली जातात. डिफमेशन : मॉíफग, स्पुिफगच्या साहाय्याने महिलेची बदनामी केली जाते. एकतर्फी प्रेम, रागातून अशी कृत्य केली जातात. असे अनेक प्रकार दिसून येतात. यासाठी प्रतिबंध म्हणून घरचा पत्ता, खासगी मोबाईल, बँक खाते क्रमांक इतर माहिती कोणाला सांगू नका. अथवा ते कोणाच्या हाती लागतील अशा ठिकाणी ठेऊ नका. येणारे ई-मेल, फोन, एसएमएस यांची उत्तरे देताना सावधानता बाळगा. त्याद्वारे खासगी माहिती व इतर माहितीची विचारपूर्वक उत्तरे द्या. तुमचा सोशल सिक्युरिटी क्रमांक देऊन नका. ब्लॉग किंवा वेबसाईटवर स्टॅट्स काऊंटर ठेवा. बँक खाते नियमित तपासून पाहा. एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशन तुटल्यानंतर त्याला सांगितलेला पासवर्ड व इतर खासगी माहिती त्वरित बदला. तुमच्या ई-मेल अथवा सोशन नेटवìकग साइट हॅक झाल्याचे संशय येत असल्यास तुमचा संगणक अनुभवी माणसाकडून तपासून घ्या. ई-मेल आयडी निर्माण करतानाचा प्रश्न व त्याचे उत्तर कोणाला सांगू नका. ईवडील अथवा विश्वासू माणसाकडून इमोशनल सपोर्ट मिळवा.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांत पोलिसांचे सायबर सेल स्थापन करण्यात आले आहेत. तेथे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी घेतल्या जातात. तसेच जवळपासच्या पोलिस ठाण्यांतही सायबर गुन्ह्यांबाबतच्या तक्रारी दाखल करता येतात. आता पोलीस ठाणे सुद्धा हायटेक होत असल्याने जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते.