आधार

संसारमयी जिवनात माझ्या,
तुझाच एक आधार होता.
तन मन हृदयातही,
तुझाच फक्त विचार होता.

कंटाळा आला माझा,
हे मला सांगायचं होतं.
आवडत नव्हते तुला मी,
हे मला जाणवलं होतं.

अंधारून आल्या दाही दिशा,
हे मला उमगलं होतं.
बनून वादळ वारा होवून,
जिवनच उध्वस्त माझं करायचं होतं.

सोडुन जायचे होतं,
तर तसं बोलायचं होतं.
असं चटकन नातं,
तोडायचं नव्हतं.

काय मिळाले तुला,
भावना माझ्या दुखवून.
प्रेम केले तुझ्यावर,
देह माझा झिजवून.

माझ्यावर जी वेळ आणली,
ती आणखी कोणावर आणू नकोस.
अर्ध्यावरती सोडून असा,
कोणालाही जावू नकोस.

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)