गण्या आणि सोनी

गण्या आणि सोनी

( एकदा गण्या आणि त्याची बायको जेवायला बसतात. गण्या जेवायच्या आधी हात धुवायला स्वयंपाक घरात जातो. तेवढयात त्याची बायको सोनी त्याला आवाज देते. )

सोनी : अहो, येतांना जरा मिठाची बरणी घेऊन येजा बरं..

( गण्या पुर्ण स्वयंपाक घरामध्ये मिठाची बरणी शोधतो पण त्याला ती सापडत नाही. )

सोनी : ( नवऱ्यावर ओरडते ) ओ ! या की अन बसा गप जेवायाले. मले ठाव व्हतं की तुम्हासनी मिठाची बरणी-गिरणी शोधून बी सापडणार न्हाय. म्हणून म्या मिठाची बरणी पहिलेच आणून ठेवलती.

खट्याळ नवरा

काय सांगु बाई
या नवऱ्याची महती
फिरतो नेहमी माझ्या
सदा अवती भोवती.

गाऱ्हाने दुऱ्हाने
माझ्याजवळ सांगी
आलं भांडण अंगावर
करी पांगा – पांगी

कधी पाहता त्याच्याकडे
विचारात राही गुंगला
आपण म्हणता काय झाले
म्हणे तुझ्यात जीव रंगला.

मोबाईल आणि टिव्ही
झाल्या माझ्या सवती
काम धंदा काही नाही
फिरतो अवती भोवती

त्याच्या खट्याळ स्वभावाला
फुटली आता नवती
काम धंदा काही नाही
फिरतो अवती – भोवती.

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)