संकष्ट चतुर्थी

प्रथम पूजनीय गौरी पुत्र श्रीगणेश

पौराणिक कथा आहे. देवी-देवतांमध्ये प्रथम पूजनाचा मान कोणाला मिळावा या विषयावर वाद निर्माण झाला. तेव्हा सर्व देवी-देवतांनी ठरवले की जो कोणी संपूर्ण ब्रम्हांडाला सर्व प्रथम प्रदक्षिणा मारून परत येईल त्यालाच प्रथम पूजनाचा मान प्राप्त होईल.

तेव्हा सगळे देवी-देवतांनी आपल्या वाहनांवर बसून या प्रतियोगितेला सुरुवात केली. त्यामध्ये प्रत्येकाचे विविध वाहने होती. विविध प्राण्यांवर बसून देवी-देवता होते. परंतु गणेशजी विचार करू लागले की आपले वाहन तर उंदीर आहे, त्याची गती तर फारच कमी आहे. गणेशजींनी आपल्या बुद्धीचा वापर केला व पुन्हा विचार केला की आपला संसार-ब्रम्हांड हे सर्व आपले आई वडीलच. त्यांनी आपले आई वडील भगवान शिव शंकर व माता पार्वतींना प्रदक्षिणा घातली व आपल्या आई व वडील भगवान शिव शंकर व माता पार्वती यांच्या सोमोर येऊन बसले.

जेव्हा सर्व देवी-देवता तेथे आले तेव्हा श्री गणेशजींना त्यांनी तिथेच पहिले व त्यांना प्रश्न केला की तुम्ही इथेच का ? तेव्हा गणेशजी बोलले की माझे आई वडील भगवान शिव शंकर व माता पार्वती हेच माझे संसार-ब्रम्हांड आहे त्यांच्यामुळेच मी आहे. श्री गणेजींचे विचार ऐकून सर्वच विचार मग्न झाले. सर्व देवी-देवतानां श्री गणेशजींची आई व वडिलांवरील आस्था, भक्ती पाहून प्रसन्नता वाटली व सर्वांनी गणेशजींना शुभाशीर्वाद दिले. तेव्हापासूनच असे ठरले की कुठलीही पूजा असो प्रथम पूजन हे श्री गणेशजींचे केले जाईल. याच कारणामुळे कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणेश पूजनानंतरच केली जाते. त्यांना प्रथम मान प्राप्त आहे.
कथा तुषार चिंतळे यांच्या शब्दात.