पोट साफ होत नाही ?

बद्धकोष्ठतता

आज आपण पाहणार आहोत पोट साफ होत नाही ?

या मागचे कारणे, लक्षणे ज्यामुळे तुम्ही या होणाऱ्या त्रासापासून स्वताला रक्षित करू शकाल.आज आपण पाहणार आहोत पोट साफ होत नाही ? या मागचे कारणे, लक्षणे ज्यामुळे तुम्ही या होणाऱ्या त्रासापासून स्वताला रक्षित करू शकाल.बऱ्याच व्यक्तींना होणारा त्रास, पोट साफ न होणे म्हणजे शौचास साफ न होणे अथवा बिलकूल न होणे होय. अथवा पोट अर्धवट साफ झाल्या सारखे वाटणे. ज्यांना शौचास साफ होत नाही अशा लोकांमध्ये मलाशयात जमा झालेला मल योग्यवेळी बाहेर पडला नाही. तर त्यातील पाण्याचा अंश जो मलाला मऊ ठेवत असतो, तो रक्ताच्या प्रवाहात शोषला जातो, त्यमुळे मलाला कठीणपणा येतो. म्हणून मलाला पूढे सरकण्यास त्रास होतो. ज्यावेळी असा कठीण मल पूढे सरकतो, त्यावेळी गुद व गुदनलीकेतील पेशी दुखावल्या जातात. यापासूनच पूढे कालातंराने मुळव्याध व फिशर या आजाराची सुरुवात होते.  मलाला शरीरामध्ये केवळ टाकाऊ पदार्थ समजला जातो व त्याचे वेळेवर विसर्जन करणे अत्यावश्यक समजले जात नाही. लोक इतर कामात व्यस्त असतात मल विसर्जनाच्या नैसर्गिक प्रक्रियेला दाबून ठेवतात. त्यामुळे हळूहळू पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता व्हायला या गोष्टी कारणीभूत ठरतात.

काही लोक पोट साफ न होत असल्यामुळे औषधी घेतात त्यांना त्याचा परिणाम लगेच मिळतो म्हणजेच दुसऱ्या दिवशी पोट साफ होते. परंतु असे केल्याने आपणास असणारा हा त्रास नेहमी करता थांबत नसून तो पुनःपुन्हा उद्भवतो.

पोट साफ न होण्याची म्हणजेच बद्धकोष्ठतेची मुख्य कारणे –
१) मलविसर्जनाची नैसर्गिक वेळ टळणे अथवा टाळणे.
२) खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी.
३) एकदा घेतलेला आहार पचण्यापुर्वीच पुन्हा आहार घेणे.
४) नेहमी कोरडे पदार्थ व शिळे पदार्थ आहारात घेणे.
५) नेहमीच फ्रीजचे अथवा थंड पाणी पिणे.
६) फ्रीज मध्ये असलेले थंड पदार्थांचे सेवन करणे.
७) जेवण वेळेवर न करणे.
८) हॉटेल अथवा बाहेर बनणारी तेलकट पदार्थ खाणे.
९) मैद्याच्या पदार्थांचे सेवन करणे.
१०) चहा, कॉफीच्या सेवनामुळे
११) दारूच्या अतिसेवनामुळे
१२) रात्री जागरण करणे, मानसिक तणाव असणे.
१२) गरोदरपणा मुळे
१३) व्यायामाचा अभाव असणे.
१४) काही औषधीच्या दुष्परिणामामुळे देखील हे होऊ शकते.

पोट साफ न होण्याची म्हणजेच बद्धकोष्ठतेची मुख्य लक्षणे – 
१) पोट जड वाटणे.
२) मलविसर्जनाच्या वेळी जोर लावावा लागणे.
३) मलविसर्जनास वेळ लागणे.
४) मलविसर्जन व्हावे तशी न होणे.
५) भूक मंद अथवा न लागणे.
६) शांत झोप न लागणे, डोके दुखणे.
७) दुर्गंधी ग्यासेस पास होणे.
८) कामात उत्साह न वाटणे.
९) स्वभाव चिडचिडा होणे.