विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात ?

why-airplane-windows-are-round/

विमान हा आधीही आणि आतासुद्धा कुतूहलाचा विषय होता आणि आहे.  विमानाचे पंख, इंजिन, ते उडत कसं असेल अनेक प्रश्न आणि त्याच्यात बसण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. आकाशात उडणारं विमान म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतुहूल जागं होतं. अनेक प्रश्नांचं जाळं उभं राहतं. त्यापैकीच एक म्हणजे विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात ?

विमान आलं तेव्हापासून त्यात आमूलाग्र बदल झालेत. अनेक अपघात आणि त्यानंतर करण्यात आलेले बदल यामुळे आताचं विमान सुरक्षित आणि वेगवान सुद्धा झालं आहे. पूर्वी विमानाच्या काचा सुद्धा चौकोनी होत्या. परंतु बहुतांश विमान अपघात याच चौकोनी काचांमुळे होत आहेत हे निदर्शनास आल्यावर चौकोनी काचा बदलून गोल काचा बसवण्यात आल्या.
सन १९५० मध्ये हेवीलँड कॉमेट’ नावाच्या विमानाने त्याकाळचे सर्वात सुपर फास्ट विमान म्हणून या नावलौकिक मिळवला होता. प्रवाशी क्षमतेबाबही हे विमान इतर विमानांच्या तुलनेने सरस होते. विमान निर्मात्यांनी सर्व काही योग्य रीतीने केले होते पण त्यांच्याकडून एकच चूक झाली ती म्हणजे त्यांनी विमानाला चौकोनी काचा बसवल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की १९५३ मध्ये ‘हेवीलँड कॉमेट’ प्रकारची दोन विमाने आकाशातून थेट खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये जवळपास ५६ प्रवाश्यांना आपला प्राण गमवावा लागला होता.

अपघातानंतर करण्यात आलेल्या तपासाअंती असा निष्कर्ष निघाला की, विमानच्या खिडक्या चौकोनी असल्यामुळे खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हवेचा दाब निर्माण झाला. परिणामी हवेच्या अति दाबासमोर काचा तग धरू शकल्या नाहीत आणि त्या तुटल्या व विमान खाली कोसळले. त्या नंतर विमानाच्या काचा बदलण्यात आल्या. अपघात टाळण्यासाठी गोल काचांचा पर्याय पुढे आला. या गोल काचांना कोपरे नसल्याकारणाने काचेवर हवेचा दाब निर्माण होत नाही आणि काचा फुटायची शक्यता नसल्याने चौकोनी काचा जाऊन त्याठिकाणी विमानाला गोलाकार काच लावण्यात आली.