जळगाव जा. येथे एसटी बस- कंटेनर अपघात

ST bus accident in buldana

आज दुपारी एसटी महामंडळाची बस जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे प्रवासी घेऊन येत होती. दरम्यान येरळी येथे येताच पूर्णा नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने बसला दिली. यामध्ये कंटेनर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर जखमी असण्याची शक्यता आहे.

नेहमीप्रमाणे आज दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे निघाली होती. येरळीतील पूर्णा नदीच्या पुलावरून बस जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. नदीवरील पूल अरुंद असल्याने भरधाव कंटेनर बसला धडक देवून थेट नदीपात्रात कोसळला. उंचावरून कोसळल्याने कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर जखमी असण्याची शक्यता आहे. कंटेनरने धडक दिल्याने बसचा मागील भाग पुलाखाली गेला. परंतु पुलावरील दगडांमुळे बस पुलाखाली कोसळली नाही आणि सुदैवाने जीवीतहानी टळली. बसमध्ये ५५ प्रवाशी प्रवास करीत होते. कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांच्या वतीने बस पुलावरून काढण्याचे सुरु होते.

बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

Buldhana District official website

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.

बस दरीत कोसळल्याने १ ठार, १५ जखमी

बस दरीत कोसळल्याने १ ठार, १५ जखमी झाल्याची घटना मुंबई- गोवा मार्गावर घडली आहे. मुंबई वरुन कोकणात जाणार्‍या बोरिवली-साखरपा एसटीला वालोपेजवळ अपघात झाल्याने एस टी अपघातात एकाचा मृत्यू, 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई- गोवा महामार्गावर सदर एसटी बसला भीषण अपघात घडला. 15 फूट दरीत बस कोसळल्याने १ जण ठार झाला आहे.

एसटी बसला अपघात – ४ ठार, १५ जखमी

आज शुक्रवारी भल्या पहाटे पावणेपाच वाजता एसटी बस व ट्रक च्या झालेल्या अपघातात ४ जण मरण पावले १५ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी मिरज ते पंढरपूर मार्गावर झाली. ही बस शेगाव वरुन सांगली कडे जात होती. अपघातात बसच्या उजव्या कडील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

एसटी महामंडळाची बस ही आज सकाळी सांगली कडे निघाली असताना शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता हा अपघात झाला. समोरून येणार्‍या ट्रक वर बस आदळल्याने बसचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, चार प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले तर १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता हा अपघात झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भारतीय वायूदलाच्या मालवाहक विमानाला अपघात; 5 ठार

भारतीय वायुदलाच्या ‘सुपर हर्क्युलस सी-१३० जे’ या मालवाहक विमानाचा ग्वाल्हेर येथे अपघात झाला असून, या घटनेत वायूदलाचे पाच जवान शहीद झाले.
वायुदलाच्या प्रवक्त्यांने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चाचणी दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सुपर हर्क्युलस सी-१३० जे’ हे अमेरिकन बनावटीचे विमान असुन मालवाहक विमान खरेदीसाठी भारताने अमेरिकेसोबत २००८ साली तब्बल ६००० कोटींचा करार केला होता. घटनास्थळी वायूदलाचे बचावकार्य सुरू आहे.भारतीय वायुसेनेकड़े अशी 6 विमाने आहेत. या आधी नौसेनेच्या पाणबुडी ला मागे अपघात झाला होता. त्यानंतर आज वायु सेनेच्या विमानाला अपघात झाला आहे.