व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार

forwarded message feature in whatsapp

व्हॉट्सअॅप वर एकामागून एक येणारे मेसेज अनेकदा डोकेदुखी ठरते. अनेकदा तोच तोच मेसेज पुन्हा पुन्हा येतो . अनेक महाभाग मेसेज फॉरवर्ड करतांना कशाचा आणि कुणाचा आहे हे सुद्धा बघत नाही. त्यामुळे अनेक यूजर्स हास्याचं पात्र बनत असतात. परंतु आता याला लगाम लागणार आहे. इतरांचे मेसेज फॉरवर्ड करणं सुद्धा आता लपून राहणार नाही. कारण ‘Forwarded message’ हे नवीन फिचर व्हॉट्सअॅप मध्ये येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार आहे.

व्हॉट्सअॅपवर इतरांनी पाठवलेले मेसेज ग्रुप किंवा इतरांना फॉरवर्ड करण्याची जणू अनेकांना सवयच झाली आहे. सणासुदीच्या काळात तर व्हॉट्सअॅपवर Forwarded मेसेज पाठवून अनेकजण आपण किती सजग आणि शुभचिंतक आहोत हे दाखवून देत असतो . अनेक महाभाग तर हे फॉरवर्ड मेसेज आपल्या नावानं युद्ध खपवतात. अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅप ने वाईट बातमी आहे.

कारण यापुढे ‘Forwarded message’ हे नवीन व्हॉट्सअॅप फिचर सांगणार आहे की पाठवलेला मेसेज हा Forwarded आहे की नाही. या ‘Forwarded message’ च्या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. या मेसेजवर यापुढे ‘Forwarded message’ मेसेज असा टॅग येणार आहे. त्यामुळे कळेल की पाठवलेला मेसेज हा इतर ठिकाणाहून पुढे पाठविण्यात आला आहे.  शिवाय व्हॉट्सअॅप ‘Group Description’ हे फीचर देखील पुढच्या अपडेट मध्ये मिळणार असून या फीचरमुळे व्हॉट्सअॅप ग्रुप बद्दल माहिती कळेल. ग्रुप ऍडमिन ग्रुप ची माहिती संबंधित ग्रुप मध्ये टाकू शकणार आहे.

व्हॉट्सअॅप च्या फालतू यूजर्स ला आता लगाम लागणार

whatsapp new feature

आता फालतुगिरी करणाऱ्या व्हॉट्सअॅप यूजर्स ला लगाम लावण्यात येणार आहे. हो, तुम्ही वाचताय ते बरोबर आहे. प्रत्येक ग्रुप किंवा फ्रेंडलिस्ट मध्ये काही ना काही जण असे असतात की जे नुसते इकडून तिकडे मेसेज फिरवत असतात. त्यांना आता लगाम लागणार असून. व्हाट्सअप च्या पुढच्या अपडेट मध्ये हे फिचर येणार आहे. “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल असा अंदाज आहे. यामध्ये अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो.

धार्मिक, जातीविषयक, कुणाची निंदा अथवा तेढ किंवा अश्लील मेसेज वारंवार एखाद्या ग्रुप मध्ये काही लोक पोस्ट करीत असतात. त्याचा इतरांना त्रास होतो की नाही याची पर्वा सुद्धा अशा व्यक्ती करीत नाहीत. तसेच काही व्हॉट्सअॅप यूजर्स आलेला मेसेज खरा आहे की खोटा याची खातरजमा न करता जसा आहे तसा आपल्या दुसऱ्याला फॉरवर्ड करणे आपले आद्यकर्तव्य समजून शेयर करीत असतात. यामुळे अनेकवेळा मनस्ताप तर काही ठिकाणी वाद सुद्धा झाल्याची उदाहरणे सुद्धा दिसून आली आहे. त्यामुळे अशा मेसेज ला आता आळा बसणार आहे. त्यामुळे तेच तेच गुड मॉर्निंग, गुड नाईट चे मेसेज बंद होऊ शकतील असं म्हणण्यास हरकत नाही. मात्र याची जबाबदारी सर्वथा ग्रुप ऍडमिन ची असणार आहे. व्हॉट्सअॅप आता “Restricted Groups” नावाचे फिचर घेऊन येत असून यामुळे ग्रूपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल. अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो. अशावेळी तो व्यक्ती ग्रूपमध्ये केवळ मेसेज वाचू शकतो. पण कोणत्याच मेसेजला रिप्लाय करु शकत नाही. बंदी घातलेल्या ग्रूपमधील सदस्याला ‘मेसेज अॅडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो अॅडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.

WABetaInfo च्या माहितीनुसार, अँड्रॉइड आणि आयफोन मध्ये हे फिचर समाविष्ट करण्यात येणार आहे. सोबतच ‘व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच’ हे फिच सुद्धा व्हॉट्सअॅप आणणार आहे. या फिचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल. तर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. मात्र, यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी लागेल. विशेष म्हणजे या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंग फीचरही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी न्यू फिचर

truth of 777888999

व्हॉट्सअॅप हे सध्या स्तिथी मध्ये सर्वोत्तम वापरण्यात येणारा सोशल साईट अॅप आहे. जो पण आपल्या मोबाईल वर नेटचा वापर करतो अशा प्रत्येक मोबाईल ला व्हॉट्सअॅप असतेच. या व्हॉट्सअॅप मध्ये ग्रुप देखील असतो त्या ग्रुपची संपूर्ण जबाबदारी ही अॅडमिन ची असते. व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांसाठी कायम चेष्टेचा विषय ठरणाऱ्या अॅडमिनला आता जबरदस्त ‘पॉवर’ ही न्यू फिचर मुळे मिळणार आहे. ग्रुप सब्जेक्ट, आयकॉन आणि डिस्क्रिप्शन कोण बदलू शकतो अथवा नाही, हे ठरवण्याचा ‘विशेष’ अधिकार त्याला लवकरच मिळणार आहेत. तसंच व्हॉट्सअॅप आणत असलेल्या एका फिचर्समुळं अॅडमिनला कुणीही ग्रुपमधून काढू शकणार नाही हे विशेष आहे.

एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपच्या याशिवाय आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार असल्याची घोषणा व्हॉट्सअॅपनं केली आहे. त्यानुसार ग्रुप तयार करणाऱ्याला त्यातून काढून टाकता येणार नाही. एका वृत्तानुसार व्हॉट्सअॅप ‘डीलीट फॉर एव्हरीवन’ (Delete for everyone) या फीचर्सवरही देखील काम करीत आहे.

अशा या न्यू फिचर मुळे नक्कीच व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला एक मोठा व उत्तम असा अधिकार प्राप्त होणार आहे.

व्हॉट्सअॅपचे युजर्ससाठी खास फीचर

lifestyle news on mh28.in

व्हॉट्सअॅप ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले असून हे फीचर सर्वांना उपयोगी आणि आवश्यक असे आहे.  ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर व्हॉट्सअॅप ने आपल्या अपडेट मध्ये ऍड केले आहे. यामुळे युजर्सना पाठवलेले मेसेज रिकॉल म्हणजेच परत घेता येणार आहे. त्यामुळे युजर्स ला या गोष्टीचा खूपच फायदा होणार आहे.

अनेक वेळा व्हॉट्सअॅप वर चुकून किंवा अनवधानाने चुकीच्या व्यक्तीला किंवा ग्रुप वर मेसेज जायचे आणि ते आपल्या मोबाईल मधून डिलिट केले ही तरी समोरच्या युजर्सला तो मेसेज मिळायचा. या बाबत अनेकांनी व्हॉट्सअॅपजवळ अशाप्रकारच्या फीचरची मागणीही केली होती. त्यानुसार व्हॉट्सअॅपने हे फीचर समाविष्ट करून त्याची चाचणी करण्यात आली आणि अखेर हे फीचर सर्व व्हॉट्सअॅप युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मधून आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. या आधी गुगलच्या जीमेल मध्ये सुद्धा या सारखीच ,”अनडू” हे फीचर देण्यात आले आहे. ज्यामुळे पाठवलेला इमेल युजर्स परत घेऊ शकतात.

व्हॉट्सअॅप मध्ये सुद्धा गेलेला मेसेज देखील परत घेता येणार आहे. परंतु तो मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला तर मात्र युजर्स गेलेला मेसेज रिकॉल करू शकणार नाही.