पद्मासन

Padmasana

आता पर्यंत आपण पाहले आहे अष्टांग योग, योगासन करण्या पूर्वी आवश्यक बाबी व अंगसंचालन. आज आपण पाहणार आहोत आसन. ज्या स्थिती मध्ये शरीर स्थिर व त्या स्थिती मध्ये मनाला सुख व शांतीची अनुभूती होते त्या स्थितीला आसन म्हटल्या जाते. आसन केल्याने शरीरातील नस-नाड्या शुद्धी होते त्या मुळे आपली तब्बेत चांगली राहते, तण व मन प्रसन्न राहते. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर शक्तिशाली व निरोगी बनते.

पद्म म्हणजे कमळ. या आसनामध्ये शरीराला कमळासारखा आकार प्राप्त होतो. त्यामुळे या आसनास पद्मासन म्हणतात. हे आसन ध्यान आणि जप करण्यासाठी केला जातो. हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. गौतम बुद्धांनी देखील ध्याना करता पद्मासन या आसनाचा वापर केला होता.

कृती :
सर्व प्रथम जमिनीवर बसून पाय लांब करून ताठ बसावं. नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा. आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. काहींना जर पहिले डावा पाय उजव्या पायाच्या माडीवर व उजवा पाय हा डाव्या पायाच्या माडीवर ठेवू शकता (जे सोपे जाईल तसे करा). नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांचे अंगठे तर्जनीच्या टोकाला लावावेत व हात गुडघ्यावर ठेवा. डावा हात डाव्या गुडघ्यावर आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. पाठ आणि मान ताठ ठेवावी. डोळे बंद ठेवावेत.
आसनाची सुरुवात करताना प्रथम सुरुवातीस पाच मिनिटे या आसनात बसावं. या आसनात बसल्यास मनाला शांती मिळते. सुरुवातीस काही दिवस दोन ते तीन मिनिटं बसावं व हळूहळू वेळ वाढवावा.

अनुभव :
पद्मासन या आसनात बसल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. त्यामध्ये जर या परिस्थिती मध्ये आपण जर डोळे बंद केलेले असेल व मन एकाग्र असेल तर आपले मन हे अंगठा व तर्जनी जेथे स्पर्श करतात तेथे न्या. तुम्हाला येथे एक अनुभूती होईल हि अनुभूती प्रत्येकाची वेग वेगळी व सारखी देखील येऊ शकते. तुम्हाला असे जाणू शकते कि दोन्ही बोटे ऐक मेकाला ढकलत आहे, हुद्यावर हात ठेवल्या नंतर ज्या प्रमाणे ठोके जाणवतात तसे तुम्हाला येथे अनुभूती होईल तुम्हाला या व्यतिरिक्त हि अनुभव येऊ शकता.

घ्यावयाची काळजी :
सुरुवातीस हे आसन काहींना जमणार नाही. हे आसन करताना मांडया खूप दुखतील. तेव्हा या आसनात १० सेकंदच राहावं.
काहींचे जर पाय दुखत असतील तर हे आसन करूं नये.

फायदे :
या आसनामुळे शरीराचा लठ्ठ पणा कमी होते.
या आसनाचा उपयोग ध्यान, धारणा, प्राणायाम, जप आणि समाधीसाठी केला जातो.
या आसनामुळे दमा, निद्रानाश यासारखे रोग नाहीसे होऊ शकतात. ईतरही भरपूर फायदे या आसनाचे आपणास मिळतात.

अंगसंचालन

Angsanchalan

आपण पूर्वी पहिले योगासन करण्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी असता त्या आपणास आचरणात आणाव्या लागता. आज आपण पाहणार आहोत अंगसंचालन. आसनाला सुरुवात करण्या पूर्वी आपणास काही क्रिया करावी लागते त्यास अंगसंचलन म्हणतात. अंगसंचालनामध्ये आपणास आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला एक विशिष्ट पद्धतीने हाल चाल करावी लागते. ते आता आपण पाहूया.

अ) हाताचे संचलन
१) सर्व प्रथम हाताची मूठ बनवा, ती उघडा हि क्रिया १० वेळा करा.
२) हाताची मूठ बंद करून ते गोलाकार फिरवा १० वेळा, आता उलट्या दिशेने १० वेळा फिरवा.
३) आता दोन्ही हात हे खाद्यां पासून गोलाकार फिरवा १० वेळा, आता उलट्या दिशेने १० वेळा फिरवा.
४) आपले हात खांद्यांच्या समांतर ठेवा व हाताला फोल्ड (जवळ) करून हाताचे पंजे खांद्यावर ठेवा, पुन्हा हात समांतर ठेवा हि क्रिया १० वेळा करा.

ब) मानीचे संचलन
१) आपली मान हरूवार पणे समोर घ्या, आता मान मागे जाऊ द्या असे ५ वेळा करा.
२) आपली मान उजव्या बाजूने झुकवा आता मान डाव्या बाजूने झुकवा असे ५ वेळा करा.
३) आपली मान हरूवार पणे उजव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

क) डोळ्यांचे संचलन
१) डोळे मोठे करत हरूवार पणे दूरचे पाहण्याचा प्रयत्न करा, आता डोळे लहान करत जवळचे पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
२) स्वतःच्या उजव्या कानाला पाहण्याचा प्रयत्न करा, आता डाव्या कानाला पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
३) डोळ्यांनी स्वतःची हनुवटी पाहण्याचा प्रयत्न करा, आता डोक्यांचे केस पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
४) आता डोळे उजव्या बाजूने हरूवार पणे (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

ड) कंबरेचे संचलन
१) आपली कंबर हरूवार पणे (५) समोर झुकावा, आता कंबर (५) मागे झुकावा असे १० वेळा करा.
२) आपली कंबर हरूवार पणे उजव्या बाजूने (५) झुकवा आता कंबर डाव्या बाजूने (५) झुकवा असे १० वेळा करा.
३) आपली कंबर हरूवार पणे उजव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

इ) गुडघे यांचे संचलन
१) खाली वाकून दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा उजव्या बाजूने गोलाकार १० वेळा फिरवा.
२) आता गुडघे डाव्या बाजूने गोलाकार १० वेळा फिरवा.

उ) पायाचे संचलन
१) उजवा पाय उजव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा, आता डाव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा असे १० वेळा करा.
२) डावा पाय उजव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा, आता डाव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा असे १० वेळा करा.
३) पायांची बोटे वर खाली करा हि क्रिया १० वेळा करा.

हि पूर्ण क्रिया केल्याने सर्व शरीराचे अंग आसन करण्यासाठी तयार होते. आसन करण्यास मदत होते. आसन करण्याचा अत्याधिक लाभ देखील आपणास मिळतो. त्यामुळे आसन करण्यापूर्वी सर्वप्रथम अंगसंचालन करणे अत्यावश्यक आहे.

योगासन करण्या पूर्वी आवश्यक बाबी

Important Thing Before Yoga

योगासन करण्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी असता त्या आपणास आचरणात आणाव्या लागता. ज्यामुळे आपल्याला अत्याधिक फायदा मिळतो. योगासनचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा त्याला योग्य पध्द्तीने व सावधतेने केल्या जाते.

१) योगासन प्रात विधी व आंघोळ झाल्यानंतरच सुरुवात करावी.
२) योगासन करण्यासाठी बसण्याची जागा ही समांतर असावी.
३) योगासन करतांना कपडे साहिल / मोकळे / ढिले असावे.
४) योगासन खुल्या ठिकाणी जेथे हवा खेळती राहील अस्या ठिकाणी करावे.
४) हे विशेषतः लक्षात असु द्या की बंद खोली मध्ये योगासन करू नये.
५) योगासन करत असतांना अतिरिक्त शक्ती लावू नये. जोर जबरदस्ती योगासनमध्ये करू नये.
६) मासिकपाळी, गर्भावसस्थे मध्ये, आजारी असणाऱ्याने योगासन करू नये.
७) आपला आहार हा सामान्य व सात्विक असावा.
८) योगासन करण्याच्या ४ घंट्या पूर्वी कुठलाही आहार घेतलेला नसावा.
९) दोन आसनाच्या मधात अंतर असणे आवश्यक आहे.
१०) दोन आसनाच्या मधात थोडी विश्रांती आवश्यक आहे.
११) आसन करीत असतांना विधिवत करावे त्यात फेर बदल करू नये.
१२) कुठल्याही आसनाने शरीराला त्रास होत असेल अथवा दुखत असेल तर आसन करू नये.
१३) जर आपली वात प्रकृती असेल अथवा आपल्या शरीरात जास्त उष्णता असेल तर शीर्षासन व ज्या आसनाने रक्त प्रवाह डोक्याकडे जातो असे योगासने करू नये.
१४) योगासन करण्या पूर्वी अंगसंचालन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे शरीरातील संपूर्ण मास पेशी मोकळ्या (Relax) होतात व शरीर योगासन करण्यास तयार होते.

वरील दिलेल्या नियमाचे पालन केल्यास आपणास योगासन करण्याचा योग्य व अत्याधिक लाभ मिळेल.