व्हाटसअॅप द्वारे आता ग्रुप कॉल करता येणार

whatsapp new feature

व्हाटसअॅप बीटाच्या पुढील रिलीज मध्ये आता ग्रुप कॉल करता येणार आहे. यामध्ये एकच नव्हे तर अनेक व्यक्ती एकाच वेळी बोलू शकतील. ग्रुप संभाषण किंवा Conference Call सुद्धा याला म्हणता येईल. यामध्ये कॉल करणाऱ्या व्यक्तीशिवाय इतर तीन म्हणजे एकूण ४ व्यक्ती एकाच वेळी एकमेकांशी बोलू शकतील. WABetaInfo या वेबसाईट ने दिलेल्या माहितीनुसार हे नवीन फिचर व्हाटसअॅप बीटाच्या 2.18.39 मध्ये मिळणार आहे.

हा Conference Call हा व्हिडिओ असणार आहे की व्हॉइस कॉल असणार याचा खुलासा झालेला नाही. सध्या तरी या फीचरचे परीक्षण चालू असून लवकरच हे सर्व व्हाटसअॅप यूजर्स साठी मिळणार असल्याचे संकेत आहे. परंतु नेमकं केव्हा हे फिचर व्हाटसअॅप च्या अपडेट मध्ये यूजर्स ला उपलब्ध होईल यासंबंधी कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही. मागील वर्षी ऑक्टोबर २०१७ च्या व्हाटसअॅप बीटाच्या 2.17.70 मध्ये ह्या फिचर संबंधी चर्चा झाली होती. फेसबुक ची मालमता असलेल्या व्हाटसअॅप मध्ये हे व्हॉइस कॉल फिचर समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती या आधी मिळाली होती. त्या नंतर आता पुन्हा व्हॉइस कॉल च्या फिचर ची टेस्टिंग चालू आहे. फेसबुक च्या मेसेंजरअॅप मध्ये आधीच हे फिचर समाविष्ट आहे.

१ अब्जापेक्षा अधिक लोक व्हाटसअॅप चा वापर करतात. जगातील ५० आणि भारतातील १० भाषेत व्हाटसअॅप उपलब्ध आहे. मागेच व्हाटसअॅपने भारतात छोट्या मोठ्या आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री साठी आपले ‘बिझनेस अॅप’ आणलेले आहे. हे अॅप फ्री असून या अॅपचा मुख्य उद्देश म्हणजे कंपनीस आपल्या ग्राहकांपर्यंत सहज आणि सुलभतेने जोडणे आहे.