लग्नसोहळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि आता लगबग चालू होईल. या काळात सर्वात जास्त लक्ष वधू वर असते. सर्व मुलगी कशी आहे याकडे लक्ष देत असतात तर ज्या मुलीचे लग्न आहे ती सुद्धा जास्तीत जास्त मेहनत घेऊन सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असते. लग्नाच्या एक महिनाआधी मुलीने काय तयारी केली पाहिजेत त्या बघू.
जसं जसं लग्न जवळ येत असत तशी लगबग आणि धाकधूक वाढते. अनेक मुली चिंता आणि तणावात दिसून येतात. परंतु काही गोष्टी जर लग्नाच्या एका महिनाआधी पासून सुरु केल्या तर हा तणाव टाळता येऊन सुंदर दिसण्यास मदत होवू शकते. ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी तुम्ही छान मेकअप केला असला तरी जर तुम्ही तणावात असाल तर तुमची सुंदरता नष्ट झालीच म्हणून समजा. म्हणून शक्यतो त्या दिवशी तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हसत खेळत आणि मोकळं राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला अनकंफर्टेबल वाटणार नाही.
लग्नाच्या एक महिना आधीपासून जर तुम्ही काही प्रयोग केलेत तर तुम्ही सुंदर दिसलाच आणि ऐनवेळी होणारी धावपळ आणि तणाव दूर होण्यास मदत होईल.
१. बॉडी वॉश : बाजारात अनेक बॉडी वॉश मिळतात ज्यामध्ये साबण नसतो. अशा बॉडी वॉश चा उपयोग केल्यास त्वचा कोरडी होत नाही . मुलायम राहते.
२. स्क्रब : चेहरा आणि इतर नाजूक भागात स्क्रब चा वापर केल्यास त्वचा मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होते. यासाठी ‘ऑलिव्ह ऑइल’ चा उपयोग केल्यास त्वचा कोरडी राहत नाही .
३. शॉवर बॉडी ऑइल : ‘शॉवर बॉडी ऑईल्स ‘ वापरल्यास त्वचा मुलायम राहते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि कडक होत नाही.
४. लिपबाम : नरम आणि कोमल ओठ करायचे असतील तर रोज रात्री झोपण्याआधी आपल्या ओठांना लिपबाम लावावे म्हणजे ते सुंदर आणि कोमल होण्यास मदत होईल. बाजारात अनेक कंपन्यांचे लिपबाम लगेच उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार हवा तो फ्लेवर तुम्ही निवडू शकता.
५. पुरेशी झोप : स्वस्थ आणि सुंदर चेहरा कुणाला नको. त्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे. लग्न कार्य आहे आणि कामे पडलीत म्हणून अनेक घरी या काळात जागरण होत असतात. परंतु जर जागरण नेहमी होत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या स्वास्थ आणि शरीरावर पडतो. चेहरा टवटवीत न दिसत थकलेला आणि निरुत्साही दिसतो. म्हणून पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
६. पाणी: दिवसभर कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी दिवसभरात ८ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचा कोरडी आणि अनाकर्षक होणार नाही.
७. ब्लिच आणि इतर : लग्न काळात शॉपिंग, खरेदी इ. कारणामुळे बाहेर फिरावे लागते त्यामुळे त्वचा काळवंडते आणि कोरडी पडते. धूळ-प्रदूषण यामुळे त्वचेस होणारे नुकसान दूर करण्यासाठी ब्लिच, वॅक्सिंग इ. करून घ्यावे.