व्हॉट्सअॅपचे युजर्ससाठी खास फीचर

lifestyle news on mh28.in

व्हॉट्सअॅप ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले असून हे फीचर सर्वांना उपयोगी आणि आवश्यक असे आहे.  ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर व्हॉट्सअॅप ने आपल्या अपडेट मध्ये ऍड केले आहे. यामुळे युजर्सना पाठवलेले मेसेज रिकॉल म्हणजेच परत घेता येणार आहे. त्यामुळे युजर्स ला या गोष्टीचा खूपच फायदा होणार आहे.

अनेक वेळा व्हॉट्सअॅप वर चुकून किंवा अनवधानाने चुकीच्या व्यक्तीला किंवा ग्रुप वर मेसेज जायचे आणि ते आपल्या मोबाईल मधून डिलिट केले ही तरी समोरच्या युजर्सला तो मेसेज मिळायचा. या बाबत अनेकांनी व्हॉट्सअॅपजवळ अशाप्रकारच्या फीचरची मागणीही केली होती. त्यानुसार व्हॉट्सअॅपने हे फीचर समाविष्ट करून त्याची चाचणी करण्यात आली आणि अखेर हे फीचर सर्व व्हॉट्सअॅप युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मधून आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. या आधी गुगलच्या जीमेल मध्ये सुद्धा या सारखीच ,”अनडू” हे फीचर देण्यात आले आहे. ज्यामुळे पाठवलेला इमेल युजर्स परत घेऊ शकतात.

व्हॉट्सअॅप मध्ये सुद्धा गेलेला मेसेज देखील परत घेता येणार आहे. परंतु तो मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला तर मात्र युजर्स गेलेला मेसेज रिकॉल करू शकणार नाही.