एसटी बसेस मध्ये नेहमी काही ना काही प्रयोग होत असतात. मागेच टपावरील कॅरियर काढून टाकण्यात आले होते आणि सामानासाठी एसटी च्या दोन्ही चाकामध्ये जागा करण्यात आली. यावेळीसुद्धा एसटी ‘वायफाय‘ होणार असून एसटी मध्ये फ्री वायफाय सेवा देण्यात येणार आहे. एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजन करण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या एसटी आगारामध्ये ही सुविधा प्रथम सुरु करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ही सुविधा सर्वत्र चालू होणार असून या वायफायचा वापर कसा करायचा याबद्दलच्या सूचना एसटी बसच्या सीटच्या मागे देण्यात आल्या आहेत. या सेवेद्वारे एसटी सुद्धा हायटेक होत आहे.