ती तर अतृप्त आत्म्यांची अदृश्य दुनिया

प्रसंग २ सोन्याचा प्रेतलोकातील प्रवास

सदू बुआ सुरश्याला कथा सांगू लागले. काल जसा दगडू पिशाचच्या तावडीतून सुटला होता. तसेच आज सोन्या अदृश्य लोकातून परत येतो. त्याचा प्रेतलोकातील प्रवास खूप काही शिकवतो. हि कथा मला माझ्या आबांनी सांगितलेली आहे असे सदू बुआ सांगू लागले. सोन्या हा एकुलता एक मुलगा. त्याच्या आई-वडिलांनी त्याचा एवढा लाड केला की त्याला चांगले संस्कार द्यायचे ते विसरलेत. सोन्या जसा मोठा झाला तसा त्याने सर्व गावात उनाडक्या करून सर्वांना खोडकर वृत्तीने त्रास देणे सुरु केले. त्याच्या आई-वडिलांना कुणी सांगितले की तुम्ही याला एखाद्या आश्रमात नेऊन घाला आजवरच याला शिकायला पाठवलं असत तर हा असा बनला नसता.
त्याच्या घरचे त्याला किसना बुआकडे घेऊन जातात. व नम्र विनंती करतात की तुम्ही याला शिक्षण द्या. किसना बुआ त्याला ठेऊन घेतात. दिवसेंदिवस शांत आश्रमाचे वातावरण सोन्यामुळे बिघडते. गुरुजी त्याला दंडित करतात. हळू हळू त्याला तिथे राहण्याची सवय होते. पण त्याची वृत्ती हि खाण्यामध्ये, उनाडक्या करण्यामध्येच लागून असते. दिसायला धिप्पाड व उन्मत्त सोन्या त्याच्या कक्षात सर्वांपेक्षा मोठा दिसतो त्यामुळे त्याच्या कक्षातील सर्व मुल त्याला भितात. तो सांगेल तसे सर्वांना करणे भाग पडते, असेच एक दिवस उन्मत्त सोन्या सर्व मित्रांना घेऊन एक दिवस कुणालाच न सांगता जंगलात भ्रमण करायला जातो. जंगलात फिरत असताना नाल्या खोऱ्यात अंघोळ करणे, झाडांची फळे खाणे, गुल्लर ने पक्ष्यांना मारणे, झाडावरून पक्ष्यांची घरटी पाडणे, अशाप्रकारची मौज मजा करण्यातच सोन्याचा दिवस निघून जातो. ते सर्व एका टेकडीवर उभे असतात. व अचानक सोन्याच्या पाय सटकतो व सोन्या खाली दरीत कोसळतो सर्व मित्र आरडाओरड करतात तितक्यात सोन्या सर्वांच्या दृष्टीआड जातो. आणि दिसेनासा होतो.
इकडे सर्व मित्र आश्रमात पळत जातात आणि गुरुजींना जे घडले त्याचा सविस्तर वृतांत सांगतात. गुरुजी सर्वांवर रागवतात की कोणी सांगितले होते जंगलात जायला. माझी अनुमती घेतली होती का ? तेव्हा मुले बोलतात गुरुजी सोन्याने भीती दाखवली होती की त्याचे नाही ऐकले तर तो आम्हाला त्रास देईल. गुरुजी काही विशेष शिष्यांसोबत त्या जागेवर जातात आणि तपास करतात. पण सर्व प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नाही. सर्व आशा सोडून देतात. पण गुरुजी आशा सोडत नाहीत ते म्हणतात की मला काहीतरी वेगळ घडल असा संशय आहे. तो येईल. पण सध्या तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि तिथून निघून जातात. सोन्याच्या आई बाबाला निरोप देऊन सूचित केल्या जाते. ते येऊन आबांना भेटतात आबा त्यांना सांगतात की, सोन्याच्या वर्तणूकी मुळेच सोन्या आज संकटात सापडलाय.
तुम्ही त्याचा एवढा लाड केला की त्याला पुरता बिघडवून ठेवलाय. या आश्रमातील सर्वात खोडकर मुलगा आहे तो. मला नेहमी हीच भीती होती की असे काही विपरीत घडू नये. असो. सध्या तुम्ही ईश्वराचे स्मरण करायला बसा. किसना आबा महादेवाचे एकनिष्ठ भक्त असतात ते सोन्याच्या कुशल मंगलतेसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. तिकडे सोन्या एका सरोवरात पडतो व त्याला डोळ्यासमोर काही वेगळेच दिसायला लागते. तो एका भयानक साम्राज्यात जाऊन पोहचतो तिथे त्याला कुठेच उजेड दिसत नाही त्याला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याला तिथे एक धुरांनी बनलेला वायुक्त राक्षस कवट्याच्या आसनावर बसलेला दिसतो. त्याच्या बाजूला एक काळे कुत्रे बांधलेले असते. त्या प्रेतराजच्या चारही बाजूला त्याचे अधीन भूत, प्रेत, आत्मे गोलाकार फिरत असतात. तो त्याच्या सहाय्यक प्रेतांना बोलतो की त्या जीवात्म्याला घेऊन या. सोन्याला प्रेत… प्रेतराज समोर हजर करतात. तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूत, चुडेल, असे अनेक विचित्र दृष्ट आत्मे बघायला मिळतात. सर्व त्याला त्रास देतात. कुणी अपघातात, कुणी इच्छा अपूर्ण असताना मेलेले लोक आणि त्यांचे अतृप्त आत्मे भटकतांना दिसतात. सोन्या बोलतो मी तर टेकडीवर उभा होतो पण माझा पाय सटकला व मी खाली पडलो पण मी इथे कसा आलो. प्रेतराज बोलला तू आला नाहीस तुला आम्ही आणल इथे, तुझ्यावर तर आमची दृष्टी खूप वर्षा आधीच होती. जेव्हा तुला आश्रमात आणले तेव्हा तुझ्या गुरूंनी तुला रुद्राक्ष दिला होता तो तू गळ्यात धारण केला नाहीस. कलावा हातात बांधायला तुला आवडत नाही. तेव्हाच आम्हाला समजल होत की तूच आमच्या इच्छा पूर्ण करू शकतोस. तू ज्या सरोवरात अंघोळ केली ते आमच अदृश्य सरोवर आहे ते जीवात्म्यांना दिसत नाही. तू जे काही फळ तोडून खाल्ली ती सुद्धा आमची आहेत. ती फळे नसून मासाची गोळे होती. तू सर्व नियम भंग करून भूतलावर जीवन व्यतीत करतो म्हणून तू आमच्या तडाख्यात सापडलास तू सध्या प्रेतलोकामध्ये आहेस.
आम्हाला जशी प्रवृत्ती पाहिजेत तू त्या प्रवृत्तीचा आहेस तुझी मानसिकता आमच्या सारखीच आहे. तुला सुद्धा दुसऱ्यांवर हुकुम गाजवायला आवडतो. दुसऱ्यांना विनाकारण त्रास द्यायला आवडतो. तू नित्य कुकर्म करतो. तुझ्या मित्रांना त्रास देतो. गुरूंचे ऐकत नाहीस. नेहमी असत्य बोलतोस. धर्म नियमानुसार तिथी, पवित्रता पाळत नाहीस. उद्धट सारखा बोलतोस. कुणाचाही अपमान करणे म्हणजे तुला विशेष वाटत नाही हि तुझी रुची आहे. नेहमी कामवासनेत तुझे मन अटकलेले असते. तुला मास-मदिरा सेवन करायला आवडते. या सर्व गोष्टी आमच्या सर्व प्रेतलोकांतील आहेत. हीच तर आमची प्रवृत्ती आहे. म्हणून आम्ही तुला आता पकडले आता तुला आम्ही सोडणार नाही. आता आम्ही तुझा आत्मा इकडे बंदिस्त करणार आणि तुझ्या शरीराच्या माध्यमातून आमच्या सर्व अतृप्त इच्छा पूर्ण करणार आणि सर्व त्याला पछाडतात. त्याला अतिशय वेदना होतात. त्याला त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन दाखवतात. त्याला उचलून पटकतात, त्यावर काळ्या मांजरी सोडतात, त्याच्यावर वाटवाघुळ हल्ला करतात. त्याला असह्य वेदना होतात. त्याला एका शिळेला बांधून ठेवण्यात येते.
तिथे त्याला एक चांगला प्रेतात्मा भेटतो…. तो बोलतो पोरा इतक्या दिवस आश्रमात राहलास तुला मंत्र येत असतीलच त्यांचा उच्चार कर म्हणजे तू इथून सुटू शकतोस. मी दुसऱ्या लोकातील आहे मरणाच्यावेळी माझ्यात चांगले भाव होते म्हणून मी चांगला भूत बनलो. तू एक काम कर सध्या कृष्णपक्ष सुरु आहे सध्या या प्रेतांची शक्ती वाढलेली असते. अजून काही दिवस यांचा त्रास सहन कर. दोन दिवसांनी अमावस्या आहे त्या दिवशीच हे प्रेत तुझा देह धारण करतील. त्या दिवशी तर यांची शक्ती फारच वाढलेली असते. त्या दिवशी तुला हे जास्त त्रास देतील तुला जर गुरूची शिक्षा लक्षात असेल तर तस कर म्हणजे तुला वेदना कमी होतील. अमावस्ये नंतर शुक्ल पक्ष सुरु होतो त्यादिवशी जर तू इथे मंत्र उच्चारण करत बसला तर तू तुझ्या शरीरात जाऊन तुझ्या आप्तांजवळ जावू शकतोस आणि तो चांगला भूत निघून गेला.
पण सोन्याला काहीच आठवत नाही कारण त्याने कधीच त्यात रस घेतलेला नसतो त्याला फक्त उनाडक्या करणे आवडायचे. तो मनाशीच पुटपुटला मी तर कधीच काही शिकून घेतले नाही गुरुजी सांगायचे तेव्हा मी दुसऱ्यांच्या खोड्या करायचो आता मी कुठून मंत्र उच्चारू ? मला तर एक पण मंत्र येत नाही.  मी कधी कुठल्या देवाची पूजा केली नाही. आणि विचार करू लागला आठवू लागला त्याला गुरुजींनी काय काय शिकवलेलं आहे. आपण जीवनात कधीच गंभीर नव्हतो म्हणून आपल्याला काही येत नाही. आणि सोन्याला त्रास द्यायला प्रेत तिथे आली व त्यांनी सोन्यावर चमकणारी कुत्री छुवाडली…सोन्या कावरा-बावरा होऊन पळू लागला… काळ्या मांजरी त्याच्या गळ्याला चावा घेत होत्या…आणि तीतक्यात सोन्याला समोर एक प्रचंड काळ्या धुरांनी व्यापलेला, धग धगत्या आगीसारखा लालबुंद डोळे असलेला एक पिशाच्च समोरून येतांना दिसला आता तो सोन्यावर तुटून पडणारच तर… मध्ये कुणीतरी आडव आल आणि त्याने सोन्याला बाजूला सारल कोण असावे ते आपल्याला वाचवायला आल असेल असे सोन्या विचार करू लागला. पण सोन्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती कि ते रक्षण करायला आले कि त्याला नष्ट करायला… महाभयंकर दानव सोन्याच्या प्रतीक्षेत होता.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही. यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

ती तर अतृप्त आत्म्यांची अदृश्य दुनिया

प्रसंग १
पिशाच्च आणि दगडू

आनंदराव अगदी शांत स्वभावाचे आणि धार्मिक वृत्तीचे व नावाप्रमाणे नेहमी आनंदी राहणारे गृहस्थ. त्यांना सर्व आदराने दादा बोलायचे. दादांना सर्व मानायचे. त्यांचा एक वेगळाच दबदबा होता. त्यांचा खूप अभ्यास झालेला. त्यांच्या आधारस्तंभ त्यांच्या पत्नी सुमनबाई, ह्या त्यांचा भरभक्कम आधार.
त्यांना तीन मुले, सुना, दोन मुली सर्वांचे विवाह करून यांनी सर्व कर्तव्य पार पडलेली. तीन नातवंड मुलांची व दोन मुलींची. हे सर्व शेतात गावाबाहेर राहायचे एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे घरातील संख्या जास्त सर्व मिळून मिसळून राहायचे अगदी सुखी आणि समाधानी कुटुंब. त्याकुटुंबात त्यांचा नातू सुरश्या, गण्या, राजा त्यातील सूरशा हा अगदी लाडाचा, सूरशाच्या जन्मावेळी सांगण्यात आले होते की हा मोठा झाल्यावर मोठ्या संकटात सापडू शकतो याच्याकडे विशेष लक्ष द्या. तसा हा भविष्यात खूप मोठा व्यक्ती बनेल. तेव्हा पासून सूरशा कडे दादांचे जास्तच लक्ष लागलेले होते. दादा घरातील सर्वांना रोज सकाळ संध्याकाळ शेतातील मंदिराच्या मंडपात घेऊन बसायचे त्यांना विविध श्लोक शिकवायचे धार्मिक माहिती द्यायचे. रोज त्यांचे समवयस्क मित्र मंडळीना घेऊन भजन करायचे. सर्व विविध प्रश्न त्यांना विचारायची आणि दादा त्यांच्या प्रश्नाचे समाधान करायचे.
असच रोजच्या दिनचर्येनुसार दादा संध्याकाळी सर्वांना घेऊन बसले होते. तेवढ्यात दादांचे मित्र सदु बुआ बोलले दादा मला एक प्रश्न विचारायचा होता दादा बोलले विचारा.
सदु बुआ बोलू लागलेत की दादा काल रात्री पोरगा रोजच्या पेक्षा जरा उशिराच घरी आला आणि घरी आल्यापासून सारखा – सारखा रडत आहे म्हणे की शेतावरून येत असताना मला चिंचेच्या वनात काही वेगळ दिसलं. आणि मी त्याच्याकडे बघितलं तर ते माझ्या मागे लागल मी कसा बसा जीव मुठीत ठेऊन पळतच घरी आलो. आणि रडायचा, मला नेमक समजल नाही की त्याला तिथ काय दिसलं असाव ?
दादा बोलू लागले.. सदु बुआ वेळ काळ काही बघायचा असतो की नाही की फकत कामाचच बघता तुम्ही. कालचा दिवस पण चांगला नव्हता काल अमावस्या होती आणि त्याला तिथे चींचीच्या वनात काहीतरी दिसन हे साहजिक आहे. उपरी हवा तर वाहतच असते. ती जागा तशी आवेशीत आहे. तसे सर्व विचारु लागले की दादा हे काहीतरी म्हणजे काय ? तुम्ही आता काय बोलले ते समजल नाही. दादा बोलले की आता तुम्हाला माहिती देणे आवश्यक आहे. जेणे करून तुम्ही कोणी अशी चूक करणार नाही व काळाचा ग्रास बनणार नाही. तसे दादा बोलले की मी तुम्हाला काही अनुभव सांगतो जे काही माझ्या आयुष्यात आलेत, काही मित्रांकडून ऐकले. काही इकडून तिकडून ऐकलेत.
दादा बोलू लागले की सदू बुआ तुम्हाला तर आठवायलाच हवे की आपण सुद्धा असा प्रसंग अनुभवलेला आहे. सदू बुआ बोलले नाही. दादा थोडी स्पष्ट आठवण करून द्या. आशीच्या उपचारासाठी दत्तू बुआ ने आपल्याला जंगलात पाठवलं होत…. सदू बुआ बोलले आठवल दादा लय भयंकर प्रसंग होता तो… आजही रडायला येते. दादा बोलले की तसाच प्रसंग तुमच्या मुलाने अनुभवला असावा काल… दादा बोलले आमच्या जीवनातला हा किस्सा आहे मी साधारण १८-१९ चा असेल व सदू बुआ १६-१७ चे आणि दगडू भाऊ ३५ वर्षाचे असतील. आम्ही जंगलातून काही औषधी घेऊन येत होतो. वेळ हि रात्री अकरा ची असेल. दत्तू बुआ ने आम्हाला आधीच सांगितल होत की काहीही होवो पण एकदा तो झाड पाला घेतला की घरी ये पर्यंत मागे वळून पहायचं नाही आणि त्या चींचीच्या वनात एक तळं आहे त्या तळ्याजवळ अजिबात जायचे नाही. पण आम्ही येत असतांना आम्हाला तहान लागली व आम्ही त्या तळ्यावर गेलो तिथे आम्हाला एक माणूस भेटला. पूर्ण काळे कपडे दाढी वाढलेली त्याचे तोंड दात आज हि आठवले तरी जीवाचा थरकाप उडतो. त्या माणसाने आम्हाला हटकले तसे आम्ही पळतच सुटलो. आम्ही जेवढ पळायचो पुन्हा त्या तळ्यापाशीच यायचो. आम्ही पूर्ण घाबरलो होतो. तसा तो माणूस बोलू लागला हे तळं आवेशीत हाये…. मी बलवान आत्मा हाये… मी प्रेतयोनी मधला हाये अन तुम्ही मनुष्य योनीतले…मी बलवान आहे आणि तुम्ही बलहीन आणि हसायला लागला. तुम्ही या ठिकाणी येऊन मोठी चूक केली आता तुम्हाले माया पासून कोणीच नाही वाचवू शकत आणि हसायला लागला. मी आणि सदू बुआ दत्तू बुआ चे शिष्य होतो. दत्तू बुआ म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील. आम्ही लहानपणापासून त्यांनाच गुरु मानलेल. आम्ही रोज त्यांच्याकडून शिक्षण घ्यायचो. पण दगडू भाऊ हे सर्वत्र श्रद्धा ठेवणारे… त्यांचे मन कधी एकाजागी लागलंच नाही. तो माणूस बोलू लागला कृष्णपक्ष सुरु हाये. आता तुमच वाचनं कठीण हाये. आणि अचानक तिथून गायब झाला. आम्हाला वाटल भास झाला असावा आम्ही तिथेच थोडं उभ होतो पण तो माणूस परत समोर आलाच नाही आम्ही तिघं तिथून सरळ शेताकडे निघालो आणि शेतात पोहचलो. दत्तू बुआ ला सर्व वृतांत सांगितला आणि ती औषधी त्यांना दिली. दत्तू बुआ बोलले पोर हो नशीब चांगल तुमच म्हणून तुम्ही घरी पोहचलात जा जेवण करा व झोप तुम्ही. आणि दत्तू बुआ माझ्या वडिलांशी बोलू लागले की पावणेबुआ तुम्हाला वाटत नाही का की हे पोर जे सांगतात त्यानुसार काही भलतच घडून राहाल म्हणून, एक प्रेतयोनीतला भूत इतक्या सहजा सहजी हार मानून गायब होऊन जाईल आणि या पोरांना मार्ग मोकळा करून देईल घरी जायचा. वडील बोलले मामा मला तर यात काही वेगळाच संशय येतोय. पण हे दोघे तर ठीक दिसून राह्लेत. दत्तू बुआ बोलले की हेच तर पहेली आहे की अस का घडल असाव ?
आणि सर्व रात्री झोपले…सकाळ झाली तसे दगडू चे बाबा आमच्या घरी ओरडतच आले… दत्तू बुआ हे पोर काल जंगलातून घरी आले पण दगड्या काही अलगच करून राहला… बुआ बोलले मला वाटलच होत की इतक्या सहजा सहजी हे पोर त्या प्रसंगातून बाहेर पडलेच कसे.. ?
दगड्याचे बाबा बोलू लागले की मामा आता तुम्हीच पहा काय करता येईल तर आणि दत्तू बुआ, माझे वडील, सदू आणि मी व इतर सर्व दगडू भाऊच्या भेटीला गेलो. दगडू भाऊला बघून सर्वांचे होश उडाले. दगडू भाऊने अंगावरचे सर्व कपडे काढून फेकलेले. एका अंधाऱ्या खोलीत भिंतीच्या आडोशाला ते बसून होते आणि फारच कटू शब्दात काहीतरी पुटपुटत होते. जसे दत्तू आबा त्यांच्या जवळ गेले तसे ते आक्रमक झाले त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्या अंगाचा दुर्गंध येत होता. ते सारखे सारखे मांस खायला मागत होते. आणि एकाएकी रडायला लागायचे तसे आजोबांनी हे सर्व बघितले आणि बोलले की बुआ तुम्ही सर्वात प्रथम घरातील तामसिक वातावरण बंद करा. तुम्ही मांस, मदिरा यांना दिलेले घरातील स्थान आज तुम्हाला हे दिवस दाखवत आहे. हा दगडू घरून काय करून गेला होता ते जाणून घेणे आधी महत्वाचे. दगडू च्या बाबाने दगडू च्या आईला इशारा केला तश्या त्या घरात गेल्या व त्यांनी सुनेला विचारले व बाहेर येऊन होकारार्थी मान हलवली तसे माझे आजोबा बोलले बुआ संस्कार महत्वाचे असतात, तेच तुम्ही देऊ नाही शकलात. कधी पण काहीही करायचं दिवस असो की रात्र काहीच पाहन नाही. दिवस-वार, वेळ याचं काहीच महत्व नसल की असे काहीना काही घडतेच. याने संग केला आणि आंघोळ न करताच जंगलात गेला त्यात मदिरा आणि मांस भक्षण हे तर आदतच झालेली आहे. मग अस भूत मानगुटीवर नाही बसणार तर काय ? बुआ याला पिशाच्च बाधा झाली आहे. ती दूर करणे महत्वाचे. आणि आजोबांनी सर्वांना सांगितले की घरी चाला. आणि लहान मुलांना याच्यापासून दूरच ठेवा.
आजोबा व आम्ही सर्व घरी आलो तसे आजोबा सांगू लागलेत की मनुष्य मेल्यानंतर हे जग संपत नाही किंवा तो कुठल्याही बंधनातून मुक्त होत नसतो. मरणाच्या वेळेला त्या मनुष्याची जी इच्छा, कामना, त्याचे कर्म, दिवस-वार, यावर त्यांची मेल्यानंतर उत्पत्ती होत असते. जे या सृष्टीत उत्पन्न झालेले आहे ते नष्ट सुद्धा होणारच. उत्पत्ती आणि नाश हे तर संसार चक्रच आहे. या चक्राचे बंधन प्रत्येकालाच आहे. आणि प्रकृतीचे नियम आहेत. काही मर्यादा आहेत, ते सर्वांनाच लागू होतात. पण त्या नियमांचे त्या मर्यादेचे उल्लंघन झाले की अशी समस्या उद्भवते. अतिरिक्त अहंकार हा नेहमी पतनाचाच मार्ग प्रस्तापित करत असतो. स्वताच्या मनाला वाटेल तसे वागणे कधी कुणाचे ऐकणे नाही. अशे जे भिन्न प्रवृत्तीचे असतात त्यांसोबतच असे घडते. तसाच हा पिशाच्च सुद्धा उत्पन्न झालेला आहे. व त्याने सुद्धा त्याला पसंद पडेल. त्याच्या अतृप्त इच्छा पूर्ण करून देणारा देह निवडला. आणि आजोबांनी दगडू ची कुंडली मागवली व पाहू लागले व त्यात सुद्धा ते बोलले की हि पिशाच्च बाधाच आहे. आणि दगडू च्या बाबांना सांगू लागलेत की बुआ आता बस्स झाल. आता सुधारायची वेळ आली आहे. बंद करा आता जे तुम्ही वर्षानुवर्ष चालवले. तेवढ्यात दगडू ची आई धावत आली व बोलली की बुआ तो दगड्या कसा कसा करतोय त्याने दोन बकऱ्या खाल्ल्या…. तसे आजोबांनी सांगितले की त्याला साखळ दंडाने बांधून ठेवा. आणि त्यावर त्वरित उपाय करा, अन्यथा समस्या हाताबाहेर जायची. आणि सर्वांना जवळ बोलवून आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितले की दगड्याचे बाबा कोणी दुसरे नाहीत आणि तुमचच घरातल घर त्यामुळे त्याला तुमच्या घरात या पवित्र स्थानी जागा द्या त्या सर्वांना या पवित्रतेत राहू द्या. दगडू चे बाबा व त्यांचा सर्व परिवार राहत घर सोडून आमच्याकडे राहायला आलेत. मग त्या सर्वांना सांगितले की तुम्ही श्रीदत्तात्रय स्वामींच्या दर्शनाला याला घेऊन जा व तिथे प्रण घ्या की आजनंतर कधीच मासाहार, मदिरापान, व तामसिक वृत्तीने वागणार नाही म्हणून आणि पवित्रते कडे पहिले पाऊल उचला. त्यांची महिमा अगाध आहे. ते पवित्र मनाने केलेल्या भक्तांच्या आवाजाला नक्कीच धावून येतात. तीच शक्ती तुम्हाला या दुखःतून सावरू शकते. आबा व आम्ही सर्व श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाला गेलो तिथे दगडूला सोडून देण्यात आले. त्याच्या आईने २१ दिवसांचा उपवास व सतत स्मरण करण्याचा निर्णय घेतला. दगडूची पत्नी सुद्धा त्याच्या मंगलस्वास्थासाठी प्रार्थना करू लागली. आजोबांनी श्रीदत्तात्रेयांचे स्मरण केले व ध्यानाला बसले. त्यांनी दगडूचे डोके जसे श्रीचरणावर नेवू केले तसे दगडू किंचाळायला लागला. जोर-जोरात ओरडू लागला, झाडांवर सरसर चढू लागला. आणि अचानक एका कुंडात उडी मारून तळाशी गेला. इकडे आजोबा देह रक्षा मंत्राचा जप करू लागलेत. आणि त्यांनी एका घुबडाला बोलावले तसे एक घुबड उडत तिथे आले व ते विनम्रतेने तिथे बसले आजोबा काहीतरी बोलले तसे त्याने त्याचे एक पंख दिले व ते उडून गेले. आजोबांनी ते पंख घेतले विविध मंत्र म्हणून त्याला अभिमंत्रित केले, नंतर थोडा अंगारा घेतला एका कापडात हे सर्व बांधले व त्याचा ताईत बनवून दगडूच्या गळ्यात घालणार तसा दगडू किंचाळायचा, उड्या मारायचा, गर गर गोल गोल फिरायचा, आजोबांवर चालून जायचा, त्याने दोन वेळा आजोबाना ढकलून दिले, तसे आजोबांनी व सर्वांनी मिळून त्याच्या गळ्यात ताईत घातला तसा दगडू ओरडला व खाली कोसळला. तसा पिशाच्च बाहेर आला व आजोबांशी बोलू लागला माया इच्छा जद्लोक पुऱ्या होत नाहीत मी शांत बसणार नाही मी याले परत धरीन. आजोबांनी त्याला भस्म फेकून मारले तसा पिशाच्च दूर जाऊन पडला. आजोबांनी दगडूला उठवले देवाच्या चरणात घातले आणि दगडूला बोलू लागले की पोरा बघ याच शक्तीने तुझे
प्राण वाचवले आज यांच्यासमोर तुला काहीतरी चांगला प्रण घ्यायलाच पाहिजेत. तसे दगडू बोलला आबा मी चुकलो मला क्षमा करा. खरच मी मनुष्य असून पशु प्रमाणे वागलो मी सर्व प्रकृतीचे नियम सोडून स्वताच्या मनाप्रमाणे वागलो. मला ईश्वराचा विसर पडला होता. देवासमोर हात जोडले की झाल. वर्षातून एक दोन वेळा उपवास व्रत केले की झाल असे मला वाटायचे, किंवा म्हातारपणी काय काम राहते म्हातारे झालो की करूया देव-देव असे म्हणून मी जगायचो पण आज मी दोन प्रकारची दुनिया बघितली जी सर्वांना दिसते ती मनुष्यांची आपली दृश्य व जी कुणालाच दिसत नाही ती अदृश्यांची अतृप्त आत्म्यांची दुनिया. त्यात खूप मोठ्या प्रजाती होत्या खूप मोठे वेगवेगळे भूत होते. ते लोकांना का पछाडतात ? त्यांच्या इच्छा काय असतात ते सर्व मी बघितले. मी आज पासून फकत याच शक्तीला शरण जाणार. व सात्विकतेच्या मार्गावर जीवन व्यतीत करणार. असे दगडू चे जीवन सावरले व दगडू ईश्वर शक्ती पुढे विनम्रतेने झुकला आणि त्याचे सर्व दुखः सर्व त्रास दूर झाला. तसे मी व सदू ने आजोबांकडून खूप काही शिकून घेतले व त्यांनाच गुरु मानून त्यांनाच सर्वस्व अर्पण केले. आणि आज त्यांच्याच कृपेमुळे मी तुमचे मार्गदर्शन करतोय. तेवढ्यात सुरश्या बोलला दादा बस… झाली पण का कथा ? दादा अजून सांगा न. सदू बुआ बोलले पोरा उद्या आणखी नवीन कथा सांगेन मी तुझ्या दादांनी व मी खूप मोठ्या कथा अनुभावल्या आणि आमचे गुरुजी आम्हाला खूप काही शिकवून गेलेत. सदू बुआ बोलले पूर्ण समजल दादा मला की माझ्या मुलाला काय झाल असेल तर. मी त्याला सुद्धा चांगल्या सत्मार्गाने चालायची प्रेरणा देईल. व दादा बोलू लागले की अशा प्रकारे ईश्वरीय शक्ती मुळे दगडू वाचला होता. त्यामुळे सर्वांनी प्रकृतीचे नियम व मनुष्य जन्माच्या मर्यादा पाळायला पाहिजेत. थोरा-मोठ्यांचे ऐकले पाहिजेत. देव-धर्म करायला, पौराणिक कथा वाचायला आणि तीर्थयात्रा करायला म्हातारच व्हायला पाहिजेत असे काही नाही. मनुष्य जन्म असो की कोणाचाही जन्म हा पाण्याचा बुडबुडा आहे. जीवनाचा अंत केव्हाही होऊ शकतो म्हणून वर्तमानात जगा. आजचा विचार करा व आजच कर्म करा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. अशाप्रकारे एका पिशाच्च्याने ईश्वर शक्ती समोर हार मानली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही. यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.