आपला प्रोफाइल फोटो करा सुरक्षित फेसबुकच्या या टूल मुळे

सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने भारतात एक नवीन टूल उपलब्ध करून दिला आहे. तो म्हणजे प्रोफाइल पिक्चर हा डाउनलोड व शेयर करण्यापासून सुरक्षित करू शकतो. या टूल मुळे फोटोचा दुरुपयोग करता येणार नाही.

फेसबुक वर प्रोफाइल पिक्चरच्या मदतीने एकमेकांना शोधणे सोपे जाते व त्यामुळे एकमेकांसोबत कनेक्ट होता येते. परंतु बऱ्याच व्यक्तींना स्वतःचा प्रोफाइल पिक्चर ठेवण्यास भिती वाटते.
विशेषतः स्त्रिया ह्या प्रोफाइल पिक्चर शेयर करण्यास फार घाबरतात, त्यांना या मध्ये असुरक्षितता जाणवते. या मागचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांना असे वाटते की त्यांचा स्वतःचा फोटो टाकल्यास त्या फोटोचा इतर कोणी दुरुपयोग तर करणार नाही ना !
या सर्व बाबीची आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका व फेसबुक ने दिलेला नवीन टूलचा वापर करून आपला प्रोफाइल पिक्चर हा डाउनलोड व शेयर करण्यापासून प्रोटेक्ट करा. कसे करावे प्रोफाइल पिक्चर प्रोटेक्ट ते आता आपण पाहूया.

१) सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर वरून फेसबुक हा ऍप इन्स्टॉल करून घ्या. / आपल्या मोबाईलला फेसबुक ऍप असेल तर एकदा त्याला अपडेट करून घ्या.
२) आता फेसबुक ऍप मध्ये आपली प्रोफाइल उघडा.
३) प्रोफाइल पिक्चर वर क्लिक करा.
४) आता आपल्या समोर एक पॉप अप येईल. त्यामध्ये पुढील पर्याय येतील.
(Add Frame, Take a New Profile Video, Select Profile Video, Select Profile Picture, View Profile Picture, Turn on the Profile Guard)
६) यातील Turn on the Profile Guard हा शेवटचा पर्याय निवडा.
७) आता Save हा पर्यायावर क्लिक करा.
८) आपले फेसबुक रिफ्रेश करा.
९) आपला प्रोफाइल पिक्चर पाहून घ्या.
१०) आपणास दिसुन येईल की यामुळे तुमच्या प्रोफाइल पिक्चरला एक Protect Guard आलेले आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल वर फेसबुक ऍप द्वारे आपला प्रोफाइल पिक्चर सुरक्षित ठेवू शकता.

असे असले तरीही तुमचा प्रोफाइल फोटो इतर प्रकारे चोरी किंवा शेअर केल्या जाऊ शकतो त्यामुळे हे टूल सद्यस्थितीत जोमात असले तरीही हे कितपत यशस्वी होते हे कळेलच !