अंगसंचालन

Angsanchalan

आपण पूर्वी पहिले योगासन करण्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी असता त्या आपणास आचरणात आणाव्या लागता. आज आपण पाहणार आहोत अंगसंचालन. आसनाला सुरुवात करण्या पूर्वी आपणास काही क्रिया करावी लागते त्यास अंगसंचलन म्हणतात. अंगसंचालनामध्ये आपणास आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला एक विशिष्ट पद्धतीने हाल चाल करावी लागते. ते आता आपण पाहूया.

अ) हाताचे संचलन
१) सर्व प्रथम हाताची मूठ बनवा, ती उघडा हि क्रिया १० वेळा करा.
२) हाताची मूठ बंद करून ते गोलाकार फिरवा १० वेळा, आता उलट्या दिशेने १० वेळा फिरवा.
३) आता दोन्ही हात हे खाद्यां पासून गोलाकार फिरवा १० वेळा, आता उलट्या दिशेने १० वेळा फिरवा.
४) आपले हात खांद्यांच्या समांतर ठेवा व हाताला फोल्ड (जवळ) करून हाताचे पंजे खांद्यावर ठेवा, पुन्हा हात समांतर ठेवा हि क्रिया १० वेळा करा.

ब) मानीचे संचलन
१) आपली मान हरूवार पणे समोर घ्या, आता मान मागे जाऊ द्या असे ५ वेळा करा.
२) आपली मान उजव्या बाजूने झुकवा आता मान डाव्या बाजूने झुकवा असे ५ वेळा करा.
३) आपली मान हरूवार पणे उजव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

क) डोळ्यांचे संचलन
१) डोळे मोठे करत हरूवार पणे दूरचे पाहण्याचा प्रयत्न करा, आता डोळे लहान करत जवळचे पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
२) स्वतःच्या उजव्या कानाला पाहण्याचा प्रयत्न करा, आता डाव्या कानाला पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
३) डोळ्यांनी स्वतःची हनुवटी पाहण्याचा प्रयत्न करा, आता डोक्यांचे केस पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
४) आता डोळे उजव्या बाजूने हरूवार पणे (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

ड) कंबरेचे संचलन
१) आपली कंबर हरूवार पणे (५) समोर झुकावा, आता कंबर (५) मागे झुकावा असे १० वेळा करा.
२) आपली कंबर हरूवार पणे उजव्या बाजूने (५) झुकवा आता कंबर डाव्या बाजूने (५) झुकवा असे १० वेळा करा.
३) आपली कंबर हरूवार पणे उजव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

इ) गुडघे यांचे संचलन
१) खाली वाकून दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा उजव्या बाजूने गोलाकार १० वेळा फिरवा.
२) आता गुडघे डाव्या बाजूने गोलाकार १० वेळा फिरवा.

उ) पायाचे संचलन
१) उजवा पाय उजव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा, आता डाव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा असे १० वेळा करा.
२) डावा पाय उजव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा, आता डाव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा असे १० वेळा करा.
३) पायांची बोटे वर खाली करा हि क्रिया १० वेळा करा.

हि पूर्ण क्रिया केल्याने सर्व शरीराचे अंग आसन करण्यासाठी तयार होते. आसन करण्यास मदत होते. आसन करण्याचा अत्याधिक लाभ देखील आपणास मिळतो. त्यामुळे आसन करण्यापूर्वी सर्वप्रथम अंगसंचालन करणे अत्यावश्यक आहे.