महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वसलेले हे गाव ‘शेतफळ’. तसे ह्या गाव कुणाच्या परिचयाचे नाही परंतु या गावाची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, हे गाव म्हणजे ‘नागांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाते. हो, इथे प्रत्येक घरात नाग आढळून येतो. प्रत्येक घरात अगदी कुठलीही भीती न बाळगता घरातील एका सदस्याप्रमाणे हे नाग वावरत असतात. घरातील छताच्या लाकडांमध्ये त्यांच्यासाठी जागा असते. असे असले तरी आजपर्यंत कुठलीही हानी अथवा कुणालाही सर्पदंश झाल्याची घटना गावात घडली नाही.
गावातील लोक हे सात फणी असलेल्या नाग देवतेला आणि भगवान शंकर याना पुजतात. त्यांच्यावर गावातील लोकांची अपार श्रद्धा आहे. कदाचित त्यामुळे सुद्धा ही लोक एवढी नागाला जवळ करतात. म्हणूनच शेतफळ – नागांचे गाव म्हणून ओळखल्या जात आहे.