विजया एकादशीची कथा वाचल्याने ऐकल्याने मिळते वाजपेय यज्ञाचे फळ.
हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे. त्यातील एक म्हणजे विजया एकादशी होय. विजया एकादशी तिच्या नावावरूनच ओळखल्या जाते. हि व्यक्तीला विजय देते. जेव्हा चारही बाजूंनी मनुष्य संकटामध्ये अडकतो त्याला स्वतःचा पराभव दिसू लागतो. अशा परिस्थिती मध्ये विजय मिळवायचा असल्यास विजया एकादशी चे व्रत हे सर्वोत्कृष्ट उपाय मानल्या जातो. हि एकादशी माघ/फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला अकराव्या तिथीला येते.
व्रत कथा
कुंतीनंदन जया एकादशीचे महात्म ऐकून आनंदित होते. धन्य होत होते. जया एकादशीचे महात्म ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशी चे काय महात्म आहे? कुंती नंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे व्रत करणारा व्यक्ती नेहमीच विजय प्राप्त करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन आपण माझे परम मित्र आहेत. आणि आपण खूपच चांगला प्रश्न केला आहे. या कथेला ऐकल्यावर आपणास आनंद मिळेल, तसेच हि कथा ऐकणे व वाचल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. आता पर्यंत हि कथा मी कुणालाच सांगितली नाही. यापूर्वी हि कथा नारदजींनी ब्रह्माजी कडून ऐकली होती.
त्रेतायुगात भगवान श्रीहरी नारायणजीचे अवतार म्हणून प्रभू रामचंद्रांनी या सुंदर पृथ्वीवर जन्म घेतला होता. जेव्हा मर्यादा पुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या पत्नीला सीतेला शोधत समुद्रा जवळ पोहचले. तिथेच समुद्र किनारी त्यांचा परम भक्त जटायू नावाचा पक्षी राहायचा. त्या जटायूने सांगितले कि सीता मातेला राक्षसराज लंकेश रावण समुद्राच्या पलीकडे लंकेत घेऊन गेलाय. त्याने मातेला अशोक वाटिकेत ठेवले आहे. जटायू कडून माहिती मिळाल्यावर प्रभू श्रीरामचंद्र वानर सेने सोबत आक्रमणाची तयारी करू लागले. पण एवढ्या मोठ्या समुद्राला कसे पार करावे हा भीषण प्रश्न त्यांच्या समोर होता.
तेव्हा त्यांनी त्यांचे प्रिय बंधू लक्ष्मणजींना प्रश्न केला कि मला सांग तुझ्याकडे काही उपाय आहे का ? लक्ष्मण जी बोलले कि महान ऋषी वकदाल्भ्य मुनि हे इथून काही अंतरावरच राहतात त्यांचा आश्रम आहे त्यांना आपण भेटूया तेच आपणास पुढील मार्गदर्शन करतील. तेव्हा भगवान श्रीराम व लक्ष्मण महान ऋषी वकदाल्भ्य मुनि यांच्या आश्रमात पोहचले. त्यांना प्रणाम केला. व विनम्रतेने त्यांच्या पुढे हा भीषण प्रश्न प्रस्तुत केला.
वकदाल्भ्य मुनि म्हणाले हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मी आपणास विजय प्राप्त करून देणाऱ्या व्रता बद्दल माहिती देतोय. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशी चे व्रत तुम्ही करा हे केल्यास निश्चितच तुम्ही समुद्र पार करून रावणाला पराजित करणार यात संशय नाही.
विजया एकादशी व्रत कसे करावे याबद्दल ऐकून घ्या. या एकादशीला अशी मान्यता आहे कि स्वर्ण दान, भूमि दान, अन्नदान आणि गौदान करून पुण्यफळाची प्राप्ती करू शकता. या दिवशी श्रीहरी नारायणजीची पूजा केल्या जाते. व्रत पूजेत धूप,दीप,नैवेद्य, नारळाचा प्रयोग केल्या जातो. सप्त धान्य घट स्थापना केल्या जाते. सप्त धान्य- गहू, उडीद, मुंग, चना, जौ, तांदूळ, आणि मसूर आहे. यावर श्रीविष्णुजींची मूर्ती ठेवल्या जाते. या व्रताला करणारा व्यक्ती पूर्ण दिवस व्रत करून रात्री विष्णु पाठ करत जागरण करतो. हे व्रत २४ तासांसाठी केल्या जाते. या व्रताची पूर्णता द्वादशीला सकाळी दान धर्म करून, अन्नदान करून केलॆल्या जाते.
प्रभू श्रीरामचंद्र यांनी लक्ष्मण व संपूर्ण वानर सेने सह महर्षीजींनी सांगितलेल्या तिथीनुसार एकादशी व्रत संपन्न केले. प्रभू श्रीरामचंद्र संपूर्ण वानर सेनेसमेत समुद्र पार करून लंकेत पोहचले व रावणाचा अंत केला.
अशाप्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या परम मित्राला सांगितले कि या एकादशीला जो व्रत उपवास करतो त्याचे विघ्न दूर होतात. तसेच त्याचे पाप नष्ट होते. आणि त्यावर कितीही मोठे संकट असो तो त्यावर मात करून विजय प्राप्त करतो. अशाप्रकारे विजया एकादशीचा महिमा सांगितला.