राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग अखत्यारीतील सहाय्यक वन संरक्षक व वन क्षेत्रपाल पदांच्या ३७ जागांसाठी पूर्व परीक्षेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा दि. ४ जून २०१७ रोजी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा रविवार, १५ ऑक्टोबर २०१७ रोजी किंवा त्या नंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.
अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द्तीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
पदनाम व संख्या :
वनक्षेत्रपाल (गट-ब) : 37 जागा
वनक्षेत्रपाल (गट-ब) : 37 जागा
शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक वनसंरक्षक :
उमेदवार हा खालील विषयातील किमान एका विषयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
१. वनस्पतीशास्त्र
२. रसायनशास्त्र
३. वनशास्त्र
४. भूशास्त्र
५. गणित
६. भौतिकशास्त्र
७. सांखिकीशास्त्र
८. प्राणीशास्त्र
९. उद्यानविद्या
१०. पशुसंवर्धन व पशु वैद्यशास्त्र किंवा कृषि, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर.
वनक्षेत्रपाल :
१. वनस्पतीशास्त्र,रसायनशास्त्र,वनशास्त्र,भूशास्त्र,गणित,भौतिकशास्त्र,सांखिकीशास्त्र,प्राणीशा,उद्यानविद्या, कृषि, रसायन अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत् अभियांत्रिकी, इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी, संगणक अप्लिकेशन, संगणक विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील विज्ञान शाखेची पदवी किंवा
२. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
वयोमर्यादा : उमेदवार हा 01 ऑगस्ट, 2017 रोजी,
सहाय्यक वनसरंक्षक पदासाठी : किमान 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
वनक्षेत्रपाल : किमान 21 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल.
अपंग : 45 वर्षे पर्यंत सूट राहिल.
शारीरिक पात्रता :
अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उमेदवार :
पुरुष :
उंची : १६३ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
छाती : फुगवून ७९ सेंमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली आणि फुगवून यामध्ये ५ सेंमी पेक्षा कमी फरक नसावा.
महिला:
उंची : १५० सेमी. पेक्षा कंमी नसावी.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार :
पुरुष :
उंची : १५२.५ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
छाती : फुगवून ७९ सेंमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली आणि फुगवून यामध्ये ५ सेंमी पेक्षा कमी फरक नसावा.
महिला:
उंची : १४५ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे असून परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. पूर्व परीक्षा ही १०० गुण आणि मुख्य परीक्षा ४०० गुणांची राहील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल, 2017 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
जाहिरात लिंक :
https://mahampsc.mahaonline.gov.in/PublicApp/STD/GetFile_MPSC.ashx?ID=a9a41f4c-54c4-43f3-adc5-6f06df250c84
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx