व्हाट्सअॅप् यूजर्ससाठी इंडियन आर्मीचा सतर्कतेचा इशारा

indian army on chinese hackers

व्हाट्सअॅप् वापरतांना आता तुम्हाला सावध व्हावे लागणार आहे. त्यासंबंधी सतर्क राहण्याचा इशाराच इंडियन आर्मीने देशवासियांना केला आहे. चीनी हॅकर्स सध्या करोडो भारतीय व्हाट्सअॅप् यूजर्स चे व्हाट्सअॅप् अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे इंडियन आर्मीने कळविले आहे.

इंडियन आर्मी च्या अधिकृत ADG PI – INDIAN ARMY@adgpi ट्विटर हॅण्डल वरून यासंबंधी मेसेज आणि विडिओ दिलेला असून भारतातील करोडो व्हाट्सअॅप् यूजर्स ला येत्या काही दिवसांत अधिक सजग आणि सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. व्हाट्सअॅप् सारखे प्रभावी माध्यमच यावेळी हॅकर्स ने वापरून भारतीय यूजर्स ला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तुम्ही वापरत असलेले तुमचे व्हाट्सअॅप् चे पर्सनल अकाउंट अथवा ग्रुप मध्ये असलेली सगळी माहिती आणि इतर बाबी हॅकर्स च्या नजरेत आहे. +86 ने सुरु होणारे मोबाईल क्रमांक तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरून हेरगिरी करून तुमची माहिती चोरू शकतात. खुद्द इंडियन आर्मी ने यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी सुद्धा LOC वर असणाऱ्या सैनिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडियन आर्मी ने सतर्कतेचा इशारा दिला होता.

इंडियन आर्मी च्या ट्विटर हॅण्डल एडिशनल डायरेक्टरेट जनरल ऑफ पब्लिक इंटरफेस (ADGPI) ने यासंबंधी माहिती दिली आहे. इंडियन आर्मीने यासंबंधी काय व्हिडिओ शेयर केला आहे. हे त्यांचा ट्विटर हॅण्डल वर तुम्ही बघू शकता.

‘व्हाटस ऍप’ चे हे दोन नवीन फीचर्स तुम्हाला माहिती आहे का ?

सोशल मेसेजिंग ऍप ‘व्हाटस ऍप’ ने दोन नवीन फीचर्स आणले आहेत. खूप मोठा असा बदल ऍप मध्ये या फीचर्स ने होणार नसला तरी हे फीचर्स यूजर्स ला आवडीतील असे आणि तुमचं सोशल लाईफ अधिक सोपं आणि जलद बनवणारे आहेत. ‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्समुळे तुम्ही टेक्स्ट ची स्टाईल बदलू शकता आणि तुम्हाला ईमोजी शोधण्यास सुद्धा मदत होते. ‘व्हाटस ऍप’ च्या अपडेट मध्ये तुम्हाला हे बदल दिसून येतील.

‘व्हाटस ऍप’ चे नवीन फीचर्स कसे असतील ?
‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्स मुळे तुम्ही मेसेज टाईप करत असाल तर तुम्हाला आधीच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. आधी कुठलाही शब्द किंवा ओळ बोल्ड, अंडरलाईन वा इटालिक करायची असेल तर मेसेज च्या आधी आणि नंतर “/” “*” वापरून स्टाईल बदलावी लागत असे. अनेकांना हा प्रकार कठीण तर लक्षात सुद्धा राहत नसे. परंतु ‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्समुळे हा त्रास बदलणार आहे. आता यूजर्स ला कुठलाही शब्द अथवा ओळ बोल्ड, इटालिक किंवा अंडरलाईन करायची असेल तर त्या शब्दावर क्लिक करून ठेवावं लागेल. त्यानंतर एक छोटा पॉपअप मेसेज दिसेल ज्यामध्ये “cut copy paste ” ऑप्शन दिसतील त्या बाजूला तीन उभे बिंदू दिसतील त्याला क्लिक करायचं. म्हणजे पुन्हा एक छोटा पॉप अप येईल त्यामध्ये “Translate, Bold, Italic आणि Monospace ” असे ऑप्शन दिसून येतील त्यावर क्लिक म्हणजे आपल्याला हवं ते वाक्य बोल्ड, इटालिक अथवा ट्रान्सलेट करता येऊ शकते. तिथे असलेल्या अनेक फीचर्स चा उपयोग तुम्ही करून बघू शकता.

याशिवाय दुसरं फीचर्स म्हणजे ईमोजी शोधणे. या फीचर्समुळे तुम्हाला समजा एखादे ईमोजी पाठवायचे असेल तर फक्त त्या ईमोजी चे नाव टाईप करायचे किंवा बोलायचे म्हणजे ‘व्हाटस ऍप’ त्या नावाच्या संबंधित असलेले ईमोजी तुम्हाला दाखवतो. त्यामधून निवडून आपण ते ईमोजी समोरच्या यूजर्स ला पाठवू शकतो.  भारतात २०० दशलक्ष यूजर्स व्हाटस ऍप’ चा वापर करतात. जगातील प्रथम क्रमांकावर असलेल्या ‘व्हाटस ऍप’ ने आपल्या यूजर्स साठी नेहमीच काही ना काही विशिष्ठ फीचर्स आणलेले आहेत. त्यामुळेच ‘व्हाटस ऍप’ हे सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय मेसेजिंग एप्लिकेशन बनलेले आहे.

व्हाट्सएप्प कडून नविन फिचर

new whatsapp feature status

आपलं व्हाट्सएप्प तुम्ही अपडेट केलं आहे का ? ज्यांनी केलंय त्यांना व्हाट्सएप्प कडून नविन फिचर गिफ्ट मिळालं आहे. हे फिचर काय आहे ? सांगायचं झालं म्हणजे आधी हे फिचर ‘स्नॅपचॅट’ मध्ये होत तसेच व्हाट्सएप्प ने सुद्धा आणले आहे. आपलं स्टेटस अपडेट !!!

आधी फक्त टेक्स्ट स्वरूपात असलेलं स्टेटस अपडेट आता बदललं आहे. एखादी इमेज, विडिओ किंवा GIF आपण आता स्टेटस च्या रूपात ठेवू शकतो. आधी आपलं स्टेटस बघायला संबधित व्यक्तीच्या प्रोफाइल वर जावं लागायचं परंतु नव्या फीचरमुळे आपल्या लिस्ट मध्ये असेल्या प्रत्येकाचं स्टेटस आपल्याला एकाचवेळी बघता येते. शिवाय आपण आपलं स्टेटस किती जणांनी बघितलं हे सुद्धा बघू शकतो. एवढंच नाही तर आपलं स्टेटस इतरांना फॉरवर्ड सुद्धा करता येतं.

व्हाट्सएप्प च्या डॅशबोर्ड वर गेल्यावर मध्ये ‘status’ दिसून येत त्या वर क्लिक केलं की, सर्वात आधी आपण ठेवलेलं स्टेटस आणि त्या नंतर इतरांचे ताजे स्टेटस दिसून येतात. त्या खालीच किती जणांनी आपलं स्टेटस बदललं आहे त्याची लिस्ट दिसून येते. “my status ” ला क्लिक केल्यावर किती जणांनी ते बघितल त्याचा आकडा तर पुढे छोट्या हिरव्या रंगात असलेल्या बाणाने आपण आपलं स्टेटस इतरांना पाठवू शकतो. आहे ना झक्कास फिचर !

तुम्हाला जर हे तुमच्या व्हाट्सएप्प मध्ये दिसत नसेल तर तुमचं व्हाट्सएप्प अपडेट करा मग तुम्ही सुद्धा याचा आनंद घेऊ शकता. व्हाट्सएप्प अपडेट करण्यासाठी गुगल प्ले मध्ये जा आणि वरती दिसत असलेल्या “search bar’ मध्ये ‘whatsapp’ टाईप करा त्या नंतर व्हाट्सएप्प दिसू लागेल तिथे update बटनावर क्लिक केलं म्हणजे आपलं व्हाट्सएप्प अपडेट होईल.

महापुरुषाची विटंबना करण्याऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सोशल मीडियावर सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,माँ जिजाऊ आणि इतर महापुरुषांबद्दल घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

व्हाट्सऍपच्या एका क्रमांकावर सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,माँ जिजाऊ आणि इतर महापुरुषांबद्दल घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले असून सदर कृत्य हे निंदनीय आहे. तसेच नवीन आलेल्या माळीन बाई या गीतामध्ये अश्लीलता आणि महिलांचा अपमान करणाऱ्या शब्दांचा समावेश असून यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  त्याचा संग्रामपूर तालुका माळी समाज आणि सावता परिषद यांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. याबद्दलची तक्रार संग्रामपूरचे तहसीलदार आणि तामगाव पो.स्टे चे ठाणेदार बी.आर गीते यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की नवीन आलेल्या माळीन बाई या गीतामध्ये अश्लीलता आणि महिलांचा अपमान करणाऱ्या शब्दांचा समावेश असून यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आणि माळी समाजातील महिलांची टिंगल उडविण्यात आली.  या गीतामुळे समाजातील महिलांचा व मुलींचा अपमान करण्याचे काम करण्यात आले असून या दोन्ही प्रकरणात संबंधित व्यक्तीवर आणि त्यांना मदत करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी साहेबराव बोदडे, गजानन ढोकणे, राम निमकर्डे, नारायण सावतकार, विनोद राजनकार, अनंता वानखडे, अनंत खिरोडकार, संदीप मानकर, आकाश मेहेत्रे, गणेश वानखडे, सुरेश सातव यांनी केली आहे.

तसेच एमएच २८.इन बुलडाणा सुद्धा या घटनेचा निषेध करीत आहे. 

प्रतिनिधी: आकाश पालीवाल पातुर्डा