‘व्हाटस ऍप’ चे हे दोन नवीन फीचर्स तुम्हाला माहिती आहे का ?

सोशल मेसेजिंग ऍप ‘व्हाटस ऍप’ ने दोन नवीन फीचर्स आणले आहेत. खूप मोठा असा बदल ऍप मध्ये या फीचर्स ने होणार नसला तरी हे फीचर्स यूजर्स ला आवडीतील असे आणि तुमचं सोशल लाईफ अधिक सोपं आणि जलद बनवणारे आहेत. ‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्समुळे तुम्ही टेक्स्ट ची स्टाईल बदलू शकता आणि तुम्हाला ईमोजी शोधण्यास सुद्धा मदत होते. ‘व्हाटस ऍप’ च्या अपडेट मध्ये तुम्हाला हे बदल दिसून येतील.

‘व्हाटस ऍप’ चे नवीन फीचर्स कसे असतील ?
‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्स मुळे तुम्ही मेसेज टाईप करत असाल तर तुम्हाला आधीच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. आधी कुठलाही शब्द किंवा ओळ बोल्ड, अंडरलाईन वा इटालिक करायची असेल तर मेसेज च्या आधी आणि नंतर “/” “*” वापरून स्टाईल बदलावी लागत असे. अनेकांना हा प्रकार कठीण तर लक्षात सुद्धा राहत नसे. परंतु ‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्समुळे हा त्रास बदलणार आहे. आता यूजर्स ला कुठलाही शब्द अथवा ओळ बोल्ड, इटालिक किंवा अंडरलाईन करायची असेल तर त्या शब्दावर क्लिक करून ठेवावं लागेल. त्यानंतर एक छोटा पॉपअप मेसेज दिसेल ज्यामध्ये “cut copy paste ” ऑप्शन दिसतील त्या बाजूला तीन उभे बिंदू दिसतील त्याला क्लिक करायचं. म्हणजे पुन्हा एक छोटा पॉप अप येईल त्यामध्ये “Translate, Bold, Italic आणि Monospace ” असे ऑप्शन दिसून येतील त्यावर क्लिक म्हणजे आपल्याला हवं ते वाक्य बोल्ड, इटालिक अथवा ट्रान्सलेट करता येऊ शकते. तिथे असलेल्या अनेक फीचर्स चा उपयोग तुम्ही करून बघू शकता.

याशिवाय दुसरं फीचर्स म्हणजे ईमोजी शोधणे. या फीचर्समुळे तुम्हाला समजा एखादे ईमोजी पाठवायचे असेल तर फक्त त्या ईमोजी चे नाव टाईप करायचे किंवा बोलायचे म्हणजे ‘व्हाटस ऍप’ त्या नावाच्या संबंधित असलेले ईमोजी तुम्हाला दाखवतो. त्यामधून निवडून आपण ते ईमोजी समोरच्या यूजर्स ला पाठवू शकतो.  भारतात २०० दशलक्ष यूजर्स व्हाटस ऍप’ चा वापर करतात. जगातील प्रथम क्रमांकावर असलेल्या ‘व्हाटस ऍप’ ने आपल्या यूजर्स साठी नेहमीच काही ना काही विशिष्ठ फीचर्स आणलेले आहेत. त्यामुळेच ‘व्हाटस ऍप’ हे सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय मेसेजिंग एप्लिकेशन बनलेले आहे.