जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत औरंगाबाद जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती येथे अनेक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. एकूण ७ पदांसाठी ही भरती करण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०१७ आहे.
पदांची नावे :
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : 03 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 02 जागा
लेखापाल : 01 जागा
डीआरटीबी समुपदेशक : 01 जागा
यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : पदवी + MSCIT + कायमस्वरूपी दुचाकी वाहन चालविन्याचा परवाना आवश्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 10+2 आणि डिप्लोमा किंवा Medical Laboratory Technology किंवा समकक्ष सर्टिफिकेट कोर्स परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
लेखापाल : कॉमर्स शाखेतील पदवी परीक्षा + अनुभव
डीआरटीबी समुपदेशक : सोशल वर्क/Socilogy/Phychology विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण अवश्यक.
उमेदवाराने किमान 18 वर्षे पूर्ण व 65 वर्षे पर्यंत शिथिलक्षम राहील. उमेदवाराने अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावे. अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, आमखास मैदानजवळ, व्ही.आय.पी. रोड, औरंगाबाद – 431001.
खुल्या प्रवर्गासाठी 200/- रु तर मागास प्रवर्गासाठी 100/- रु अर्ज फी असून अर्ज करण्याची फी ही DD द्वारे स्वीकारण्यात येईल. यासंबंधी अधिक माहितीसाठी www.aurangabadzp.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी. विस्तृत जाहिरात व अर्जाच्या नमुन्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.aurangabadzp.gov.in/htmldocs/RNTCPRecruiment.html