त्या दोन चिमुकल्यांच्या हत्येचं कोडं अखेर उकललं

पारध जवळ वालसावंगी गावात झालेल्या दोन चिमुकल्यांच्या हत्येचं कोडं अखेर उकललं आहे. या प्रकरणात पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेतल होत. त्यापैकी कल्पना पवार हिने आपल्या आई-वडिलांच्या मदतीने दोन्ही चिमुकल्यांची पैशासाठी हत्या केल्याचं कबूल केलं आहे.

या दोन चिमुकल्यांची हत्या करण्यासाठी आपले वडील हिरालाल पवार आणि आई रुक्मिणी पवार यांनीही मदत केल्याची कबुली कल्पनाने दिली आहे. कल्पना पवार, तिचे वडील हिरालाल पवार आणि आणि रुक्मिणी पवार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच तिघांनाही भोकरदन न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वालसावंगी येथे खंडणीसाठी चिमुकलीची हत्या

बुलढाना पासून जवळच असलेल्या वालसावंगी गावातील एका आठ महिन्याच्या मुलीची दीड लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या करण्यात आलीय तर एक मुलगी बेपत्ता आहे. जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथील पायल वाघमारे (वय 8) असे या चिमुकलीचं नाव आहे.
पायल ही लक्ष्मी नावाच्या मुलीसोबत घराजवळ खेळत होती. या दरम्यान तीच बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला असता ती शेजारच्या बाथरूम मध्ये मृत अवस्थेत आढळून आली. तर तिच्या सोबत खेळत असलेली लक्ष्मी अजूनही बेपत्ता आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पायल च्या आईला मोबाइल वर एका महिलेने फोन करून पैसे दिले नाही तर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी पारध पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खून, अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशीनंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.