महाराष्ट्रातील अकार्यक्षम खासदार यादीत प्रतापरावजी जाधव व अडसूळ

Buldhana district official website

मोदी सरकार सत्तेवर येवून १ वर्ष लोटलं आहे. या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा खुद्द पंतप्रधानांनी ‘अच्छे दिन’ असा केला असला तरी ही फक्त सुरुवात आहे. हळूहळू बदल घडून येतील असे म्हणणे आहे. तर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस ने मात्र मोदी ला १०० पैकी ० गुण देवू केले. या वर्षभरात प्रत्येक खासदाराला आपल्या मतदार संघात विकास कामे करण्यासाठी दिलेला निधी हा पडून असल्याचे दिसून आले आहे. लोकसभेतील ५४२ खासदारांपैकी तब्बल २९८ खासदारांनी खासदार निधीतील एक रुपयाही खर्च केला नसल्याचे उघड झाले आहे. यात उत्तर प्रदेश पहिला तर महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.

विद्यमान २९८ खासदारांनी आपल्या वार्षिक ५ कोटी निधीपैकी एक रूपयाही खर्च केलेला नाही. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ३० खासदारांचा समावेश आहे.आपल्या जिल्ह्याचे मा. प्रतापरावजी जाधव यांचे सोबत अमरावतीचे आनंदराव अडसूळ यांचा सुद्धा ह्या मध्ये समावेश आहे. यांच्या शिवाय नाना पटोले भंडारा व गोंदिया, बीडच्या प्रितम मुंडे, ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, नाशिकचे हरिश्चंद्र चव्हाण , हिंगोलीचे राजीव सातव असे एकूण ३० खासदार आहेत.
मतदारसंघ विकासासाठी खासदारांना पाच कोटी रुपयांचा विकासनिधी दिला जातो. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजेच १६ वी लोकसभा स्थापन झाल्यानंतर, केंद्र सरकारने खासदार निधीसाठी १७५७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी फक्त २८१ कोटी रुपये म्हणजेच १६ टक्के निधी खर्च झाला आहे. १५ मे २०१५ पर्यंत तब्बल १४७६ कोटी रुपये पडून होते